आजकाल चायनीज पदार्थ म्हटले की आपल्यासमोर सर्वात आधी येतात ते न्युडल्स. आपण मोठमोठाल्या हॉटेल्स किंवा रेस्टोरंटमध्ये गेल्यावर सर्वात आधी न्युडल्स आवडीने ऑर्डर करून खातो. आपण जितक्या आवडीने न्युडल्स मागवतो तितकेच ते खाण्याची काहींच्या मनात भीती असते. न्युडल्स सोबत येणाऱ्या चॉपस्टिक पाहूनच काहींना धडकी भरते. या चॉपस्टिक्सनी न्युडल्स खायचे म्हटलं की चक्क काहींना भीतीच वाटते. परंतु मोठमोठाल्या, हायफाय हॉटेलमध्ये जाऊन चॉपस्टिकने (How to eat with chopstick) नूडल्स खायचं म्हटलं की जाम नकोसं होतं. सर्वांसमोर उगीच लाजिरवाणी वेळ स्वत:वर ओढवून घ्यायला नको, म्हणून मग आपण नूडल्स खाण्याची जबरदस्त इच्छा असूनही नूडल्सला नाही म्हणतो. अगदी बरोबर त्याचवेळी नेमकं आपल्या आजूबाजूचे लोक कसे दोन बोटात चॉपस्टिक धरून अगदी झकासपैकी नूडल्स खात आहेत, हे पाहून आपल्याला त्याचं कौतूक वाटतं. ते जसे चॉपस्टिकने अगदी बिनधास्तपणे न्युडल्स खातात तसेच आपल्याला देखील खाता यावे अशी आपली मनोमन इच्छा असतेच. खरं तर त्यात काहीच अवघड नसतं, फक्त काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. या अगदी बेसिक गोष्टींची काळजी घेतली तर आपण देखील इतरांप्रमाणे सहज चॉपस्टिकने न्युडल्स खाऊ शकतो.
हा व्हिडिओ मास्टर शेफ कुणाल यांनी त्यांच्या Chefkunal या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. चॉपस्टिकने न्युडल्स खाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा व्हिडीओ अतिशय उपयुक्त आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच असं लक्षात येतं की अरेच्चा, हे तर किती सोपं होतं आणि आपण उगाच याला घाबरत होतो.. म्हणूनच त्यांनी दिलेल्या टिप्स व्यवस्थित लक्षात घ्या आणि आजच चॉपस्टिकने नूडल्स किंवा इतर चायनिज पदार्थ खाण्याचा प्रयोग करून बघा(How to Use Chopsticks for Beginners, Easy 5 Minute Step by Chef Kunal Kapoor).
चॉपस्टिक नेमकं कसं पकडायचं...
१. चॉपस्टिक कधीही खालच्या बाजूने पकडायचं नाही. ते नेहमी वरच्या बाजूने पकडा.
२. तुमच्या उजव्या हाताचा अंगठा आणि पहिले बोट यांच्यात जी जागा आहे त्यामध्ये एक चॉपस्टिक ठेवा.
अंगठा आणि पहिले बोट जवळ करून चॉपस्टिक त्यात एकदम फिट बसली पाहिजे, याकडे लक्ष द्या.
३. इतके करूनही जर आपल्याला चॉपस्टिकने खाता येत नसेल तर दोन्ही चॉपस्टिक हातात पकडून त्यांच्या वरच्या टोकाला रबर बँडने एकत्रित बांधून घ्यावे.
आता कॉफी क्युब्स वापरून केवळ २ मिनिटांत बनवा इन्स्टंट कॉफी ! या कॉफी क्युब असतात काय?
उरलेल्या इडलीची करा चिली इडली, पदार्थ देशी - चव चटपटीत चायनीज...
४. चॉपस्टिकच्या वरच्या टोकांना एकत्रित बांधून घेतल्यानंतर एक आयताकृती कागदाचा छोटा तुकडा घ्यावा.
५. आता या आयाताकृती कागदाच्या तुकडयाची गोल गोल गुंडाळून एक सुरनळी बनवून घ्यावी.
टोमॅटो महाग झाले तर आंबटपणासाठी वापरा ६ गोष्टी, टोमॅटोचा रसरशीतपणा नाही, काम भागेल...
६. यानंतर ही बनवून घेतलेली सुरनळी दोन्ही चॉपस्टिकच्या बरोबर मध्यभागी अडकवून घ्यावी.
७. ही कागदाची सुरनळी अशी दोन्ही चॅपस्टिकच्या मध्यभागी अडकवून ठेवल्याने त्या दोघांच्या मध्ये एक प्रकारचे योग्य अंतर राखले जाईल जेणेकरून आपल्याला चॉपस्टिकने खाणे सोपे जाईल. अशाप्रकारे थोडीशी प्रॅक्टीस केली तर चॉपस्टिकने खाणं अजिबातच अवघड नाही, हे आपल्याला जाणवू लागेल.