पावसाळा आता जवळ येऊ लागला आहे. पावसाळ्यात आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. कधी पाणी तुंबते, कधी जोरात पाऊस पडतो, तर कधी पावसाच्या ओलाव्यामुळे घरातील वस्तू किंवा अन्नपदार्थांची नासाडी होते. इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात अन्नपदार्थ विशेषतः फळे व भाज्या लवकर खराब होतात. पावसाळ्यात अन्नपदार्थ खूप काळजी घेऊन साठवले तरीही ओलाव्याने त्यांना बुरशी लागू शकते. काही अन्नपदार्थ हे असे आहेत की जे आपल्याला रोज लागतात. कांदा हा त्यापैकी एक(How To Store Onions So They Last Longer).
काहीजण वर्षभर पुरेल इतका कांदा एकदाच खरेदी करून तो साठवून ठेवतात. अशावेळी या साठवून ठेवलेल्या कांद्याची योग्य ती काळजी घेतली नाही तर तो पावसाच्या ओलाव्याने खराब होतो. कांदा हा योग्य पद्धतीने व्यवस्थित साठवून (How to Store Onions In Monsoon Season) ठेवला नाही तर तो कुजू लागतो. कांदा एकदा का खराब झाला कि तो सडतो आणि त्यातून कुजट वास येतो. त्यामुळे जर आपण देखील कांदा साठवून ठेवला असेल तर तो दीर्घकाळ टिकावा यासाठी काही खास टिप्स पाहूयात(5 onion storing tips to avoid rotting during monsoon).
पावसाळ्यात कांदा खराब होऊ नये म्हणून कसा साठवून ठेवावा ?
१. कोरडे कांदे खरेदी करा :- जर आपण मोठ्या प्रमाणावर कांदे खरेदी करत असाल तर नेहमी कोरडे आणि चांगले सुकलेले कांदे खरेदी करा. कांद्याच्या वरील टरफलं अजिबात ओलसर नसावं. मोड आलेले कांदे कधीही खरेदी करु नये, ते लवकर कुजतात.
२. कांदा फ्रिजमध्ये स्टोअर करु नका :- कांदा कधीही फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू नका. कांदा फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवल्यास त्याला मोड येण्याची शक्यता असते, त्यामुळे कांदा कधीही फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवू नये. फ्रिजमधील ओलाव्यामुळे कांदे खराब देखील होऊ शकतात.
३. कागदाचा वापर करावा :- पावसाळ्यातील आर्द्र वातावरणामुळे कांद्याला कोंब फुटतात. हे टाळण्यासाठी कांद्याच्या खाली कागद पसरवा. कागद जास्तीची आर्द्रता शोषून घेतो त्यामुळे कांद्याला कोंब फुटणार नाहीत आणि ते दीर्घकाळ चांगले टिकतील.
ना स्टफिंग, ना कणिक मळायची झंझट तरीही झटपट बनवा चविष्ट पनीर पराठा.... गरमागरम पराठा खायला तयार...
४. कांदे पिशवीमध्ये ठेवू नका :- कांद्याला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पुरेशा प्रमाणात हवा आणि प्रकाश मिळणं महत्त्वाचं असत. त्यामुळे कांदे साठवताना ते पिशवीमध्ये ठेवू नयेत. कांदे नेहमी उघड्यावर किंवा उघड्या बास्केटमध्ये ठेवावेत. यामुळे त्यांना हवा लागेल आणि ते खराब होणार नाहीत.
५. ओलाव्यापासून कांदे लांब ठेवा :- कांदे साठवण्याची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी असेल याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तिथे कोणत्याही प्रकारचा ओलावा किंवा पाणी नसेल याची खात्री करावी. थोडासा ओलावा किंवा पाण्यामुळे कांदे खराब होऊ शकतात आणि त्यामुळे दुर्गंधी येऊ शकते.