Lokmat Sakhi >Food > इडलीचा गुजराथी भाऊ इदाडा! नाश्त्याला हा खास इदाडा खाऊन तर पहा, टेस्ट में बेस्ट!

इडलीचा गुजराथी भाऊ इदाडा! नाश्त्याला हा खास इदाडा खाऊन तर पहा, टेस्ट में बेस्ट!

खमण आणि ढाेकळा हे पदार्थ माहिती असतात पण हा इदाडा कधी तुम्ही नाश्त्याला खाल्ला आहे का? करायला अगदी सोपा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 05:16 PM2021-11-12T17:16:10+5:302021-11-12T17:18:22+5:30

खमण आणि ढाेकळा हे पदार्थ माहिती असतात पण हा इदाडा कधी तुम्ही नाश्त्याला खाल्ला आहे का? करायला अगदी सोपा..

idada Guajarati dish, try this different version of Idli for healthy breakfast | इडलीचा गुजराथी भाऊ इदाडा! नाश्त्याला हा खास इदाडा खाऊन तर पहा, टेस्ट में बेस्ट!

इडलीचा गुजराथी भाऊ इदाडा! नाश्त्याला हा खास इदाडा खाऊन तर पहा, टेस्ट में बेस्ट!

Highlightsएकदम मस्त पदार्थ. नाश्त्याला उत्तम. सोपा. पौष्टिक.

शुभा प्रभू साटम

इडादा हा पदार्थ म्हणजे आपण असं म्हणू शकतो की, इडलीचा गुजराथी भाऊ आहे. मात्र यासाठीचं साहित्य समान पण ओरिजनल वेगळं आहे. पण आहे इडलीच्याच कुटुंबातलं.
तर इडादा पीठ करताना त्यात आंबट दही घालून १०/१२तास आंबववले जाते. ताटात पीठ पातळ पसरून उकडायचे आणि वरून फोडणी. दिवाळीच्या मेजवानी वर उतारा. यात फेरफार करून नवे पण होते. उदाहरणार्थवरून मका दाणे, चीज किसून, पालक ,गाजर, बीट,मटार अश्या भाज्या, पपईची चटणी तोंडी लावणे.
आंबवलेले म्हणजे आजच्या भाषेत लॅक्टोफरमेंटेड अन्न. सर्वसाधारणपणे असे पदार्थ अधिक करून दक्षिण भारतात असतात असा समज आहे पण पूर्ण भारतात ही पद्धत अनुसरली जाते. हा इदाडा गुजराथचा. तिथला ढोकळा किंवा खमण जितके माहीत आहे तितका हा नाही पण दर्दी लोकांनां माहीत असते या पदार्थाची खास चव.
याचे कोरडे पीठ करून ठेवता येते अथवा डाळी भिजत घालून पण होतो मस्त इडादा.

(सर्व छायाचित्रे : शुभा प्रभू साटम)
 

कृती

जाड तांदूळ(उकडा नाही)- २ वाटी
उडीद डाळ- १ वाटी
हे कोरडे रवाळ दळून घ्यायचे अथवा ४/५तास वेगवेगळे भिजवून मग वाटायचे.
चांगले फेटून त्यात आंबट दही,चिमुट साखर आणि मीठ घालुन ६/७ तास आंबवून घ्यायचे
दुसऱ्या दिवशी फेटून त्यात आले मिरची वाटून, काळी मिरी ठेचून, आणि हवे तर इनो घालून हलक्या हाताने एकत्र करायचे
तोपर्यंत थाळीत तेल फासून त्या तयार करायच्या.
त्यात पीठ पातळ पसरून, त्यावर लाल तिखट शिवरून, इडली प्रमाणे उकडून घ्यायचे.
गार झाले की हिंग कढीलिंब यांची फोडणी करायची, त्यात थोडेसे साखरपणी घालून ती ओतायची, आणि त्रिकोणी तुकडे करून कापायचे.
पीठ अतिशय पातळ पसरून घ्यायचे. उकडून हवे तसे फाेडणी घालून खायचे. एकदम मस्त पदार्थ.
नाश्त्याला उत्तम. सोपा. पौष्टिक.

(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)
 

Web Title: idada Guajarati dish, try this different version of Idli for healthy breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.