Join us  

वाटीभर बेसनाचा ५ मिनिटांत करा 'इडली ढोकळा'; फुललेला ढोकळा इडली पात्रात करण्याची भन्नाट ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 10:02 AM

Idli Dhokla Recipe Instant Dhokla in Idli Stand : अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत हा पदार्थ बनून तयार होतो. (How to make instant Idli Dhokla)

रोज सकाळी नाश्त्याला काय नवीन करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो.  (Gujarati Idli  Dhokla) घरात पाहूणे असतील  किंवा घरच्या मंडळीला नाश्त्यासाठी नवीन पदार्थ बनवायचा झाल्यास तुम्ही ५ ते १० मिनिटांत होणारा इस्टंट इडली ढोकळा ट्राय करू शकता. हा अत्यंत परफेक्ट नाश्ता आहे कारण हा पदार्थ करताना कमीत कमी तेलाचा वापर केला जातो. लो कॅलरी ब्रेकफास्ट (low calorie breakfast) म्हणून तुम्ही याची निवड करू शकता. अत्यंत कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळेत हा पदार्थ बनून तयार होतो. (How to make instant Idli Dhokla)

इडली किंवा डोसा बनवायचं म्हटलं की दळणं, आंबवणं अशा क्रिया कराव्या लागतात  ज्यामुळे काम फारच  लांबते आणि महिला  घरात हे पदार्थ बनवण्याचा कंटाळा करतात.  झटपट चवदार, चविष्ट नाश्ता तयार करण्याासाठी तुम्ही ही रेसेपी ट्राय करू शकता. लहान मुलांना शाळेच्या डब्यात देण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे. ( How to make instant gujurati dhokla in idli stand)

इस्टंट इडली ढोकळा करण्यासााठी लागणारं साहित्य (Instant Idali Dhokla Recipe)

१) बेसन -१ कप

२) पिठी साखर- १ टिस्पून

३) बारीक चिरलेली  कोथिंबीर- १ टिस्पून

४) तेल -  २ ते ३  टिस्पून

५) इनो- १ लहान पाकीट

६) मीठ- चवीसनुसार  

७) पाणी- गरजेनुसार

इंस्टंट इडली ढोकळा कसा करावा? (How to Make Instant Idali Dhokla)

1) सगळ्यात आधी एका  भांड्यात १ ते २ वाटी बेसनाचे पीठ घ्या. त्यात १ चमचा पिठी साखर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, २ चमचे तेल आणि पाणी घालून एकजीव करून घ्या. यात बेकींग सोडा किंवा इनो घालून पुन्हा लागेल तसं पाणी घालून एकजीव करून घ्या. 

एकदम सॉफ्ट-स्पाँजी ताकातला ढोकळा घरीच करा; १ सिक्रेट पदार्थ घाला, परफेक्ट पांढरा ढोकळा खा

2) ५ ते  १० मिनिटांसाठी हे मिश्रण सेट करण्यसाठी ठेवा. नंतर इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात हे मिश्रण भरा.  इडलीच्या कुकरमध्ये ठेवून हा ढोकळा जवळपास  १० ते १२ मिनिटांसाठी वाफवून घ्या वाफवल्यानंतर सॉफ्ट ढोकळा तयार झालेला असेल. 

विकतसारखी घट्ट आलं-लसूण पेस्ट घरी करण्याची सोपी पद्धत; १ वर्ष टिकेल-सुगंधही उडणार नाही

3)  तयार सॉफ्ट ढोकळा तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. भांड्यातून बाहेर काढल्यानंतर तुम्ही या ढोकळ्यावर फोडणी घालूनही  खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृतीअन्न