Join us  

घरी इडली करताय? तांदूळ दळताना 'हा' पदार्थ घाला; विकतसारख्या मऊ-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 10:41 AM

Idli Sambhar Recipe (Idli Kashi Karaychi) : इडली सांबारचा आनंद घेण्यासाठी एक सोपी रेसिपी ट्राय करायला हवी.

इडली हा एक असा पारंपारीक पदार्थ आहे  जो अगदी रोजच्या आहारात असेल तरी लोकांचे मन भरत नाही. (How to Make Soft Idli With 5 Basic Tips) सकाळी सकाळी हेल्दी आणि टेस्टी काहीतरी खायचं असेल तर इडली सांबार किंवा इडली चटणी हा उत्तम पर्याय आहे. (Cooking Hacks) इडली सांबारचा आनंद घेण्यासाठी एक सोपी रेसिपी ट्राय करायला हवी. तांदूळ, उडीदाची डाळ, मीठ या पदार्थांपासून इडली तयार केली जाते. (How to Make Perfect Idli)

ही रेसिपी वापरून मऊ, सॉफ्ट इडल्या बनवणं अधिकच सोपं होतं.  इडली तुम्ही सांबार किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता.  (Idli Batter Recipe) तर काहीजणांना टोमॅटो आणि लसणाच्या चटणीबरोबर इडली खायला आवडते. घरच्याघरी मऊ-लुसलुशीत इडली कशी करायची याच्या ट्रिक्स आणि रेसिपी पाहूया. (Soft Idli Recipe)

इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

1) बासमती तांदूळ -दीड कप 

2)मेथीचे दाणे-  दीड चमचे

3) तिळाचे तेल - 5 मोठे चमचे

4) उडीदाची डाळ -अर्धा कप

5) मीठ -गरजेनुसार

6) पाणी- गरजेनुसार

1) स्टेप पहिली

सगळ्यात लोकप्रिय भारतीय रेसिपी बनवण्यासाठी तांदूळ, उडीदाची डाळ वेगवेगळी धुवून घ्या जोपर्यंत त्यातलं पाणी साफ होणार नाही तोपर्यंत व्यवस्थित धुवून घ्या. तांदूळात मेथीच्या बीया घाला आणि 4 ते 6 तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. उडीदाची डाळ जास्तवेळेसाठी पाण्यात भिजवून ठेवू नका. उडीदाच्या डाळीचं सर्व पाणी काढून बारीक वाटून घ्या. तांदूळ जाडसर वाटून या दोन्हींची पेस्ट तयार करा आणि त्यात पाणी घाला.  या दोन्ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून एकत्र करून घ्या आणि फेटा. याची कंसिस्टेंसी जाड असेल याची खात्री करा. 

मटकीला मोड आणण्याची सोपी ट्रिक; पटकन मोड येतील- रूचकर लागेल मटकीची ऊसळ

2) स्टेप  दुसरी

इडलीचं बॅटर व्यवस्थित फुलेपर्यंत आंबवण्यासाठी ठेवा. इडल्या मऊ होण्यासाठी ही स्टेप फार महत्वाची असते. बॅटर व्यवस्थित होण्यासाठी सगळ्यात आधी ते गरम ठिकाणी ठेवा. जेव्हा बॅटर फुलेल तेव्हा त्यात मीठ घाला आणि व्यवस्थित फेटून घ्या. 

3) स्टेप तिसरी

इडली स्टॅण्डला तेल लावून घ्या. आणि इडलीच्या कुकरमध्ये अर्धा कप पाणी घालून उकळायला ठेवा. इडली स्टॅण्ड कुकरमध्ये ठेवून झाकण बंद करा. 8 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्या. 

कंबर दुखते-थकवा जाणवतो? मूठभर शेंगदाणे नियमित खा; हाडं होतील मजबूत-अशक्तपणा कमी

4) स्टेप चौथी

जर तुम्ही कुकरचा वापर करत नसाल तर शिट्टी शिवाय 10 मिनिटात एका खोल भांड्यात पाणी  घालून इडल्या शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर 10 मिनिटं गार होऊ द्या. पुन्हा 5 मिनिटं वाट पाहिल्यानंतर गॅस बंद करा. नारळाची चटणी किंवा सांबारबरोबर गरमागरम सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स