Join us  

पाण्यानं धुतली म्हणजे स्ट्रॉबेरी स्वच्छ झाली? पाहा स्ट्रॉबेरी धुण्याची ‘ही’ योग्य पद्धत, अळ्याही निघतील बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 3:20 PM

How To Wash Strawberries Perfectly?: स्ट्रॉबेरी कधीही नुसत्या पाण्याने धुवून खाऊ नये. कारण ती कधीच पुर्णपणे स्वच्छ होत नाही. म्हणूनच पाहून घ्या स्ट्रॉबेरी धुण्याची ही योग्य पद्धत...(Proper method of washing strawberry)

ठळक मुद्देआपल्या नेहमीच्या फळं धुण्याच्या पद्धतीनुसार तुम्ही जी स्ट्रॉबेरी धुतली आहे, त्यात किती अळ्या आहेत, हे बघायचे असेल तर एकदा हा पुढे दिलेला प्रयोग करून पाहा..

स्ट्रॉबेरीचा हंगाम आता सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या आणि येत्या एखाद्या महिन्यात बाजारात भरपूर स्ट्रॉबेरी विकायला येतात. एरवी हे फळ खायला मिळत नाही. त्यामुळे या काही दिवसांत लहान- मोठे असे सगळेच स्ट्राॅबेरीप्रेमी स्ट्रॉबेरी दिसली की त्यावर तुटून पडतात. आता तुम्हीही इतर कोणतेही फळ धुता, त्यापद्धतीने स्ट्रॉबेरी धुत असाल तर तिच्यातले बॅक्टेरिया किंवा लहान अळ्या कधीच स्वच्छ होणार नाहीत (How To Wash Strawberries Perfectly?). आपल्या नेहमीच्या फळं धुण्याच्या पद्धतीनुसार तुम्ही जी स्ट्रॉबेरी धुतली आहे (Proper method of washing strawberry), त्यात किती अळ्या आहेत, हे बघायचे असेल तर एकदा हा पुढे दिलेला प्रयोग करून पाहा...(cleaning tips for strawberry)

 

स्ट्रॉबेरी धुण्याची योग्य पद्धत

स्ट्रॉबेरी हे फळ नेमक्या कशा पद्धतीने धुवावं, याविषयीचा एक महत्त्वाची माहिती देणारा छोटासा व्हिडिओ mrfitsingh and aarohikapoorsingh या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओनुसार स्ट्रॉबेरी धुवायची असेल तर सगळ्यात आधी पाणी थोडं कोमट करून घ्या. 

पॉपकॉर्न नेहमीच खाता, आता पॉपकॉर्न सूप प्या- ही घ्या कुणाल कपूर यांनी शोधून काढलेली भन्नाट रेसिपी

हे गरम पाणी एका भांड्यात काढा. त्यामध्ये स्ट्रॉबेरी टाका.

या पाण्यात आता २ टेबलस्पून बेकिंग सोडा आणि १ टेबलस्पून व्हिनेगर टाका.

 

१० ते १२ मिनिटे स्ट्रॉबेरी या पाण्यात राहू द्या. त्यानंतर पाण्यातून स्ट्रॉबेरी काढून घ्या आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

फक्त २० रुपयांत घरीच करा अगदी विकतसारखा चोको लाव्हा केक, मायक्राेवेव्हचीही गरज नाही- बघा रेसिपी

आता आधी ज्या पाण्यात तुम्ही स्ट्रॉबेरी धुतली ते पाणी एकदा तपासा. त्या पाण्यात तुम्हाला काही छोट्या अळ्या, किडे वळवळ करताना दिसतील. 

स्ट्रॉबेरीच्यावर जी लहान छिद्रे असतात, त्या छिद्रांमध्ये या अळ्या जाऊन बसतात. त्यामुळे नुसत्या पाण्याने त्या कधीच निघून जात नाहीत. म्हणून कधीही स्ट्रॉबेरी खाण्यापुर्वी ती वरील पद्धतीने स्वच्छ धुवा आणि मगच खा, असे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सअन्नकिचन टिप्सफळे