Lokmat Sakhi >Food > दिवाळीतला चिवडा उरला आहे, खाऊन खाऊन कंटाळलात? करा चिवड्याचे खमंग थालीपीठ.. बघा सोपी कृती

दिवाळीतला चिवडा उरला आहे, खाऊन खाऊन कंटाळलात? करा चिवड्याचे खमंग थालीपीठ.. बघा सोपी कृती

Tasty Recipe From Leftover Chivda: दिवाळीत केलेला चिवडा अजूनही डब्यांमध्ये लोळत पडला असेल आणि आता तो खाण्याचाही कंटाळा आला असेल तर ही एक रेसिपी बघून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 04:15 PM2022-11-01T16:15:30+5:302022-11-01T16:16:14+5:30

Tasty Recipe From Leftover Chivda: दिवाळीत केलेला चिवडा अजूनही डब्यांमध्ये लोळत पडला असेल आणि आता तो खाण्याचाही कंटाळा आला असेल तर ही एक रेसिपी बघून घ्या.

How to use leftover Chivda? Delicious paratha recipe from leftover chivda | दिवाळीतला चिवडा उरला आहे, खाऊन खाऊन कंटाळलात? करा चिवड्याचे खमंग थालीपीठ.. बघा सोपी कृती

दिवाळीतला चिवडा उरला आहे, खाऊन खाऊन कंटाळलात? करा चिवड्याचे खमंग थालीपीठ.. बघा सोपी कृती

Highlights तुमच्या घरातला चिवडाही संपता संपत नसेल, तर उरलेल्या चिवड्यापासून ही एक खमंग रेसिपी करून बघा.

मुरमुऱ्याचा, भाजक्या पोह्यांचा, रेशीम पोह्यांचा, मक्याचा असे चिवड्याचे वेगवेगळे प्रकार आपण दिवाळीमध्ये करत असतो.  काही घरी केलेले असतात तर काही इतरांकडून आपल्यासाठी आलेले असतात. सुरुवातीला असे वेगवेगळे चिवडे आपण हौशीने खातो. पण नंतर मात्र त्यांचा कंटाळा येऊ लागतो. चिवडाच काय पण दिवाळीचा बाकीचा फराळही मग संपवणं अवघड  होतं. तुमच्या घरातला चिवडाही (Recipe From Leftover Chivda) संपता संपत नसेल, तर उरलेल्या चिवड्यापासून ही एक खमंग रेसिपी करून बघा. Ruchkar Mejwani या यु ट्यूब चॅनलवर ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे.(Delicious paratha recipe from leftover chivda)

 

चिवड्याचं थालीपीठ कसं करायचं?
साहित्य

१ वाटी चिवडा मिक्सरमधून बारीक करून घ्या

१ छोटी वाटी कणिक

१ छोटी वाटी बेसन

'ती' निवांत गाणी ऐकत पडली होती, तेवढ्यात एक पक्षी आला आणि.... बघा व्हायरल व्हिडिओ

१ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला

बारीक चिरलेली कोथिंबीर,

थोडीशी हळद, तिखट आणि मीठ चवीनुसार.

 

कृती
एका भांड्यात वरील सगळे साहित्य घ्या.

चिवड्यात तिखट आणि मीठ असतेच. त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच थालीपीठासाठी मीठ आणि तिखट टाका. 

दातांचा पिवळेपणा, दातदुखी, तोंडाची दुर्गंधी होईल कमी, बघा तज्ज्ञांनी सांगितलेला घरगुती उपाय

आता पाणी टाकून सगळे मिश्रण मळून घ्या.

तव्याला तेल लावा. त्यावर थालीपीठाच्या पिठाचा एक गोळा ठेवा आणि तो व्यवस्थित थापून घ्या. 

थालीपीठाला मधोमध छिद्र पाडा. थालीपिठाच्या सगळ्या बाजुंनी आणि मधोमध तेल सोडा आणि तो तवा गॅसवर तापायला ठेवून द्या.

तव्यावर झाकण ठेवा म्हणजे छान वाफेवर थालीपीठ खमंग भाजून निघेल. 

 

चिवड्याचा असा उपयोगही करू शकता
- चिवड्याचं थालीपीठ करायचं नसेल तर मिक्सरमधून काढलेला चिवड्याचा चूरा तुम्ही पातळ भाजीत दाण्याचा कुट टाकण्याऐवजी घालू शकता.

- भाजी आणखी चवदार होईल. 


 

Web Title: How to use leftover Chivda? Delicious paratha recipe from leftover chivda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.