नाश्त्यााला इडली, चटणी खाण्याची इच्छा प्रत्येकाचीच होते. रोज चहा चपाती, पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला की दक्षिण भारतीय पदार्थ नाश्त्यासाठी खावेसे वाटतात. (Cooking Tips) इडल्याचं पीठ व्यवस्थित आंबत नाही, इडली कडक होतात तर कधी बेचव लागतात अशा तक्रार बऱ्याचजणींच्या असतात. (How to Make Soft Idli with Basic Tips) मऊ, लुसलुशीत रेस्टोरंटस्टाईल इडली बनवणं प्रत्येकालाच जमतं असं नाही.
मऊ, चवदार इडल्या बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. पीठ दळताना काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर विकतसारखी सॉफ्ट इडली बनेल. (How to make pluffy soft idali) इडल्या जर सॉफ्ट बनल्या असतील तर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही इडली चिली किंवा इडली फ्राय असे पदार्थ बनवू शकता.
साहित्य
१ कप उडीदाची डाळ
३ कप तांदूळ
१ चमचा मेथी
१ चमचा इनो
चवीनुसार मीठ
एक वाटी उडीदाची डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. नंतर पाण्यात भिजवून घ्या. ३ वाटी तांदूळ धुवून भिजवून ठेवा. एक चमचा मेथीच्या दाण्यांमध्ये पाणी घालून ठेवा. ३ ते ४ तास भिजवल्यानंतर पाणी काढून हे पदार्थ तसेच राहू द्या. तिन्ही पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्या. पीठ बारीक दळून झाल्यानंतर एका पातेल्यात काढून घ्या आणि हातानं व्यवस्थित फेटून घ्या.
उरलेल्या भाताचे क्रिस्पी चवदार पापड; एकदाच करा-वर्षभर टिकतील; कढईभर फुलेल पापड
फेटलेल्या पीठात मीठ घालून व्यवस्थित एकजीव करा आणि ७ ते ८ तासांसाठी हे पीठ झाकून ठेवून द्या. त्यानंतर इनो आणि पाणी घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या. इडलीच्या भांड्याला तेल लावून इडलीचं मिश्रण त्यात घाला आणि इडल्या १० ते १५ मिनिटांसाठी शिजवून घ्या. नंतर इडली पात्रातून एक एक इडली बाहेर काढून खोबऱ्याची चटणी किंवा सांबारबरोबर सर्व्ह करा.
बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट मेदूवडे घरीच करा; कमी तेल पिणाऱ्या, क्रिस्पी वड्यांची रेसिपी
इडली आणि डोसे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या पिठात अनेकदा यीस्ट टाकले जाते. ज्यामुळे इडली आणि डोसे मऊ आणि फ्लफी होतात. तर काहीजण दही किंवा शिळा भात किंवा पोहे मिक्सरला लावून पीठात एकत्र करतात. ज्यामळे इडल्या अधिकच मऊ होतात.