Join us  

निकाल लागले, टेन्शन कमी झालं आता प्या मन आणि शरीराला थंडावा देणारं ताडगोळ्याचं सरबत; पाहा सोपी कृती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2024 12:07 PM

Ice Apple Juice | How to Make Ice Apple Juice without Milk : या तापलेल्या वातावरणात स्वत:ला थंड ठेवण्यासाठी आपण ताडगोळ्याचं सरबत पिऊ शकता..

काल निकाल पाहताना (Loksabha 2024) ज्याला टेन्शन आलं नाही तो माणूस नाही (Ice Apple). निवडणूक निकाल हा देशातला सर्वात मोठा उत्सव. काहींसाठी सेलब्रेशन, कुणासाठी वेदना (Food). आपल्या माणसांसोबत निकाल पाहणे आनंददायी असते. आणि सोबत असतात आवडते पदार्थ. उन्हाळ्यात हा खास पदार्थ म्हणजे ताडगोळे सरबत. कालचे टेन्शन आज नक्की कमी करेल असा पदार्थ. म्हणजेच ताडगोळ्यांचं सरबत (Ice Apple Juice).

ताडगोळे खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फळ चवीला गोड असून दिसायला मांसल आणि पारदर्शक असते. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, फायटोन्यूट्रिएंट्स आणि कार्बोहायड्रेट्स आढळते. उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आपण हे फळ खाऊ शकता. जर आपल्याला फळ खायचं नसेल तर, आपण याचे ज्यूस देखील तयार करून पिऊ शकता. पण ताडगोळ्याचा ज्यूस कसा तयार करायचा? पाहूयात(Ice Apple Juice | How to Make Ice Apple Juice without Milk).

ताडगोळ्याचा ज्यूस तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

२ ते ४ ताडगोळे

३ चमचे

मेदूवडे फसतात-तेल फार पितात? त्यात मिसळा '१' खास पदार्थ; मेदूवडे जमतील परफेक्ट

नन्नरी सरबत

थंड पाणी

बर्फाचे तुकडे

लिंबाचा रस

भिजवलेला सब्जा

ताडगोळ्याचा ज्यूस तयार करण्याची योग्य पद्धत

- ताडगोळ्याचा सरबत करण्यासाठी सर्वप्रथम, ताडगोळ्याची साल काढून स्वच्छ करा. नंतर एका मोठ्या भांड्यात घ्या आणि चमच्याने किंवा मॅशरने चांगले मॅश करा.

विकत आणलेले पनीर भेसळयुक्त असेल तर? ४ ट्रिक्स-२ मिनिटांत ओळखा पनीर आहे की पांढरा भुसा

- नंतर त्यात ३ चमचे नन्नरी सरबत घाला. नन्नरी सरबतमध्ये साखर असतेच. जर आपल्याला जास्त गोडपणा हवा असेल तर, आपण त्यात आणखीन साखर घालू शकता. मग त्यात एक चमचा लिंबाचा रस, २ कप थंड पाणी, एक चमचा भिजवलेला सब्जा घालून मिक्स करा.

- शेवटी ग्लासमध्ये सरबत ओता. त्यात काही बर्फाचे तुकडे घाला. सजावटीसाठी वर पुदिन्याची पाने ठेवा. अशा प्रकारे ताडगोळ्याचा सरबत पिण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स