Lokmat Sakhi >Food > आईस्क्रीम विरघळले? आता करा त्याचे ४ पदार्थ, झटपट सोपे आणि गारेगार मस्त...

आईस्क्रीम विरघळले? आता करा त्याचे ४ पदार्थ, झटपट सोपे आणि गारेगार मस्त...

4 Desserts You Can Make From Melted Ice Cream : वितळलेल्या आईस्क्रीमपासून आपण झटपट होणारे ४ चविष्ट पदार्थ बनवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2023 08:10 PM2023-05-17T20:10:14+5:302023-05-17T20:27:05+5:30

4 Desserts You Can Make From Melted Ice Cream : वितळलेल्या आईस्क्रीमपासून आपण झटपट होणारे ४ चविष्ट पदार्थ बनवू शकतो.

How to Turn Melted Ice Cream Into a DELICIOUS Treat | आईस्क्रीम विरघळले? आता करा त्याचे ४ पदार्थ, झटपट सोपे आणि गारेगार मस्त...

आईस्क्रीम विरघळले? आता करा त्याचे ४ पदार्थ, झटपट सोपे आणि गारेगार मस्त...

आईस्क्रीम...ज्याच्या नावातच आईस आणि क्रिम यांचा समावेश आहे असा सुंदर गोड क्रिमी पदार्थ कोणाला आवडणार नाही असे होणारच नाही. ज्याचे नाव काढताच जितके एखादं लहान मुलं खूश होत तितकंच सत्तरीतले आजी-आजोबा देखील खूश होतात. अनेकांना आईस्क्रीम (Ice Cream) हा जणू जिव्हाळ्याचा विषय वाटतो. भर रणरणत्या उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच असते. कडक उन्हापासून आराम मिळावा म्हणून लोक आईस्क्रीम खाताना दिसतात. उन्हाळ्यात बहुतेक घरांमध्ये जेवणानंतर आईस्क्रीम खाल्लं जातं. उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. 

 आईस्क्रीम विकत आणल्यावर ते विरघळू नये म्हणून लगेच फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावे लागते. हे आईस्क्रीम लगेच फ्रिजमध्ये ठेवले नाही तर ते विरघळून जाते. त्याचबरोबर उन्हाळयात वाढत्या गरमीमुळे आईस्क्रीम लगेच वितळण्याची शक्यता असते. आपल्यापैकी बरेचजण वितळलेले आईस्क्रीम परत गोठवून खातात, परंतु यामुळे त्या आईस्क्रीमची चव बदलते. परंतु या वितळलेल्या आईस्क्रीमपासून आपण झटपट होणारे ४ चविष्ट पदार्थ बनवू शकतो(4 Desserts You Can Make From Melted Ice Cream).

वितळलेल्या आईस्क्रीमचे नेमके करायचे काय ?

१. शेक करू शकता :- आपण उरलेले किंवा वितळलेले आइस्क्रीम घालून शेक बनवू शकता. शेक बनवल्याने आपले वितळलेले आईस्क्रीम वाया जाणार नाही आणि तुम्ही उन्हाळ्यात फ्लेवर्ड शेक पिण्याचा आनंद देखील घेऊ शकता. चॉकलेट, स्ट्रॉबेरी किंवा बटर स्कॉच सारखे अनेक फ्लेवर्डचे  शेक आपण घरच्या घरी सहज बनवू शकता आणि पिऊ शकता.  

आता घरीच करा जांभळाचे कुलर आणि गारेगार पॉपसिकल, रखरखीत दुपारी बच्चेकंपनीसाठी खास खाऊ...

२. कपकेक किंवा मग केक बनवा :- जर तुमचे आईस्क्रीम वितळले असेल तर तुम्ही त्यासोबत कपकेक किंवा मग केक बनवू शकता. बटरस्कॉच, व्हॅनिला किंवा चॉकलेट सारखी चव कशीही असली तरी, तुम्ही ते कपकेक कंटेनर किंवा मग मध्ये बनवू शकता. एक चवदार केक बनवण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये बेक करू शकता. आपण कप केकी किंवा मग केक बनवून त्यावर वितळलेले आईस्क्रीम क्रिम म्हणून लावून या चविष्ट केकचा आनंद घेऊ शकतो. 

३. ज्यूस बनवू शकता :- ज्या आईस्क्रीममध्ये दूध नसेल असे बिनादुधाचे आईस्क्रीम म्हणजे पॉपसिकल्स किंवा कँडी आईस्क्रीम. पॉपसिकल्स किंवा कँडी आईस्क्रीम वितळल्यानंतर त्याचा ज्यूस बनवून घरातील लहान मुलांना प्यायला देऊ शकतो. मुले खेळून परत आल्यानंतर त्यांना सरबत किंवा ज्यूस म्हणून देऊ शकतो. यामुळे आपले वितळलेले आईस्क्रीम वाया जाणार नाही. 

प्या गारेगार कोकोनट मँगो मिल्कशेक, उन्हाळा सुसह्य करणारी रेसिपी - हॉटेलपेक्षा भारी चव...

४. चॉकलेट आईस्क्रीम केक बनवा :- २ कप वितळलेल्या चॉकलेट आईस्क्रीममध्ये एक कप सेल्फ रेझिंग मैदा (हे सर्व प्रकारचे पीठ आहे ज्यामध्ये बेकिंग सोडाआणि बेकिंग पावडर मिसळलेले असते.) आणि १/४ चमचे बेकिंग पावडर घाला.  बेकिंग पावडर घातल्याने केक फुगीर आणि स्पंजी बनतो. हे पिठ चांगले मिक्स करावे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. नीट मिक्स केल्यानंतर, एका बेकिंग टिनमध्ये ठेवा आणि १७५ डिग्री सेल्सिअसवर ३० मिनिटे केक  बेक करून घ्यावा. अर्ध्या तासानंतर एकदा ते चांगले भाजले आहे की नाही ते तपासा आणि बेक झाल्यावर चोको चिप्स आणि मेल्टेड चॉकलेटने सजवा आणि सर्व्ह करा.

Web Title: How to Turn Melted Ice Cream Into a DELICIOUS Treat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.