रोजचा स्वयंपाक करताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांचा वापर करतो. या भांड्यांमध्ये काही भांडी ही नॉनस्टिक किंवा विशेष असे वेगळे कोटिंग केलेली असतात. नॉन-स्टिक पॅन (Non stick pan) आपल्या सगळ्यांच्याच किचनमधली एक अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. नॉन-स्टिक पॅनमध्ये एक विशेष कोटिंग असते जे अन्न तव्याला चिकटण्यापासून प्रतिबंधित करते. वापरायला सोपे आणि स्वस्तात मिळणारे नॉनस्टिक पॅन आपली बरीच कामं सोपी करतात, यात जेवण शिजवणं देखील आरामदायक ठरत. या प्रकारच्या नॉनस्टिक पॅन्सची खासियत वेगळी असते. यात बर्याच वेगवेळ्या डिशेस अगदी सहज शिजवल्या जाऊ शकतात ज्या सामान्य पॅनमध्ये बनवणे खूप कठीण असते.
नॉनस्टिक पॅन्समध्ये अन्न शिजवताना जळत तसेच चिकटत नाही, यामुळेच नॉन-स्टिक पॅनमध्ये अन्न शिजवणे सोपे जाते. असे असले तरीही कालांतराने या नॉनस्टिक पॅन्सचा सतत वापर करून त्यावरचे कोटिंग खराब होते. हे कोटिंग खराब झाल्यामुळे या पॅनमध्ये काही पदार्थ बनवल्यास ते तव्याच्या पृष्ठभागाला चिकटू लागतात. अशावेळी नेमके काय करावे किंवा नॉनस्टिक पॅन्सचे कोटिंग खराब होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, हे पाहूयात(How To Use And Care For Non-Stick Cookware, To Make Them Last For Years).
नॉनस्टिक पॅन्सला अन्न चिकटू लागले तर काय करावे ?
१. कुकिंग स्प्रेचा वापर करणे टाळावे :- नॉनस्टिक पॅन्समध्ये अन्न शिजवताना काहीजण सर्वातआधी पॅनमध्ये कुकिंग स्प्रे करुन मग स्वयंपाकाला सुरुवात करतात. परंतु असे कधीही करू नये हे चुकीचे आहे. नॉनस्टिक पॅन्समध्ये सर्वातआधी कुकिंग स्प्रेचा वापर केल्यास या कुकिंग स्प्रेचे काही कण तव्याच्या पृष्ठभागाला जाऊन चिकटतात आणि स्वयंपाक करताना हे कण जळू लागतात. यामुळे नॉनस्टिक पॅन्सचे विशेष कोटिंग खराब होऊ लागते. आपण नॉनस्टिक पॅन्समध्ये एकदा का अन्न शिजवण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर कुकिंग स्प्रेचा वापर केला तर हरकत नाही. परंतु अन्न पॅनमध्ये घालण्याच्या आधी कुकिंग स्प्रेचा चुकूनही वापर करु नये. यासाठीच नॉनस्टिक पॅन्समध्ये अन्न शिजवताना कुकिंग स्प्रेचा वापर करणे टाळावे. यामुळे नॉनस्टिक पॅन्सचे कोटिंग खराब होत नाही व पॅन दीर्घकाळ चांगला टिकून राहतो.
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत...
२. नॉनस्टिक पॅन्स व्यवस्थित गरम करा :- नॉनस्टिक पॅन्स व्यवस्थित गरम करून योग्य तापमानावर तापवून मगच त्यात अन्न शिजवण्यास सुरुवात करावी. जर आपण नॉनस्टिक पॅन्स गॅसवर गरम करण्यासाठी ठेवत असाल तर ते मंद ते मध्यम आचेवर ठेवूनच गरम करावेत. नॉनस्टिक पॅन्स एकदम मोठ्या आचेवर ठेवून गरम करु नयेत. जर आपण नॉनस्टिक पॅन्स एकदम मोठ्या आचेवर ठेवून गरम केले तर उष्णतेमुळे त्याचे कोटिंग जळू शकते. यामुळे पॅन लवकर खराब होऊ शकतो.
३. अन्न शिजवून पॅनमध्ये तसेच ठेवू नका :- नॉनस्टिक पॅन्समध्ये अन्न शिजवून ते तसेच त्या पॅनमध्ये ठेवू नका. यामुळे देखील त्या नॉनस्टिक पॅनचे कोटिंग खराब होऊ शकते. त्यामुळे एकदा का आपण नॉनस्टिक पॅन्स अन्न शिजवून तयार केले तर ते तसेच पॅनमध्ये न ठेवता एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे. जर आपण हे अन्न पॅनमध्ये शिजवून दीर्घकाळासाठी तसेच ठेवले तर पॅनचे कोटिंग खराब होऊ शकते.
तव्यावर काळे डाग पडले, तेलकट-चिकट थर साचला ? ३ सोप्या ट्रिक्स, तवा दिसेल नवाकोरा चकचकीत...
बिडाचा तवा विकत तर आणला पण तो ' सिझन ' कसा करायचा? १० टिप्स, वापरायला झटपट तयार...
४. योग्य चमच्यांचा वापर करा :- नॉनस्टिक पॅन्स हे एका वेगळ्या विशेष कोटिंग पासून तयार केलेले असतात. त्यामुळे त्यांचे कोटिंग खराब होऊ नये म्हणून अशा भांड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. नॉनस्टिक पॅन्सचे कोटिंग खराब होऊ नये म्हणून अन्नपदार्थ चमच्याने ढवळताना स्टीलचा चमचा वापरु नये, यामुळे पॅनवर चरे पडून कोटिंग खराब होण्याची शक्यता असते. हे कोटिंग खराब होऊ नये म्हणून शक्यतो नॉनस्टिक पॅन्समधील अन्नपदार्थ ढवळताना लाकडी चमच्यांचा वापर करावा.
५. पॅनच्या स्वच्छतेबाबत :- कोमट पाणी या तव्यावर किंवा पॅनमध्ये घालून त्यात साबण घालून ठेवा, त्यानंतर तवा हलक्या हाताने स्वच्छ करा. त्यामुळे तवा दिर्घकाळ चांगला राहण्यास मदत होईल. पॅन गरम असताना तो धुवू नका, कारण त्यामुळे त्याचा वरचा थर खराब होण्याची शक्यता असते. तवा पूर्ण गार होऊद्या आणि मगच धुवा. नॉनस्टिक पॅन घासण्यासाठी माईल्स लिक्विड सोप आणि स्पंज पुरेसा असतो. कोमट पाण्यात लिक्विड सोप घालून मग स्पंजने हलक्या हाताने हा तवा किंवा पॅन घासल्यास तो सहज स्वच्छ होतो. तारेची घासणी तव्याला अजिबात लावू नका, त्यामुळे तव्याचे कोटींग खराब होते. तवा धुवून झाल्यानंतर तो ठेवताना त्याला न विसरता २ थेंब तेल लावून ठेवा. त्यामुळे हा तवा दिर्घकाळ चांगला राहण्यास मदत होते.