Lokmat Sakhi >Food > How to Store Lemons the Right Way : महागडे लिंबू आणले, आता ते लवकर खराब होण्याची चिंता? 1 सोपी ट्रिक, महिनाभर राहतील फ्रेश

How to Store Lemons the Right Way : महागडे लिंबू आणले, आता ते लवकर खराब होण्याची चिंता? 1 सोपी ट्रिक, महिनाभर राहतील फ्रेश

How to Store Lemons the Right Way : लिंबू आरोग्यासाठी चांगले असतेच, पण त्याची किंमत वाढल्याने ते खाणे बंद करण्यापेक्षा जास्त दिवस टिकेल यासाठी काय करावं याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 12:33 PM2022-04-28T12:33:26+5:302022-04-28T13:33:07+5:30

How to Store Lemons the Right Way : लिंबू आरोग्यासाठी चांगले असतेच, पण त्याची किंमत वाढल्याने ते खाणे बंद करण्यापेक्षा जास्त दिवस टिकेल यासाठी काय करावं याविषयी...

How to Store Lemons the Right Way: Bringing Expensive Lemons, Now Worrying About It Going Bad Soon? 1 simple trick, stay fresh for a month | How to Store Lemons the Right Way : महागडे लिंबू आणले, आता ते लवकर खराब होण्याची चिंता? 1 सोपी ट्रिक, महिनाभर राहतील फ्रेश

How to Store Lemons the Right Way : महागडे लिंबू आणले, आता ते लवकर खराब होण्याची चिंता? 1 सोपी ट्रिक, महिनाभर राहतील फ्रेश

Highlightsलिंबं महाग झाल्याने ती साठवायची योग्य पद्धत माहित असायला हवीमहिनाभर आणि दोन ते तीन महिने लिंबं साठवण्याच्या सोप्या ट्रिक्स

उन्हाचा तडाखा जसा वाढतो तशी बाजारात भाजी आणि फळांची किंमत वाढत जाते. हिवाळ्याच्या दिवसांत या गोष्टींची असणारी मुबलक आवक उन्हाळ्यात कमी होत असल्याने किमती झपाट्याने वाढतात. व्हिटॅमिन सीचा महत्त्वाचा स्त्रोत असल्याने लिंबाला आहारात बरेच महत्त्व आहे. त्यामुळेच नियमित लिंबू खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडूनही दिला जातो. कॅलरी बर्न होण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचा उपाय अनेक जण करतात. इतकेच नाही तर हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर लिंबू अतिशय फायदेशीर ठरते (How to Store Lemons the Right Way). 

(Image : Google)
(Image : Google)

कधी सॅलेडवर, कधी कोशिंबीरीत तर पोहे, उपीट यांवर आपण आवर्जून लिंबू पिळून घेतो. उन्हाळ्यात सरबतासाठी लागणारे लिंबू आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने आपण आणतो खरे. पण बाहेर ठेवले तर उन्हाच्या तडाख्यामुळे ते लगेच वाळून जाण्याची शक्यता असते. भाज्या आणि फळे दिर्घकाळ टिकावीत म्हणून आपण फ्रिजमध्ये ठेवतो. पण लिंबू फ्रिजमध्येही वाळून जातात आणि कडक होतात. अशावेळी पैसे तर वाया जातातच पण लिंबूही वाया जाते. पण लिंबू साठवून ठेवण्याची योग्य पद्धत आपल्याला माहित असेल तर? पाहूया लिंबू कसे साठवले तर ते १ महिन्यापर्यंत आहे तसेच राहते. पाहूयात यासाठी कोणती ट्रिक वापरायची.

अशी टिकवा लिंबं महिनाभर 

लिंबू पटकन वाळून जाते आणि खराब होते. त्यामुळे त्याच्या रसाची चवही कडवट होत जाते. लिंबू सध्या महाग असल्याने ते नीट टिकवणे आवश्यक असते. त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये लिंबू पूर्ण बुडेल असे ठेवायचे. पाण्यामुळे लिंबू जास्त काळ ताजेतवाने राहायला मदत होते. यामुळे लिंबाचा रसदारपणा आहे तसाच टिकून राहतो. यासाठी हवाबंद डब्यात पाणी घालायचे आणि त्यामध्ये लिंबं पूर्ण बुडतील अशापद्धतीने घालून मग ते फ्रिजमध्ये ठेवायचे. ही लिंबं तुम्ही तीन ते चार आठवड्यांनी बाहेर काढली तरी आहेत तशीच राहीलेली दिसतील. यासाठी शक्यतो काचेचा किंवा प्लास्टीकचा डबा घ्यावा. त्यामुळे तुम्हालाही लिंबं साठवायची असतील तर ही सोपी पद्धत तुम्ही नक्की वापरुन पाहा. 

(Image : Google)
(Image : Google)

इतर उपाय 

लिंबाचा रस काढून ठेवणे, लिंबाच्या फोडी करुन ठेवणे, लिंबू फ्रिजमध्ये ठेवणे असे इतरही अनेक पर्याय असतात. मात्र त्यापेक्षा वर सांगितलेला उपाय सर्वात सोपा आणि दिर्घकाळ चालू शकेल असा आहे. 

दोन ते तीन महिने लिंबू टिकवायची असतील तर

आपण जास्तीची लिंबं आणली असतील आणि ती खराब होऊ नये म्हणून जास्त दिवसांसाठी साठवून ठेवायची असतील तर आणखी एक सोपा उपाय आहे. एक प्लास्टीकची हवाबंद पिशवी घेऊन त्यात सगळी लिंबं भरायची. या पिशवीला एक बारीक छेद द्यायचा आणि ही पिशवी फ्रिजरमध्ये ठेवून द्यायची. पिशवीला छेद दिल्याने त्यातील हवा थोडी खेळती राहण्यास मदत होते. मात्र वापरण्याच्या वेळी ही लिंबं थोडी आधीच बाहेर काढून सामान्य तापमानाला येऊ द्यायची.

Web Title: How to Store Lemons the Right Way: Bringing Expensive Lemons, Now Worrying About It Going Bad Soon? 1 simple trick, stay fresh for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.