Lokmat Sakhi >Food > वर्षभराचं लाल तिखट करून ठेवलं, पण त्याला जाळं लागलं? २ सोपे उपाय- तिखट होईल स्वच्छ

वर्षभराचं लाल तिखट करून ठेवलं, पण त्याला जाळं लागलं? २ सोपे उपाय- तिखट होईल स्वच्छ

Kitchen Tips For The Storage Of Red Chili Powder: हौशेने करून ठेवलेल्या लाल तिखटाला जाळं लागलं असेल तर ते काढून टाकण्यासाठी काय करावं ते बघा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 12:28 PM2024-06-12T12:28:26+5:302024-06-12T12:29:15+5:30

Kitchen Tips For The Storage Of Red Chili Powder: हौशेने करून ठेवलेल्या लाल तिखटाला जाळं लागलं असेल तर ते काढून टाकण्यासाठी काय करावं ते बघा....

how to store mirchi powder and spices for long? 2 tips to remove bugs, insects from red chili powder | वर्षभराचं लाल तिखट करून ठेवलं, पण त्याला जाळं लागलं? २ सोपे उपाय- तिखट होईल स्वच्छ

वर्षभराचं लाल तिखट करून ठेवलं, पण त्याला जाळं लागलं? २ सोपे उपाय- तिखट होईल स्वच्छ

Highlights जर तिखटात जाळं दिसू लागलं असेल तर ते वेळीच कसं स्वच्छ करावं, याचे हे काही उपाय पाहून घ्या...

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरोघरी वाळवणं जशी केली जातात, तसंच वर्षभराचं लाल तिखट, काळा मसाला, गोडा मसाला असे मसाल्यांचे वेगवेगळे प्रकारही केले जातात. आपण मोठ्या हौशीने हे वेगवेगळे मसाले, तिखट करून ठेवताे. पण ते साठवून ठेवण्यात थोडं काही कमी जास्त झालं तर लगेच तिखटाला जाळे लागते. हे जाळे वेळीच स्वच्छ केले नाही तर तिखटात अळ्या, पाकोळ्यादेखील होतात (how to store mirchi powder and spices for long?). असं होऊ नये म्हणून काय करावं आणि जर तिखटात जाळं दिसू लागलं असेल तर ते वेळीच कसं स्वच्छ करावं, याचे हे काही उपाय पाहून घ्या... (2 tips to remove bugs, insects from red chili powder)

 

लाल तिखटात, मसाल्यांमध्ये जाळं पडू नये म्हणून उपाय

१. तिखट वर्षभर जशास तसं ठेवायचं असेल तर तिखट ज्या बरणीमध्ये भरणार आहात ती बरणी आतून, बाहेरून पुर्णपणे कोरडी आहे ना, तिचं झाकण स्वच्छ आणि कोरडं आहे ना, याची एकदा खात्री करून घ्या.

रात्री लवकर झोप लागत नाही? १ मिनिटाचा सोपा उपाय- अंथरुणावर पडताच चटकन शांत झोपाल

थोडाही ओलसरपणा राहीला तरी तिखट खराब होऊ शकतं. बरणीप्रमाणेच ज्या चमच्याने तिखट भरणार आहात, तो देखील पुर्णपणे कोरडा असावा. तुमच्या हाताला देखील अजिबात काेणताही ओलसरपणा नको.

२. ज्या बरणीत तिखट भरणार आहात तिच्या तळाशी आधी कडूलिंबाचा पाला टाकून ठेवा. त्यावर तिखट भरा. अर्ध तिखट भरल्यानंतर पुन्हा कडूलिंबाच्या पाल्याचा एक थर टाका आणि त्यावर उरलेलं अर्ध तिखट भरा. यामुळे वर्षभर तिखट मुळीच खराब होणार नाही.

 

तिखटाला जाळं लागलं असेल तर काय उपाय करावा?

तिखटाला जाळं लागलं आहे, असं लक्षात येताच ते एखाद्या पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्या. आणि जे जाळे तुम्हाला दिसते आहे तो तिखटाचा भाग लगेच वेगळा काढून टाका.

एसीची गारेगार हवा ठरू शकते धोकादायक- तज्ज्ञ सांगतात कायम एसीमध्ये बसण्याचे ४ दुष्परिणाम

यानंतर पीठ चाळण्याची जी चाळणी आहे तिच्या मदतीने तिखट चाळून घ्या. पण हे काम खूप सावकाश करा. चाळणीपासून तुमचा चेहरा दूर ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाकाला मास्क लावा किंवा रुमाल गुंडाळून घ्या.

चाळून घेतलेलं तिखट कडक उन्हात थोडावेळ ठेवा आणि नंतर कोरड्या बरणीत भरा. बरणीत तिखट भरताना सगळ्यात आधी बरणीच्या तळाशी मीठ टाका. त्यावर तिखट भरा. तिखटाच्या वर कडुलिंबाचा पाला टाकून ठेवा. तिखट वर्षभर फ्रेश राहील. 

 

Web Title: how to store mirchi powder and spices for long? 2 tips to remove bugs, insects from red chili powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.