Lokmat Sakhi >Food > स्वयंपाकात कोथिंबीर तर हवीच, पण वापरता कमी आणि फेकताच तुम्ही जास्त! पाहा ‘हा’ योग्य वापर...

स्वयंपाकात कोथिंबीर तर हवीच, पण वापरता कमी आणि फेकताच तुम्ही जास्त! पाहा ‘हा’ योग्य वापर...

How To Use Coriander Stems : What To Do With The Coriander Stem : 6 Ways To Use Coriander Stem : Tips For Using Coriander Stem : आपण फक्त कोथिंबिरीच्या पानांचाच वापर करुन देठ फेकून देतो, पण असे न करता कोथिंबीर कशी वापरावी ते पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2024 06:27 PM2024-12-05T18:27:11+5:302024-12-05T18:28:04+5:30

How To Use Coriander Stems : What To Do With The Coriander Stem : 6 Ways To Use Coriander Stem : Tips For Using Coriander Stem : आपण फक्त कोथिंबिरीच्या पानांचाच वापर करुन देठ फेकून देतो, पण असे न करता कोथिंबीर कशी वापरावी ते पहा...

How To Use Coriander Stems 6 Ways To Use Coriander Stem Tips For Using Coriander Stem | स्वयंपाकात कोथिंबीर तर हवीच, पण वापरता कमी आणि फेकताच तुम्ही जास्त! पाहा ‘हा’ योग्य वापर...

स्वयंपाकात कोथिंबीर तर हवीच, पण वापरता कमी आणि फेकताच तुम्ही जास्त! पाहा ‘हा’ योग्य वापर...

हिवाळ्यात बाजारांत छान हिरवीगार कोथिंबिरीची जोडी (How To Use Coriander Stems) विकायला ठेवलेली असते. अशी हिरवीगार कोथिंबिरीची जुडी पाहून आपण किमान दोन जुड्या तर नक्कीच घेतो. या कोथिंबिरीच्या जुड्या आपण घरी आणून त्याची पान निवडून फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवतो. त्यानंतर जशी लागेल तशी कोथिंबीर (6 Ways To Use Coriander Stem) वापरतो. पोहे, उपमा, वरण, मिसळ,रस्सेदार भाज्या अशा काही मोजक्याच पदार्थांवर आपण कोथिंबीर भुरभुरवून टाकतो. एखाद्या पदार्थात कोथिंबीर घातली की त्या पदार्थाचा स्वाद आणि चव दुपटीने वाढते(Tips For Using Coriander Stem).

 कुठलाही पदार्थ केला की तो सजवण्याचा सोपा उपाय म्हणजे वरुन कोथिंबीर भुरभुरणे. पण कोथिंबीर ही पदार्थात प्रामुख्याने वरुन टाकली जाते. त्यामुळे कोथिंबीर फक्त पदार्थ सजवण्यासाठी किंवा विशिष्ट चवीसाठीच असते असा समज अनेकांचा असतो. पण कोथिंबीर ही केवळ पदार्थ सजवण्यासाठी किंवा विशिष्ट स्वादापुरतीच मर्यादित नसून कोथिंबीर व तिचे देठ खाण्याचे अनेक फायदे आहेत. कोथिंबीरमधे असलेल्या आवश्यक गुणधर्मांमुळे रोजच्या आहारात कोथिंबीर ही असलीच पाहिजे असे आहारतज्ज्ञ सांगतात. यासाठीच कोथिंबीरीचे देठ फेकून न देता त्याचा रोजच्या स्वयंपाकात कसा वापर करावा ते पाहूयात.

कोथिंबीर वापरण्याची योग्य पद्धत... 

