Join us

उन्हाळ्यात पुदिना लवकर सुकतो? आठवडाभर ताजा ठेवण्यासाठी ४ युक्त्या, मोठी जुडी वाया जाणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:15 IST

Kitchen Tips : उन्हाळ्यात पुदिना लवकर खराब होतो, सुकून जातो. अशा परिस्थितीत आपल्याला तो खूप काळजीपूर्वक साठवावा लागतो.

उन्हाळ्यात पुदिना हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीराला थंडावा देण्यासोबतच तो उष्माघात आणि डिहायड्रेशन इत्यादी समस्यांपासून देखील संरक्षण करतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे पुदिन्याचा वापर करत असतं. काही लोक पुदिना बारीक करून किंवा वाळवून रायत्यात मिसळतात, तर काही लोक पराठ्यात पुदिना वापरतात. याशिवाय पुदिन्यापासून ड्रिंक्स आणि चटणी देखील बनवली जाते. उन्हाळ्यात पुदिना लवकर खराब होतो, सुकून जातो. अशा परिस्थितीत आपल्याला तो खूप काळजीपूर्वक साठवावा लागतो. पुदिना आठवडाभर ताजा ठेवण्यासाठी सोप्या स्टोरेज हॅक्स वापरा.

पाण्यात ठेवा

जर तुम्हाला पुदिना जास्त काळ साठवायचा असेल तर पुदिना पाण्यात ठेवा. तुम्ही फ्रिजच्या बाहेर किंवा आतमध्ये ठेवू शकता, असं केल्याने पुदिना पूर्णपणे ताजा राहील. मात्र लक्षात ठेवा की, दररोज ग्लासातील पाणी बदलत राहिलं पाहिजे. साठवणुकीची ही पद्धत वापरून पुदिना ४-५ दिवस ताजा राहिल.

फक्त पानं ठेवा

जर तुम्ही पुदिन्याची पानं तोडून ती छिद्रं असलेल्या बॉक्समध्ये ठेवलीत तर पुदिना एक आठवडा ताजा राहील. साठवणुकीची ही पद्धत देखील अगदी सोपी आहे.

कागदात गुंडाळून ठेवा

जर तुम्हाला उन्हाळ्यात आठवडाभर पुदिना ताजा ठेवायचा असेल तर तो वर्तमानपत्रात किंवा कागदात गुंडाळून ठेवा. असे केल्याने तुमचा पुदिना खराब होत नाही किंवा सुकत नाही, परंतु हे करताना लक्षात ठेवा की पुदिना ओला नसावा.

झिप लॉक बॅगमध्ये ठेवा

पुदिना ताजा ठेवण्यासाठी, तो झिप लॉक बॅगमध्ये भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. असं केल्याने पानांचं ऑक्सिडेशन थांबेल आणि ती सुकणार नाहीत. तसेच आठवडाभर ताजी राहतील. 

टॅग्स :किचन टिप्स