Lokmat Sakhi >Food > इडलीसाठी डाळ-तांदूळ भिजवताना त्यात घाला १ पांढरीशुभ्र ‘सिक्रेट’ गोष्ट, इडली होईल मऊ-हलकी

इडलीसाठी डाळ-तांदूळ भिजवताना त्यात घाला १ पांढरीशुभ्र ‘सिक्रेट’ गोष्ट, इडली होईल मऊ-हलकी

idli batter recipe | South Indian style idli | soft idli इडली पावसाळ्यात काही केल्या हलकी-स्पॉंन्जी होत नाही, हा घ्या सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2023 01:54 PM2023-08-01T13:54:12+5:302023-08-01T13:55:09+5:30

idli batter recipe | South Indian style idli | soft idli इडली पावसाळ्यात काही केल्या हलकी-स्पॉंन्जी होत नाही, हा घ्या सोपा उपाय

idli batter recipe | South Indian style idli | soft idli | इडलीसाठी डाळ-तांदूळ भिजवताना त्यात घाला १ पांढरीशुभ्र ‘सिक्रेट’ गोष्ट, इडली होईल मऊ-हलकी

इडलीसाठी डाळ-तांदूळ भिजवताना त्यात घाला १ पांढरीशुभ्र ‘सिक्रेट’ गोष्ट, इडली होईल मऊ-हलकी

इडली, डोसा, मेदू वडे, अप्पे हे दाक्षिणात्य पदार्थ लोकं आवडीने खातात. नाश्ता म्हटलं की अनेक लोकं इडली खाण्यास पसंती दर्शवतात. इडली खाण्याचे अनेक फायदे आहेत. इडली स्टीम केलेली असल्यामुळे अतिरिक्त कॅलरीज वाढत नाही. योग्य साहित्यांचा वापर केल्यास इडली फुलते.

परंतु, पावसाळ्यात थंड वातावरणामुळे इडलीचे पीठ नीट फुलत नाही. ज्यामुळे इडली कडक, किंवा चिकट होतात. जर आपल्याला योग्य साहित्यांचा वापर करून साऊथ इंडियन पद्धतीने इडली तयार करायची असेल, तर त्यात एक सिक्रेट साहित्य मिक्स करा. यामुळे इडली कापसासारखी सॉफ्ट, मऊसूत तयार होतील. चला तर मग साऊथ इंडियन पद्धतीने इडली कशी तयार करायची हे पाहूयात(idli batter recipe | South Indian style idli | soft idli).

साऊथ इंडियन पद्धतीने इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

उडीद डाळ

साबुदाणा

सलमान खानने केले कांद्याचे इन्स्टंट लोणचे, भाईजान सांगतोय लोणच्याची रेसिपी

मीठ

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप उडीद डाळ घ्या, त्यात पाणी घालून धुवून घ्या. व त्यात एक कप पाणी घालून ४ ते ५ तासांसाठी भिजत ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये दोन कप तांदूळ घ्या, त्यात पाणी घालून धुवून घ्या, व त्यात दोन कप पाणी घालून ५ तासांसाठी भिजत ठेवा. आता आणखी एका बाऊलमध्ये अर्धा कप साबुदाणा घ्या, त्यात पाणी घालून धुवून घ्या, व त्यात एक कप पाणी घालून ५ तासांसाठी भिजत ठेवा.

करा ‘कुरकुरीत कारली’; पदार्थच असा भारी की कारल्याची भाजीही होईल आवडती!

५ तास झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात डाळ - तांदूळ - साबुदाणा एकत्र करून घ्या, व त्याची पेस्ट तयार करा. गुळगुळीत पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करा. व त्यावर १२ तासांसाठी झाकण ठेऊन पीठ आंबवण्यासाठी ठेऊन द्या.

१२ तास झाल्यानंतर इडली स्टीमरमध्ये पाणी घालून झाकण ठेवा, व भांडं गरम करण्यासाठी ठेवा. इडलीच्या ट्रे मध्ये इडलीचं तयार बॅटर घालून इडली वाफवून घ्या. अशा प्रकारे सॉफ्ट, मऊसूत इडली खाण्यासाठी रेडी. आपण ही इडली चटणी, सांबारसोबत खाऊ शकता.

Web Title: idli batter recipe | South Indian style idli | soft idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.