Lokmat Sakhi >Food > स्वयंपाक चविष्ट करता पण अन्नातलं पोषणच गायब? ICMR सांगते, तुम्हीही 'या' चुका करताय..

स्वयंपाक चविष्ट करता पण अन्नातलं पोषणच गायब? ICMR सांगते, तुम्हीही 'या' चुका करताय..

ICMR Guidelines About Cooking Method: स्वयंपाक करताना भाज्या चिरताना, अन्न शिजवताना काय काळजी घेतली पाहिजे, याविषयीच्या काही नियमावली इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR यांनी जाहीर केल्या आहेत. (how to cook food for maintaining its nutritional value)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 04:33 PM2024-05-18T16:33:11+5:302024-05-18T17:29:13+5:30

ICMR Guidelines About Cooking Method: स्वयंपाक करताना भाज्या चिरताना, अन्न शिजवताना काय काळजी घेतली पाहिजे, याविषयीच्या काही नियमावली इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR यांनी जाहीर केल्या आहेत. (how to cook food for maintaining its nutritional value)

ICMR guidelines about cooking method, how to cook food for maintaining its nutritional value | स्वयंपाक चविष्ट करता पण अन्नातलं पोषणच गायब? ICMR सांगते, तुम्हीही 'या' चुका करताय..

स्वयंपाक चविष्ट करता पण अन्नातलं पोषणच गायब? ICMR सांगते, तुम्हीही 'या' चुका करताय..

Highlightsअसं तुमच्याकडूनही होत नाही ना? हे एकदा तपासून घ्या

आपण करत असलेला चवदार व्हावा, सगळ्यांनी आवडीने खावा असं प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला वाटत असतं. तसंच आपण केलेला प्रत्येक पदार्थ पौष्टिक असावा, सगळ्यांच्या तब्येतीसाठी फायदेशीर असावा असही वाटतंच. पण बऱ्याचदा स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींकडून नकळत काही  चुका होतात, त्यामुळे त्या पदार्थाची पौष्टिकता कमी होते. असं तुमच्याकडूनही होत नाही ना, हे एकदा तपासून घ्या आणि आयसीएमआर यांनी अन्नपदार्थ पौष्टिक होण्यासाठी स्वयंपाक करताना कोणती काळजी घ्यावी (ICMR guidelines about cooking method), याविषयी ज्या सूचना दिल्या आहेत, त्या देखील तपासून घ्या... (how to cook food for maintaining its nutritional value)

 

अन्नपदार्थातली पौष्टिकता कमी होऊ नये म्हणून ICMR ने केलेल्या सूचना

१. कोणतीही डाळ शिजायला लावण्यापुर्वी ती काही तास भिजत ठेवा. यामुळे त्याच्यातलं फायटिक ॲसिड कमी करण्यास मदत होते. फायटिक ॲसिड हा असा पदार्थ आहे जो डाळींमधली पौष्टिक खनिजे शोषून घेताे.

२. भाज्या चिरण्यापुर्वी काही वेळ त्या कोमट पाण्यात भिजू द्या. यामुळे त्यांच्यातले मायक्रोबियल घटक कमी होतात. तसेच भाज्यांना लागलेले पेस्टीसाईड्स, प्रिझर्व्हेटिव्हही निघून जातात. 

३. तळण्यापेक्षा भाज्या उकडून किंवा वाफवून शिजवाव्या. उकडल्यामुळे किंवा वाफवल्यामुळे भाज्यांमधले वॉटर सॉल्यूबल खनिजे निघून जात नाही.

 

४. कुकरमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी हानिकारक नाही. यामुळे वेळ आणि गॅस दोन्हींची बचत होते.

५. कोणताही पदार्थ तळल्यानंतर त्यातील फॅट्स वाढतात. हृदयासाठी ते चांगले नाही.

६. खाद्य पदार्थांना रोस्ट किंवा ग्रिल करणं हे सगळ्यात जास्त हानिकारक आहे. कारण त्यामुळे त्या पदार्थांमध्ये असे काही केमिकल्स तयार होतात जे शरीरासाठी त्रासदायक ठरतात. 

 

Web Title: ICMR guidelines about cooking method, how to cook food for maintaining its nutritional value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.