अनेक घरांमध्ये वर्षभराचं लाल तिखट एकदाच करून ठेवलं जातं. पण बऱ्याचदा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर किंवा बरणीचं झाकण थोडं उघडं राहीलं तर ओलसरपणामुळे, दमट हवेमुळे तिखटामध्ये जाळे होऊ शकते. ते वेळीच स्वच्छ केलं नाही तर त्यात अळ्या आणि किडेही होऊ शकतात. त्यामुळे तिखट वर्षभर चांगलं रहावं, जाळं लागून खराब होऊ नये, म्हणून हे काही उपाय करा. (2 tips for best storage of chilli powder)
तिखटाला जाळं लागू नये म्हणून उपाय
१. कडुलिंबाच्या पानांचा वापर
धान्य वर्षभर टिकविण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करायचा, हे आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीचा वापर तिखटासाठीही करता येतो.
एक पैसाही खर्च न करता त्वचा हाेईल सुंदर- दिसाल तरुण, रोज फक्त ५ मिनिटे करा हे काम - सुरकुत्या गायब
यासाठी ज्या बरणीमध्ये तिखट भरणार आहात तिच्या तळाला कडुलिंबाची काही वाळलेली पाने टाकून ठेवा. त्यानंतर त्यात तिखट भरा. पुन्हा वरच्याबाजुने कागदाची एक घडी ठेवा आणि त्या घडीवर कडुलिंबाच्या पानांचा थर ठेवा.
२. मीठाचा वापर
मीठाचे प्रमाण योग्य पडले, तर कोणतेही लोणचे अधिककाळ टिकते, हे आपल्याला माहिती आहे. कारण मिठाला नॅचरल प्रिर्झव्हेटीव्ह म्हणून ओळखले जाते. त्याचा उपयोग तिखटासाठीही करता येतो.
यासाठी बरणीमध्ये तिखट भरले की त्यावर कागदाची घडी ठेवा. त्यावर मीठ पसरवून ठेवा. तिखट काढायचे असेल तेव्हा मिठाचा थर अलगद दूर करा..
तिखटाला जाळे लागले असेल तर....
तिखटाला जाळे लागू नये, म्हणून आपण वरील उपाय करू शकतो. पण तिखटाला जर जाळे लागलेच असेल तर मात्र थोडा वेगळा उपाय करावा लागतो. जाळे लागले आहे, हे लक्षात येताच तेवढा भाग काढून टाका.
एक कढई गॅसवर ठेवा आणि गॅस मोठा करून ती चांगली तापू द्या. कढई तापली की गॅस बंद करा. आता त्यात तिखट घाला आणि हलवत रहा. व्यवस्थित थंड झालं की मग बरणीत भरून ठेवा.