Join us

हिवाळ्यात खा ‘हुरडा भजी’, खास गावरान बेत, पारंपरिक पौष्टिक रेसिपी-थंडीतला अस्सल गावरान बेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 15:21 IST

Hurda Bhaji Recipe : How To Make Hurda Bhaji At Home : Winter Special Hurda Bhaji Recipe : थंडीच्या दिवसांत हुरडा भजीचा करा झक्कास बेत, एकदा करून तरी पाहावा असा थंडीतला खास पारंपरिक पदार्थ...

थंडीच्या दिवसांत गरमागरम आणि चमचमीत - चटपटीत पदार्थ खाण्याची मज्जा काही औरच असते. हिवाळ्यात काही सिझनल भाज्या, फळे, कडधान्य बाजारांत विकत मिळतात, ती या (Hurda Bhaji Recipe) दिवसांतच खाणे आरोग्याला फायदेशीर असते. हिवाळ्यात मिळणारा मस्त हिरवागार हुरडा हा त्या पैकीच एक खास. हिवाळ्यात मित्र - मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत 'हुरडा पार्टीचे' (How To Make Hurda Bhaji At Home) बेत आखले जातात. थंडीच्या दिवसांत मस्त माळरानावर किंवा डोंगरमाथ्यावर जाऊन तिथल्या थंडीची मज्जा घेत मटक्यातील गरमागरम हुरडा खाणे याहून मोठे सुख ते काय... आपल्यापैकी बऱ्याचजणांनी अशा अनेक हुरडा पार्ट्या केल्या असतील. परंतु या हुरड्या पासून अनेक पदार्थ हिवाळ्यात घरोघरी केले जातात(Winter Special Hurda Bhaji Recipe).

हुरडा म्हणजे ज्वारीचेच कोवळे हिरवेगार, रसदार दाणे. या कोवळ्या हिरव्यागार ज्वारीच्या दाण्यांची भजी देखील चवीला तितकीच अप्रतिम आणि कुरकुरीत लागते. यंदाच्या हिवाळ्यात नेहमीचीच कांदा बटाटा भजी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आपण हुरड्याची भजी देखील घरच्याघरीच तयार करु शकतो. मस्त कोवळ्या, हिरव्यागार ज्वारीच्या दाण्यांची भजी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. हुरडा - १ कप२. आलं - हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ३. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली) ४. बेसन - ३ टेबलस्पून ५. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार ७. हिंग - चिमूटभर ८. हळद - १/२ टेबलस्पून ९. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून   १०. धणे पूड - १ टेबलस्पून   ११. लिंबाचा रस - १ टेबलस्पून १२. पाणी - गरजेनुसार १३. गरम तेल - १ टेबलस्पून 

काळ्या-पिवळ्या-लाल की हिरव्या, कोणत्या मनुका खाणं जास्त फांयद्याचं? मनुका-बेदाणे खावे नक्की कधी?

कुडकुडणाऱ्या थंडीत करा 'उलटा वडापावचा' झक्कास बेत, नेहमीच्या वडापावपेक्षा भन्नाट नवी रेसिपी....

कृती :- 

१. सगळ्यात आधी हिरवागार हुरडा एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन तो मिक्सरमध्ये हलकेच फिरवून थोडी जाडसर भरड करुन घ्यावी. २. हुरड्याची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली भरड एका बाऊलमध्ये घेऊन त्यात आलं - हिरव्या मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, तांदुळाचे पीठ, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, हळद, लाल मिरची पावडर, धणे पूड, लिंबाचा रस घालावा. 

३. आता या सगळ्या मिश्रणात गरजेनुसार पाणी व थोडं गरम तेल घालून भजी साठीचे बॅटर तयार करुन घ्यावे.४. एका कढईत तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करावे. आता या गरम तेलात तयार बॅटरचे मध्यम आकाराचे गोलाकार गोळे करुन तेलात सोडावेत. ५. या भजीला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हुरड्याची भजी खरपूस तळून घ्यावी. 

गरमागरम हुरड्याची भजी खाण्यासाठी तयार आहे. हिरवी चटणी किंवा सुक्या लाल चटणी सोबत हुरड्याची भजी खायला अधिकच चविष्ट लागतात.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.