Lokmat Sakhi >Food > हिरव्यागार द्राक्षांवर पांढरा थर ? पाहा द्राक्ष स्वच्छ धुण्याची नवी सोपी ट्रिक...

हिरव्यागार द्राक्षांवर पांढरा थर ? पाहा द्राक्ष स्वच्छ धुण्याची नवी सोपी ट्रिक...

How to Wash Grapes So They Stay Fresh For A Month : How to Wash and Store Grapes So They Stay Fresh : The best way to wash and store grapes to make it last longer : द्राक्ष कशी स्वच्छ करावीत आणि महिनाभर खराब न होऊ देता स्टोअर कशी करावीत याच्या खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2025 13:21 IST2025-02-08T13:05:15+5:302025-02-08T13:21:31+5:30

How to Wash Grapes So They Stay Fresh For A Month : How to Wash and Store Grapes So They Stay Fresh : The best way to wash and store grapes to make it last longer : द्राक्ष कशी स्वच्छ करावीत आणि महिनाभर खराब न होऊ देता स्टोअर कशी करावीत याच्या खास टिप्स...

How to Wash Grapes So They Stay Fresh For A Month How to Wash and Store Grapes So They Stay Fresh The best way to wash and store grapes to make it last longer | हिरव्यागार द्राक्षांवर पांढरा थर ? पाहा द्राक्ष स्वच्छ धुण्याची नवी सोपी ट्रिक...

हिरव्यागार द्राक्षांवर पांढरा थर ? पाहा द्राक्ष स्वच्छ धुण्याची नवी सोपी ट्रिक...

सध्या थंडीचा सिझन सुरु आहे. या हिवाळा ऋतूत बाजारामध्ये फळं, भाज्या अगदी फ्रेश आणि ताज्या विकत मिळतात. विशेष करुन हिवाळ्यात येणाऱ्या फळांसाठी आपल्या वर्षभर (How to Wash Grapes So They Stay Fresh For A Month) वाट बघावी लागते. या सिझनमध्ये येणारी द्राक्षे, स्ट्रॉबेरी, किवी, संत्री, डाळिंब अशी फळे आपण नक्कीच विकत घेतो. अशी वेगवेगळ्या प्रकारची सिझनल फळं तर आपण या ऋतूंत खातो, पण त्यातही द्राक्ष सगळ्यांच्या विशेष आवडीची( The best way to wash and store grapes to make it last longer).

काळी, हिरवी, लाल अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये येणारी ही आंबट - गोड द्राक्षे आपण मोठ्या हौसेने विकत आणतो. परंतु ही द्राक्ष विकत आणल्यावर बरेचदा आपण बघतो की त्यावर एक प्रकारचा हलका पांढरा धुरकट असा थर असतो. हा थर म्हणजेच द्राक्षांवर केलेली कीटकनाशक आणि औषधांची फवारणी असते. असे हानिकारक घटक आपल्या पोटात जाऊ नयेत यासाठी द्राक्ष स्वच्छ धुवून खाणे गरजेचे असते. कित्येकदा द्राक्ष फक्त पाण्याने धुतल्याने त्यावरचा हा पांढरा थर सहजासहजी जात नाही. अशावेळी द्राक्ष एका विशिष्ट पद्धतीने धुण्याची गरज असते. द्राक्ष धुण्याची ही नवीन पद्धत नेमकी कोणती, तसेच द्राक्ष ही नाशवंत फळांपैकी एक असल्याने ती लवकर खराब होतात. असे होऊ नये यासाठी द्राक्ष किमान महिनाभर तरी टिकवून ठेवण्यासाठी ती कशी स्टोअर करावी याची देखील झटपट ट्रिक पाहूयात. इंस्टाग्रामवरील alshihacks या अकाउंटवरून द्राक्ष कशी स्वच्छ करावीत आणि महिनाभर खराब न होऊ देता स्टोअर कशी करावीत, याची ट्रिक शेअर केली आहे(How to Wash and Store Grapes So They Stay Fresh).

१. द्राक्ष कशी धुवून स्वच्छ करावीत ? 

बाजारांतून विकत आणलेली द्राक्ष स्वच्छ करण्यासाठी आपल्याला पाणी आणि बेकिंग सोडा या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. सगळ्यांत आधी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घ्यावे. या पाण्यांत १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. बेकिंग सोडा पाण्यांत घातल्यावर चमच्याने हलवून तो संपूर्णपणे पाण्यांत विरघळवून घ्यावा. त्यानंतर द्राक्षे या बेकिंग सोड्याच्या पाण्यांत घालून स्वच्छ धुवून घ्यावीत. आपण १० ते १५ मिनिटे ही द्राक्षे या पाण्यांत देखील बुडवून ठेवू शकतो. त्यानंतर एक स्वच्छ सुती कापड किंवा छोटे टॉवेल घेऊन त्यावर ही द्राक्ष पसरवून हलकेच कापडाने पुसून घ्यावीत. त्यानंतर १० ते १५ मिनिटे या कापडावर ही द्राक्षे पसरवून ठेवावीत. द्राक्ष संपूर्णपणे सुकवून घ्यावीत. त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे काढून घ्यावा. 

मेदू वडा उरला ? मग करा चमचमीत चवीचा 'मेदू वडा बर्गर', करायला सोपा खायला चटपटीत असा पदार्थ...

मूठभर मेथी-कपभर ताक, करा ‘मेथी कढी’, चव अशी की मारावा मस्त भुरका...

२. द्राक्ष महिनाभर चांगली राहण्यासाठी कशी स्टोअर करावी ?  

द्राक्ष स्टोअर करताना ती सगळ्यात आधी संपूर्णपणे वाळली आहेत का याची खात्री करुन घ्यावीत. त्यानंतर आपण ज्या कंटेनरमध्ये द्राक्ष स्टोअर करुन ठेवणार आहोत. त्या कंटेनरच्या तळाशी एक टिश्यू पेपरचा तुकडा अंथरुन घ्यावा. त्यानंतर त्यात ही द्राक्ष ओतून घ्यावीत. मग या द्राक्षाच्या वर पुन्हा एक टिश्यू पेपर अंथरुन ठेवून द्यावा. मग कंटेनरचे झाकण व्यवस्थित लावून घ्यावे. शक्यतो, एअर टाईट कंटेनरचाच वापर करावा. त्यानंतर हा कंटेनर फ्रिजमध्ये ठेवून द्यावा. अशाप्रकारे आपण द्राक्ष स्वच्छ धुवून ती महिन्याभरासाठी स्टोअर करुन ठेवू शकता.


Web Title: How to Wash Grapes So They Stay Fresh For A Month How to Wash and Store Grapes So They Stay Fresh The best way to wash and store grapes to make it last longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.