Lokmat Sakhi >Food > स्वयंपाक करताना, कुकर लावताना डाळी धुण्याची -भिजत घालण्याची योग्य पद्धत; ४ कुकिंग टिप्स

स्वयंपाक करताना, कुकर लावताना डाळी धुण्याची -भिजत घालण्याची योग्य पद्धत; ४ कुकिंग टिप्स

How to Wash Pulses : डाळ तांदुळ आपण धुतोच, कुकर लावतो. मात्र अनेकदा डाळी शिजत नाहीत, किंवा मग फार भिजट होतात. नेमकं चुकतं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:10 PM2022-07-29T20:10:44+5:302022-07-30T13:15:22+5:30

How to Wash Pulses : डाळ तांदुळ आपण धुतोच, कुकर लावतो. मात्र अनेकदा डाळी शिजत नाहीत, किंवा मग फार भिजट होतात. नेमकं चुकतं काय?

How to Wash Pulses : Which method are used for cleaning grain | स्वयंपाक करताना, कुकर लावताना डाळी धुण्याची -भिजत घालण्याची योग्य पद्धत; ४ कुकिंग टिप्स

स्वयंपाक करताना, कुकर लावताना डाळी धुण्याची -भिजत घालण्याची योग्य पद्धत; ४ कुकिंग टिप्स

वरण भात हे आपलं कम्फर्ट फूड असतं. वरण केलं नाही तरी डाळ बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते.(How to Wash Pulses) डाळींतून भरपूर प्रोटीन मिळतात. रोजच्या जेवणात तर डाळभात, खिचडी असतेच. मात्र अनेकदा डाळी शिजतच नाहीत, कधीकधी आपण डाळी भिजत घालतो, घसाघसा धुतो हे योग्य की अयोग्य? डाळ धुण्याची, भिजवण्याची आणि तयार करण्याची खास पद्धत  असते.  नेमकं काय आहे त्यामागचं योग्य शास्त्र, ते पाहूया..(Which methतod are used for cleaning grain)

डाळी आपण दुकानातून आणतो, हाताला काही पावडर लागते. त्याला काही पावडरी लावलेल्या असतात. कधी खडागोटा असतो. पिवळ-पांढरे खडे असतात. ते बारकाईने पाहून, निवडून, चाळून घ्या. 

डाळी स्वच्छ धुण्याची पद्धत

पिवळ्या डाळी  पाण्यात भिजवल्या नाहीत तरी लवकर शिजतात.  तूर, लाल मसूर, पिवळी मसूर, हरभरा या डाळी पाण्याखाली धरुन धुवाव्यात. घसाघसा चार-पाचवेळा घासू नये. एकदा पाणी घालून धुतल्या तरी पुरते. मात्र या डाळी जर पिण्याच्या पाण्यात भिजवून ठेवल्या तर जास्त लवकर आणि चांगल्या शिजतात.

जाड डाळी धुण्याची पद्धत

राजमा, चणे, हरभरा यांसारख्या जाड डाळी चांगल्या धुवून घ्याव्यात. त्यांना अधिक भिजवण्याची देखील आवश्यकता आहे.  बनवण्याआधी एक रात्र आधी किंवा 5-6 तास गरम पाण्यात भिजवून ठेवावे. प्रथम डाळी नीट स्वच्छ करा. यानंतर या डाळी किमान 5-6 वेळा स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. कडधान्ये दोन्ही हातांनी धुवून घ्यावीत. यानंतर या डाळी भिजवण्यासाठी आधी गरम पाणी करून नंतर भिजवा.

कोणती डाळ किती वेळ भिजवायची

 

मूग, मसूर, उडीद, तूर या डाळी संपूर्ण  ४-६ तास भिजत ठेवाव्यात.

राजमा, हरभरा, चणे यांसारख्या डाळी किमान ६ तास भिजत ठेवाव्यात.

Web Title: How to Wash Pulses : Which method are used for cleaning grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.