Join us  

How To Store Raw Mango: वर्षभरासाठी कैरी कशी साठवून ठेवायची? 3 टिप्स, आमरसाप्रमाणे वर्षभर साठवा करकरीत कैरी- खा हवी तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2022 8:28 PM

Preservation Of Raw Mango: हिवाळ्यात, पावसाळ्यात आंबट, चटपटीत कैरीची कधीही आठवण येतेच.. अशावेळी कैरीची (kairi) भूक मग कैरीच्या लोणच्यावर भागवावी लागते. असं होऊ नये म्हणूनच तर बघा आंबट- करकरीत कैरी वर्षभर जशीच्या तशी साठवून ठेवण्यासाठी खास टिप्स..(tips to store raw mango for a year)

ठळक मुद्देवर्षभर कधीही प्यावसं वाटलं तर कैरीचं पन्हं प्या किंवा तशीच मीठ लावून आंबट कैरी तोंडी लावा.. त्यासाठीच तर बघा या काही खास सोप्या ट्रिक्स.

साधारण मार्च महिन्यात बाजारात कैरी दिसायला लागते. सुरुवातीला खूपच महागडी असल्याने आपण घ्यायला जरा बिचकतो. त्यामुळे कैरीचे (kairi or raw mango) भाव आपल्या आवाक्यात येऊन ती आपल्या घरी यायला मार्चचा मध्य उजाटतो. मग काय एकदा का कैरी घरी आली की मग कैरीचं पन्हं, कैरीचा तक्कू, तात्पुरतं लोणचं, कैरीचं वरण असं काय काय करायला सुरुवात होते. यापैकी काहीच नसलं तरी आंबट कैरी फोडीच्या स्वरुपात जेवणात सोबत करत असतेच.. अशीही कैरी वर्षभर खायला मिळाली तर किती मज्जा ना? म्हणूनच तर बघा या काही खास टिप्स.. 

 

आमरस किंवा आंब्याचा पल्प अनेक जण साठवून ठेवतात. आंब्याच्या पल्पचे रेडीमेड डबेही बाजारात विकायला मिळतात. त्यामुळे वर्षभर कधीही मँगो मिल्कशेक पिता येऊ शकताे. पण कैरीचंही असंच काहीसं होऊ शकतं बरं का. आणि आंब्याप्रमाणेच आपण हा कच्चा आम म्हणजेच कैरी देखील वर्षभर साठवून (storage for a year) ठेवू शकतो. मग वर्षभर कधीही प्यावसं वाटलं तर कैरीचं पन्हं प्या किंवा तशीच मीठ लावून आंबट कैरी तोंडी लावा.. त्यासाठीच तर बघा या काही खास सोप्या ट्रिक्स.

 

कैरी वर्षभर साठवून ठेवण्यासाठी (How To Store Raw Mango)- कैरी वर्षभर चांगली रहावी आणि खराब होऊ नये, म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. सगळ्यात आधी तर कैरी स्वच्छ कोरडी करून घ्या. कैरीची सालं काढून टाका आणि तिचे छोटे छोटे तुकडे एक बाऊलमध्ये जमा करा. साधारण एका मध्यम आकाराच्या कैरीसाठी २ टीस्पून साखर आणि २ टीस्पून व्हाईट व्हिनेगर वापरा. हे दोन्ही पदार्थ एका बाऊलमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात टाका. त्यात आता कैरीच्या फोडी टाका आणि १० मिनिटांसाठी भिजू द्या. त्यानंतर कैरीच्या फोडी त्या पाण्यातून बाहेर काढा. एका स्वच्छ कपड्यावर पसरवा आणि वाळवून घ्या. किंवा दुसऱ्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. 

 

यानंतर या फोडी एका पसरट भांड्यामध्ये भरा. हे भांडं झाकण न लावता एका तासासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर एका तासाने भांडे बाहेर काढा. ज्या फोडी एकमेकींना चिटकल्या आहेत, त्या एकमेकींपासून वेगळ्या करा थोड्या पुसून घ्या. नंतर या सगळ्या फोडी एका प्लास्टिकच्या झिपलॉक बॅगमध्ये ठेवा. स्ट्राॅ च्या मदतीने पिशवीतली हवा काढून टाका आणि त्यानंतर पिशवी लॉक करा. ही पिशवी एअरटाईट डब्यात ठेवून फ्रिजरमध्ये डिप फ्रिज करून ठेवा. जेव्हा कैरी खावीशी वाटेल तेव्हा कधीही या फोडी काढा आणि खा.. पण त्यावेळी त्यांना ओलसर हात लागणार नाही, याची काळजी घ्या.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीआंबा