Join us  

नारळाच्या करवंटीत इडली? ' या ' रीतीने करून पाहा, अशी भारी इडली कधी खाल्ली नसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 12:08 PM

Idli in Coconut Shell? New Breakfast idea no soda : दाक्षिणात्य पद्धतीची इडली खायची असेल तर, नारळाच्या करवंटीत इडली करून पाहा..

इडली-सांबार किंवा इडली (Idli) चटणी नाश्त्यासाठी बेस्ट मानले जाते. वाफाळलेली इडलीसोबत चटणी चविष्ट लागते. दाक्षिणात्य हा पदार्थ भारतातील अनेक घरात तयार केला जातो. पण अनेकदा इडली कडक, चिकट किंवा पीठ दळताना काही लहान-सहान चुका होतात. ज्यामुळे इडल्या नीट फुलत नाही.

घरगुती इडल्या खाण्याव्यतिरिक्त आपण अनेकदा बाहेरून इडल्या विकत आणतो. पण विकतची इडली खाण्यापेक्षा घरात कमी साहित्यात इडली तयार करा. आज आपण नारळाच्या करवंटीमध्ये इडली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. जर आपल्याकडे इडलीचं भांडं नसेल किंवा बिघडलं असेल तर, गोल, मऊ-लुसलुशीत इडल्या तयार करा(Idli in Coconut Shell? New Breakfast idea no soda).

नारळाच्या करवंटीत इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ

तांदूळ

२ टोमॅटोची करा आंध्रा स्टाईल चटपटीत चटणी, जेवणाची वाढेल चव, २ घास खाल जास्त

मीठ

तूप

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप उडीद डाळ घ्या, त्यात पाणी घालून धुवून घ्या. व त्यात एक कप पाणी घालून ४ ते ५ तासांसाठी भिजत ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये दोन कप तांदूळ घ्या, त्यात पाणी घालून धुवून घ्या, व त्यात दोन कप पाणी घालून ५ तासांसाठी भिजत ठेवा. भिजलेली उडीद डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.

नंतर मिक्सरच्या भांड्यात तांदूळ घेऊन त्याचीही पेस्ट तयार करा, व ही पेस्ट उडीद डाळीच्या पेस्टमध्ये घालून मिक्स करा. नंतर त्यात एक कप पाणी व चवीनुसार मीठ घालून साहित्य हाताने एका बाजूने मिक्स करत राहा. मिक्स केल्यानंतर ८ तासांसाठी झाकण ठेऊन पीठ आंबवण्यासाठी ठेऊन द्या.

बेसनाच्या भजींनी त्रास होतो? मग करा कपभर रव्याची भजी, अशी कुरकुरीत भजी तुम्ही खाल्ली नसतील..

८ तासानंतर नारळाच्या करवंटीमध्ये अर्धा चमचा तूप लावून ग्रीस करा. व त्यात तयार पीठ ओतून अर्धी करवंटी भरून घ्या. स्टीमरच्या भांड्यात करवंटी ठेवा. १० मिनिटापर्यंत इडल्या स्टीम करून घ्या. १० मिनिटानंतर इडली शिजली आहे की नाही हे चेक करा. थंड झाल्यानंतर करवंटीमधून इडल्या टोकदार चमच्याने बाहेर काढा. अशा प्रकारे नारळाच्या करवंटीतील मऊ-लुसलुशीत इडली खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स