बटाटा ही अशी एक भाजी आहे जी स्वयंपाकघरात सर्वात जास्त केली जाते. ही भाजी विशेषतः लहान मुलांना खूप आवडते. त्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात. बटाट्याची कोणतीही रेसिपी बनवण्यापूर्वी आपण बटाट्याचं साल काढून फेकून देतो, परंतु जेव्हा तुम्हाला त्याचे फायदे कळतील तेव्हा पुढच्या वेळी तुम्ही फेकून देण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल. बटाट्याची साल तुमच्यासाठी कशी उपयुक्त ठरू शकते ते जाणून घेऊया...
बटाट्याच्या सालीचे फायदे
- बटाट्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, आयर्न आणि व्हिटॅमिन बी३ सारखे पोषक घटक असतात. जर तुम्ही सालीसकट बटाट्याची भाजी खाल्ली तर तुमच्या शरीरात या पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही.
- सालीतील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करू शकतात. तसेच तुमच्या हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घेता येते.
- बटाट्याची साल तुमच्या हाडांना बळकटी देण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. यामुळे बोन डेन्सिटी वाढते.
बटाट्याच्या सालीचे इतर फायदे
- बटाट्याच्या सालीपासून तुम्ही सेंद्रिय खत देखील बनवू शकता. तुम्ही हे कुंडीतील रोपांमध्ये वापरू शकता.
- बटाट्याच्या सालीचा वापर तुम्ही शूज किंवा चामड्याच्या बॅग चमकवण्यासाठी करू शकता.
- बटाट्याची साल पाण्यात उकळून, गाळून ते पाणी केसांना लावून तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करू शकता.
- बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त असतात.
- तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर आणि केसांवर मास्क म्हणून वापरू शकता.
- बटाट्याच्या सालीमध्ये एक रसायन असतं, जे कीटकांना आकर्षित करतं. ही कीटकनाशक म्हणून देखील वापरली जाऊ शकते.