भाजी, वरण, चटणी या कोणत्याही प्रकारात जर पुदिन्याचा थोडासा स्वाद असला तरी त्या पदार्थाची चव आणि सुवास लगेच खोलतो म्हणूनच बऱ्याच जणांना वेगवेगळ्या रेसिपींमध्ये पुदिना घालायला आवडतं. वारंवार बाजारात जाणं होत नाही म्हणून एकाच वेळी पुदिनाच्या एकदम २- ३ जुड्या आपण आणून ठेवतो. पण बऱ्याचदा त्या योग्य पद्धतीने न ठेवल्यामुळे सुकून जातात किंवा पुदिना सडून जातो (How to store pudina for long?). म्हणूनच पुदिना जास्तीत जास्त दिवस हिरवागार, फ्रेश ठेवण्यासाठी काय उपाय करावा ते पाहा.(best home hacks to keep mint leaves fresh and green for a month)
पुदिना जास्तीतजास्त दिवस ताजा राहण्यासाठी उपाय
१. हा पहिला उपाय करण्यासाठी एखादा एअर टाईट डबा घ्या. त्या डब्यामध्ये निवडून ठेवलेला पुदिना टाका आणि डब्याचं झाकण व्यवस्थित लावून तो फ्रिजरमध्ये ठेवून द्या.
लोखंडी कढई, तवा खूपच काळा पडला? १ सोपा उपाय करा- लख्खं चमकतील काळे पडलेले भांडे
डब्याचं झाकण पक्कं लागलेलं असावं, याची खात्री करून घ्या. कारण जर फ्रीजमधलं मॉइश्चर पानांना लागलं तर तो खराब होऊ शकतो. जसा लागेल तसा पुदिना बाहेर काढून वापरावा. अशा पद्धतीने ठेवलेला पुदिना महिनाभर तरी अगदी फ्रेश राहील.
२. दुसरा उपाय करण्यासाठी पुदिना निवडून घ्या. त्यानंतर एक पेपर नॅपकिन घेऊन त्यावर पुदिना टाका. पुदिनाच्या पानांमध्ये ओलसरपणा नाही ना याची एकदा खात्री करून घ्या. त्यानंतर या नॅपकिनमध्ये पुदिना व्यवस्थित गुंडाळा आणि एअरटाईट डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवून द्या.
Candle Burning Treatment: फाटे फुटलेले केस मेणबत्तीने जाळायचे? पाहा काय आहे हा व्हायरल ट्रेण्ड
३. तिसरा उपाय अतिशय सोपा असून त्यासाठी पुदिना निवडत बसण्याचीही गरज नाही. हा उपाय करण्यासाठी एक ग्लास घ्या. तो ग्लास निम्म्यापेक्षाही कमी भरेल एवढंच त्यात पाणी टाका. त्यात पुदिन्याची जुडी घाला आणि हा ग्लास फ्रिजमध्ये ठेवून द्या. जसा पाहिजे तसा पुदिना घेऊन तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने ठेवलेला पुदिना २ ते ३ आठवडे चांगला राहतो.