लिंबू हा रोजच्या वापरातील महत्वपूर्ण पदार्थांपैकी एक आहे. पोहे, भाज्या, मिसळ, लिंबू पाणी या पदार्थांमध्ये लिंबू नसेल मजाच येत नाही. हिवाळ्यात सर्व भाजीपाला स्वस्तात उपलब्ध होतो. त्यामुळे लिंबूही फ्रेश मिळतात. पण जसजसं उन्हाळा सुरू होतो तसे लिंबू फारच महाग मिळतात.... लिंबाची किंमत ५० ते १०० रूपयांपर्यंत पोहोचते. (Kitchen Tricks & Tips)
महागडे लिंबू विकत घ्यायला लागू नयेत म्हणून लिंबू साठवून ठेवण्याची सोपी ट्रिक पाहूया. या ट्रिकचा वापर केल्यास वर्षभर फ्रेश लिंबू वापरता येऊ शकतात. कोणताही खर्च न करता ताज्या लिंबाचा रस वापरता येऊ शकतो. (How store lemon juice for long)
१) सगळ्यात आधी बाजारातून फ्रेश रसाळ लिंबू आणा आणि व्यवस्थित धुवून घ्या
२) लिंबू धुतल्यानंतर त्याचा रस एका भांड्यात काढून घ्या.
३) आता बर्फाच्या ट्रेमध्ये लिंबाचं मिश्रण घाला.
४) त्यानंतर फ्रिजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.
५) २४ ते २८ तासांनी हे क्यूब्स सेट झाल्यानंतर एका प्लास्टीकच्या बॅगेत साठवून ठेवा. तुम्हाला लागेल तसं एक एक क्यूब तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता.