Join us  

पावसाळ्यात भाज्या नीट धुतल्या नाहीतर पडाल आजारी, भाज्या धुण्याची सोपी पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 6:45 PM

Simple way to clean fresh fruit & vegetables during Monsoons : पावसाळ्यात फळं आणि भाजीपाला स्वच्छ करुन मगच खा, ही घ्या स्वच्छ करण्याची सोपी पद्धत..

पावसाळ्यात पाऊस आणि ओलाव्यामुळे फळे आणि भाज्या अधिक खराब होतात. बाजारातून आपण या महागड्या भाज्या आणतो परंतु या भाज्या नीट साठवल्या नाहीत तर त्या लवकर सडू लागतात. भाज्या दीर्घकाळ फ्रेश राहण्यासाठी वेळोवेळी त्यावर पाणी टाकले जाते. परंतु पावसाळ्याच्या अशा परिस्थितीत हवामानातील पाणी आणि आर्द्रता यामुळे फळे आणि भाज्या लवकर खराब व्हायला लागतात. जर पावसाचे पाणी फळे आणि भाज्यांवर तसेच राहिले तर त्या सडून जाऊ शकतात. त्याचबरोबर पावसाळ्यात फळे आणि भाज्या शिजवण्यापूर्वी काही खास गोष्टींची काळजी घेतली नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते(How to Wash Fruits and Vegetables in monsoon season).

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. म्हणूनच खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यायला हवे. पावसाळ्यात विशेषत फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून घेतल्याशिवाय खाऊ नये, कारण त्यातून आपल्या शरीरात विषाणू आणि जीवाणू जाण्याचा धोका जास्त असतो. या काळात भाज्या आणि फळांमध्ये  छोटे-छोटे किडे आणि जीवाणू असतात. भाजी कितीही धुतली तरी ते जीवाणू तसेच राहतात, म्हणून शक्यतो पावसाळ्यात फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून स्टोअर कराव्यात(Simple way to clean fresh fruit & vegetables during Monsoons).

साहित्य :- 

१. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून २. व्हिनेगर - १ टेबलस्पून ३. कोमट पाणी - २ कप

मुसळधार कोसळणाऱ्या पावसांत कुठे अडकलात तर? कायम बॅगेत ठेवा ५ वस्तू, राहा सुरक्षित रोजच...

मुसळधार पावसात खा गरमागरम मक्याचे आप्पे, झटपट होणारी खमंग, क्रिस्पी सोपी रेसिपी... 

कृती :- 

१. सगळ्यात आधी ज्या भाज्या धुवून स्वच्छ करायच्या त्या एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्याव्यात. २. आता या भाज्या सर्वात आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. ३. त्यानंतर त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा व व्हिनेगर घालावे. 

४. आता या भांड्यात २ ते ३ कप कोमट गरम पाणी ओतावे.  ५. ५ ते १० मिनिटे ही भाजी या पाण्यांत तशीच ठेवून द्यावी. ६. त्यानंतर भाजी या द्रावणातून काढून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. 

या सोप्या पद्धतीने आपण पावसाळ्यात भाजी धुवून स्वच्छ करु शकतो. 

आणखीन काही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. पावसाळ्यात बॅक्टेरिया टाळण्यासाठी थंड पाण्याऐवजी भाज्या आणि फळे कोमट पाण्याने धुवा. 

२. फळं आणि पालेभाज्या धुण्यासाठी रासायनिक क्लिनरचा वापर करणे टाळावे. 

३. फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी भाज्या किंवा फळे स्वच्छ टॉवेलने पुसून वाळवा, जेणेकरुन भाज्या, फळे ओलाव्याने खराब होणार नाही. 

४. भाजी धुताना कुजलेला भाग दिसला तर तो भाग आधीच कापून टाका म्हणजे बाकीच्या भाज्या खराब होणार नाहीत.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सस्वच्छता टिप्स