कोथिंबीर बाजारांतून विकत आणली की शक्यतो आपण कोथिंबिरीची फक्त पानं निवडून त्याचे देठ चक्क फेकून देतो. परंतु कोथिंबीरीचे देठ हे निरुपयोगी नसून त्यातील बहुगुणी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. कोथिंबीरच्या देठामध्ये प्रथिनं, कर्बोदकं, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, झिंक, अ, ब6, क, ई, के यासारखी महत्त्वाची जीवनसात्त्वं, फोलेट, कोलिन यासारखे पौष्टिक घटक असतात . हे सर्व घटक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास, आरोग्य चांगलं राखण्यास, तसेच आरोग्याशी निगडित महत्त्वाच्या समस्यांवर उपाय करण्यास फायदेशीर ठरतात. यासाठीच कोथिंबीरीचे देठ फेकून न देता सुरीच्या मदतीने बारीक चिरुन आपण वेगवेगळ्या प्रकारे रोजच्या आहारात वापरु शकता. कोथिंबीरचा वापर करताना फक्त त्याच्या पानांचाच वापर न करता आपण त्यांच्या देठांचा देखील अनेक पदार्थांमध्ये वापर करु शकतो.  

बाजरीची भाकरी नी उडदाचं घुटं, अस्सल मराठी झणझणीत बेत! खा घुटं, बाकी सगळं त्यासमोर फिकं...

कोथिंबीरीचे देठ रोजच्या आहारात कसे वापरावेत ?

१. सूपमध्ये घाला :- कोथिंबीरीचे देठ आपण एकदम बारीक चिरुन सूप मध्ये घालू शकता. यामुळे सूपची चव आणखीनच छान लागते तसेच कोथिंबीरचा फ्लेवर त्या सूपमध्ये उतरतो. 

२. चटणी करण्यासाठी वापरा :- कोथिंबीरच्या पानांप्रमाणेच आपण चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीरच्या देठाचा वापर करु शकतो. जर चटणी करताना त्यात कोथिंबीर कमी पडत असेल तर कोथिंबीरचे हिरवेगार देठ धुवून बारीक कापून घालावेत. यामुळे चटणी चवीला स्वादिष्ट तर होतेच सोबत चटणीचा रंग देखील हिरवागार होतो.

३. मॅरीनेट करताना वापरा :- आपण काही असे पदार्थ करतो की ते करण्याआधी आपण त्याला छान मॅरीनेट करुन घेतो. कोणताही पदार्थ मॅरीनेट करताना आपण त्यात सुके मसाले, आलं - लसूण पेस्ट, लिंबाचा रस असे अनेक पदार्थ घालतो त्याचप्रमाणे आपण यात कोथिंबीरचे देठ देखील घालू शकता.

४. सॅलड किंवा कोशिंबीरमध्ये वापरा :- कोथिंबीरचे देठ फेकून न देता ते सॅलड किंवा कोशिंबीरमध्ये बारीक चिरुन घालू शकता. यामुळे सॅलड कोशिंबीरची पौष्टिकता तर वाढतेच सोबतच ते चवीला देखील तितकेच चांगले लागते.

भारती सिंग लेकासाठी करते थंडीत खास पौष्टिक लाडू, पाहा तिनं सांगितलेली खास रेसिपी...

अग्गबाई! सुक्या भाजीत तेल जास्त पडलं? टेंन्शन न घेता करा ३ ट्रिक्स, तेल होईल चटकन कमी-भाजी टेस्टी...

५. भात तयार करताना वापरा :- आपण साधा पांढरा भात, पुलाव, बिर्याणी असे भाताचे अनेक प्रकार तयार करतो. भाताचे अनेक प्रकार तयार करताना आपण त्यात कोथिंबीरचे देठ घालू शकतो.

६. तळलेल्या पदार्थांमध्ये वापरा :- भजी, वडे, बटाट्याचे - वांग्याचे काप, बेसन चिला असे तळणीचे पदार्थ तयार करताना त्याच्या बॅटरमध्ये कोथिंबीरचे देठ बारीक कापून घालावेत. यामुळे तळणीचे पदार्थ कुरकुरीत तर होतातच शिवाय ते चवीला देखील अधिक रुचकर व चविष्ट लागतात.

Web Title: How To Use Coriander Stems 6 Ways To Use Coriander Stem Tips For Using Coriander Stem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.