Lokmat Sakhi >Food > तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग!

तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग!

Kitchen tips: थोडीशी हयगय झाली तरी मग वर्षभरासाठी करून ठेवलेला मसाला खराब होऊन जातो.. म्हणूनच या घ्या काही टिप्स.. मसाला सांभाळणं होईल सोपं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 07:24 PM2022-01-24T19:24:07+5:302022-01-24T19:25:07+5:30

Kitchen tips: थोडीशी हयगय झाली तरी मग वर्षभरासाठी करून ठेवलेला मसाला खराब होऊन जातो.. म्हणूनच या घ्या काही टिप्स.. मसाला सांभाळणं होईल सोपं...

How to store spices in your kitchen perfectly, 4 important tips | तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग!

तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग!

Highlightsशक्यतो खूप गडबडीच्या वेळी मसाले काढण्याच्या फंदात पडू नका झाकण व्यवस्थित लागलंय की नाही, हे बघायला विसरू नका. 

अनेक घरांमध्ये वर्षभराचं धान्य जसं एकदम साठवलं जातं किंवा मग वर्षभराचं लोणचं एकदाच घातलं जातं..  त्याचप्रमाणे वर्षभराचा मसालाही एकदाच करून ठेवला जातो. वर्षभर पुरवायचा असल्याने मसाल्याच्या बरण्याही मोठमोठाल्या असतात आणि त्यांची काळजीही विशेष घ्यावी लागते..  सुरुवातीला काही दिवस  लाल तिखट आणि इतर मसाले चांगले असतात, पण त्यानंतर मात्र हळूहळू त्यांच्यात जाळं दिसायला सुरुवात  होते.. काही वेळेला तर मसाल्यांमध्ये किडे आणि आळ्याही होऊ लागतात.. असं काही झालं की वर्षभराची  मेहनत आणि पैसा सगळंच वाया जातं.. म्हणूनच मसाला वाया जाऊ नये, आणि वर्षभर टिकून रहावा, म्हणून या घ्या काही टिप्स.. 

 

१. काचेच्या बरण्यांचा वापर करा..(Use glass jar)
मसाला साठविण्यासाठी प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या डब्यांचा वापर करणं टाळावा. कारण त्यामध्ये हवा थेट  जाऊ शकते. हवेचा खूप जास्त संपर्क आल्यास मसाला खराब होतो. त्यामुळे लोणचं जसं आपण काचेच्या बरणीत साठवून ठेवतो, तसंच मसाल्यांसाठी देखील काचेच्या बरण्यांचा वापर करा. काचेच्या बरण्यांचे झाकण मात्र एअर टाईट म्हणजेच हवाबंद असायला हवे, याची काळजी घ्या. 

 

२. चमचा कसा वापरता ते तपासा..
मसाल्याच्या बरण्यांना ओले हात लावू नयेत, हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे अगदी स्वच्छ, कोरडे हात असल्यावरच आपण मसाल्याच्या बरण्या उघडतो. पण बऱ्याचदा मसाले बरणीतून काढण्यासाठी जो चमचा वापरतो, त्या चमच्याकडे मात्र साफ दुर्लक्ष होतं.. तो चमचा थोडा जरी ओलसर असेल तरी मसाला खराब होऊ शकतो. त्यामुळे मसाल्याच्या डब्यात घालण्यापुर्वी चमचाही पुसून कोरडा करून घ्या. तसेच या डब्यांमधे शक्यतो कोणताच चमचा कायमसाठी ठेवू नका. मसाला काढून झाल्यावर चमचाही बाहेर काढून ठेवा.

 

३. मसाला कोरड्या जागेत ठेवा.. (store in dry place)
ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन येत असेल किंवा ज्या जागेत कायम ओलावा राहात असेल, त्याठिकाणी मसाल्याच्या बरण्या ठेवणं टाळा.. खूप ऊन किंवा खूप ओलावा, या दोन्ही ठिकाणी ठेवल्यास मसाला खराब होऊ शकतो. त्यामुळे तो शक्यतो सामान्य तापमानात ठेवावा.  

 

४. बरण्यांचे झाकण तपासा
बऱ्याचदा सकाळच्या घाई- गडबडीत जर मसाल्याची बरणी उघडली गेली, तर बरणीचे झाकण व्यवस्थित लावण्यास आपण विसरून जातो. अर्धवट झाकण उघडेच असते. अशावेळी बरणीचं झाकण उघडं राहिल्यानेही मसाले खराब होऊ शकतात.. त्यामुळे शक्यतो खूप गडबडीच्या वेळी मसाले काढण्याच्या फंदात पडू नका किंवा मग मसाला काढणं खूपच गरजेचं असेल तर झाकण व्यवस्थित लागलंय की नाही, हे बघायला विसरू नका. 
 

Web Title: How to store spices in your kitchen perfectly, 4 important tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.