Lokmat Sakhi >Food > सफरचंद सालासकट खावी की साली काढून ? सफरचंद या पद्धतीने खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे...

सफरचंद सालासकट खावी की साली काढून ? सफरचंद या पद्धतीने खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे...

Should you eat an apple with or without its peel : यासाठीच सफरचंद नेहमी न सोलताच खायला हवं, पाहा नेमके काय आहेत फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 02:15 PM2024-06-29T14:15:02+5:302024-06-29T14:25:51+5:30

Should you eat an apple with or without its peel : यासाठीच सफरचंद नेहमी न सोलताच खायला हवं, पाहा नेमके काय आहेत फायदे...

How we should eat apples, with or without peel Should you eat an apple with or without its peel Here's Why You Should Never Peel Apple Skin | सफरचंद सालासकट खावी की साली काढून ? सफरचंद या पद्धतीने खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे...

सफरचंद सालासकट खावी की साली काढून ? सफरचंद या पद्धतीने खाल्ल्याने मिळतील अनेक फायदे...

रोज एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टर व आजारांपासून दूर राहू शकतो, असे म्हटले जाते. फळे खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. प्रत्येक  ऋतूत येणारी फळे आवर्जून खायला हवीत त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. चवीला गोड आणि दिसायला लालचुटुक असणारे सफरचंद खायला सगळ्यांनाच आवडते(Peeled vs unpeeled apple: Which is better for your health).

हल्ली फळांवर फवारण्यात येणारी किटकनाशके व फळांच्या सालींची चकाकी टिकून राहण्यासाठी त्यावर मेणाचा थर दिलेला असतो. यामुळे फळे सालीसकट खावीत की खाऊ नये असा प्रश्न पडतो. फळांवर फवारण्यांत येणारी किटकनाशके आणि मेणाचा थर आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकतो. पण काही फळांच्या सालींमध्येही (Are There Health Benefits to Eating Apple Skins) भरपूर पोषकतत्व असतात. या दोन्ही गोष्टी विचारात घेता सफरचंद सालीसकट (Here's Why You Should Never Peel Apple Skin) खावे की खाऊ नये याबाबत इंस्टाग्रामवर आयुर्वेदिक डॉक्टर वरलक्ष्मी हिने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने सफरचंदाची साल काढून खावे की नाही ? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे(How we should eat apples, with or without peel).    

सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये ? तज्ज्ञ सांगतात... 

सफरचंद व इतर फळांवर किटकनाशक फवारलेली असतात. त्यामुळे ते तसेच सालीसकट खाणे आरोग्याला धोकादायक ठरु शकते. एक्स्पर्टच्या मते, सफरचंद खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुवावे आणि तासाभरासाठी पाण्यांत भिजत ठेवावे. यानंतर त्यावरील मेणाचा थर काढण्यासाठी गरम पाण्याने सफरचंद स्वच्छ धुवून घ्यावे. अशाप्रकारे सफरचंद स्वच्छ धुवून खाल्ल्यास त्याची खरी चव चाखता येते व ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरते. 

फणसाचे गरे पोटाला बरे, म्हणूनच खा फणसाचे कुरकुरीत वेफर्स - कोकणी पद्धतीची पारंपरिक रेसिपी...

श्रद्धा कपूर नाश्त्याला आवडीने खाते काकडीचा पारंपरिक पदार्थ , खायला पौष्टिक आणि चविष्ट....

सफरचंद सालीसकट खाण्याचे फायदे... 

सफरचंदाची साल ही फायबरयुक्त असते. सालासकट सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. याचबरोबर त्यात असणाऱ्या फायबरमुळे पोट दिर्घकाळ भरल्यासारखे वाटते. यामुळे आपल्याला सारखी सारखी भूक लागत नाही, परिणामी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. सफरचंदाच्या सालीत भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात, त्यामुळे सफरचंदाची साल काढून टाकण्यांत आपलेच नुकसान आहे. कारण यामध्ये असणारी जीवनसत्व आपण नकळतपणे फेकून देतो. रोज एक सफरचंद खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या कमी होऊन, पचनक्रिया सुधारते. शरीरामध्ये असणारे विषारी घटक बाहेर काढून शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. सफरचंद सालीसकट खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने आपण अनेक आजारांपासून लांब राहू शकतो. सफरचंदाच्या सालीमध्ये असलेले पोषक तत्व रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. या अशा अनेक कारणांमुळे  सफरचंद सोलून खाणे अनेकांना आवडत असले तरीही, असे करणे योग्य नाही.

सफरचंद खाताना ते सालीसकट खाणं गरजेचे असते. परंतु त्यावरील मेणाचा थर आणि किटकनाशके जर आपल्या पोटात गेली तर आरोग्य सुधारण्यापेक्षा बिघडण्याची शक्यता अधिकी असते. यासाठी सफरचंद खाण्याचा सोपा मार्ग म्हणजे ती स्वच्छ धुवा आणि कमीत कमी एक तास कोमट पाण्यात बुडवून ठेवा. ज्यामुळे सफरचंदावरील जीवजंतू आणि मेणाचा थर निघून जाईल आणि सफरचंद सालीसकट खाण्यासाठी योग्य होईल.

Web Title: How we should eat apples, with or without peel Should you eat an apple with or without its peel Here's Why You Should Never Peel Apple Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न