Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात साजूक तूप करण्यासाठी साठवलेली साय खराब होते? ८ टिप्स - तूप होईल शुभ्र - दाणेदार...

उन्हाळ्यात साजूक तूप करण्यासाठी साठवलेली साय खराब होते? ८ टिप्स - तूप होईल शुभ्र - दाणेदार...

Kitchen Hacks : How To Store Your Malai To Preserve It For A Long Time : Store Malai Like This To Keep It Fresh For Long : उन्हाळ्यात बहुतेकदा उष्णतेमुळे साय खराब होते अशावेळी कष्ट वाया जाऊ नये , म्हणून हे खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 19:07 IST2025-03-27T18:58:43+5:302025-03-27T19:07:33+5:30

Kitchen Hacks : How To Store Your Malai To Preserve It For A Long Time : Store Malai Like This To Keep It Fresh For Long : उन्हाळ्यात बहुतेकदा उष्णतेमुळे साय खराब होते अशावेळी कष्ट वाया जाऊ नये , म्हणून हे खास उपाय

How To Store Your Malai To Preserve It For A Long Time Store Malai Like This To Keep It Fresh For Long | उन्हाळ्यात साजूक तूप करण्यासाठी साठवलेली साय खराब होते? ८ टिप्स - तूप होईल शुभ्र - दाणेदार...

उन्हाळ्यात साजूक तूप करण्यासाठी साठवलेली साय खराब होते? ८ टिप्स - तूप होईल शुभ्र - दाणेदार...

आजही अनेक घरांमध्ये रोजच्या जेवणात साजूक तूप आवर्जून वापरले जाते. बदलत्या काळानुसार, काही घरांमध्ये साजूक तूप विकत आणले जाते तर काहीजणांकडे पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने साय साठवून त्याचे तूप (Store Malai Like This To Keep It Fresh For Long) काढले जाते. साठवलेल्या सायीपासून तूप तयार करायचे म्हटलं की ती प्रक्रिया फारच मोठी असते. एवढी मेहनत घेऊन तूप व्यवस्थित निघाले तर ठीक नाहीतर सगळे कष्ट वाया जातात. यासाठीच, अनेक गृहिणी कंटाळा (How To Store Your Malai To Preserve It For A Long Time) करून साठवलेल्या सायीचे साजूक तूप न काढता बाहेरुन विकत आणतात.

उन्हाळ्याच्या या दिवसांत साठवलेल्या सायीचे तूप करायचे म्हणजे अनेकींना टेंन्शन येते. कारण वातावरणातील उष्णतेमुळे काहीवेळ साय खराब होते. साय पिवळी पडणे, सायीला कडवट दुर्गंधी येणे किंवा तूप पाण्यासारखे पातळ होणे अशा एक ना अनेक समस्या येतात. एवढंच नव्हे तर अशा सायीपासून तूप तयार केले तर ते खूप दिवस चांगले राहत नाही, त्याला बुरशी येते. यासाठीच उन्हाळ्यात साठ्वललेया सायीचे तूप तयार करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात साठवलेल्या सायीचे तूप तयार करण्याची योग्य पद्धत पाहूयात. 

उन्हाळ्यात साठवलेल्या सायीचे तूप तयार करताना कोणती काळजी घ्यावी ? 

१. उन्हाळ्यात शक्यतो तूपासाठी साठवून ठेवलेली साय लवकर खराब होण्याची शक्यता असते. यासाठी जास्त दिवस साठवून ठेवलेल्या सायीपासून तूप तयार करणे टाळावे. जास्तीत जास्त १५ ते २० दिवस साठवलेल्या सायीचे लगेच तूप करावे. 

२. तूप तयार करण्यापूर्वी साय चांगली आहे की नाही ते तपासून पाहावे. सायीला कडवट चव किंवा दुर्गंधी येत असेल त्याचे तूप करणे टाळावे. असे तूप दीर्घकाळ चांगले टिकून न राहता, लगेच खराब होते किंवा त्याला बुरशी येते. 

गुढीपाडव्याला श्रीखंड - पुरीचा बेत करायचा, टम्म फुगलेल्या पुऱ्यासाठी १० टिप्स, पुरी होईल परफेक्ट...

३. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तूप काढणार असाल तर आदल्या दिवशी रात्री साय फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावी. त्यामुळे साय चांगल्या प्रकारे फर्मेंट होऊन चांगले रवाळ, दाणेदार तूप निघते. 

४. साय साठवताना त्यात एक चमचा दही घालावे. यामुळे साय खराब होत नाही आणि दीर्घकाळ चांगली राहते. दर दिवशी साय साठवताना ती साय थोडी हलवून मिक्स करून घ्यावी. एकावर एक साय घालून त्याचा फक्त थर तयार करून नये ते अधून मधून चमच्याने हलवून घ्यावे. नाहीतर साय लवकर खराब होऊ शकते किंवा पिवळसर पडून त्याला कडवट चव येते. 

आनंदानं खा 'हे' नूडल्स सॅलेड, चवीला मस्त आणि पोटभर खाऊनही वजन कमी होईल झरझर!

५. उन्हाळ्यात सायीपासून साजूक तूप तयार करताना जे लोणी येते ते थंड पाण्याने धुवून घ्यावे. थंड पाणी आणि बर्फाच्या खड्यांचा वापर करावा. लोणी ३ ते ४ वेळा धुवून घ्यावे. 

६. तूप बनवण्यासाठी साय साठवताना, बहुतेक लोक त्याचे भांडे उघडेच ठेवतात. असे न करता साय भांड्यात ठेवल्यानंतर वरून झाकण ठेवून सायीचे भांडे झाकणे आवश्यक आहे. अशा प्रकारे त्याचा वास फ्रिजर किंवा फ्रिजमध्ये पसरत नाही. तसेच, साठवून ठेवलेली साय कोरडी न पडता बऱ्याच काळासाठी ताजी राहते. 

८. कडवलेले तूप बरणीत भरून साठवताना बरणीच्या तळाशी नागवेलीचे पान, मिठाचे खडे किंवा लवंग यापैकी काहीतरी एक घालून मग त्यात तूप ओतावे. यामुळे उन्हाळ्यात तूप खराब होत नाही.

Web Title: How To Store Your Malai To Preserve It For A Long Time Store Malai Like This To Keep It Fresh For Long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.