Lokmat Sakhi >Food > इडली फुगत नाही-दडस होते? १० दाक्षिणात्य सिक्रेट्स, इडल्या होतील सुपर सॉफ्ट- परफेक्ट

इडली फुगत नाही-दडस होते? १० दाक्षिणात्य सिक्रेट्स, इडल्या होतील सुपर सॉफ्ट- परफेक्ट

Idlis turning out dense, looking for advice to make them fluffy : इडली स्पॉंजी - जाळीदार होण्यासाठी फॉलो करा फक्त १० टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 10:00 AM2024-09-25T10:00:20+5:302024-09-25T10:05:01+5:30

Idlis turning out dense, looking for advice to make them fluffy : इडली स्पॉंजी - जाळीदार होण्यासाठी फॉलो करा फक्त १० टिप्स

Idlis turning out dense, looking for advice to make them fluffy | इडली फुगत नाही-दडस होते? १० दाक्षिणात्य सिक्रेट्स, इडल्या होतील सुपर सॉफ्ट- परफेक्ट

इडली फुगत नाही-दडस होते? १० दाक्षिणात्य सिक्रेट्स, इडल्या होतील सुपर सॉफ्ट- परफेक्ट

इडली (Idli) हा एक असा पदार्थ आहे, आपण कधीही आणि कुठेही खाऊ शकता (Idli Recipe). सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, किंवा सायंकाळी अन्यथा रात्री डिनरमध्येही आपण इडली खाऊ शकता (Cooking Tips). साऊथ इंडियन पदार्थांची क्रेझ सातासमुद्रापार आहे. ज्यात इडली हा फेमस पदार्थ आहे (Kitchen Tips).

हलकी इडली खाल्ल्याने वजन वाढत नाही. शिवाय पौष्टीक इडली खाल्ल्याने आरोग्याला बरेच फायदेही मिळतात. इडली खाण्यासाठी आपण अण्णाच्या स्टॉलवर गर्दी करतो. कारण घरात मनासारखी इडली तयार होत नाही. इडली कधी कडक तर कधी इडलीतून पाणी सुटतं. जर इडली घरात व्यवस्थित तयार होत नसतील, फसत असतील तर, १० टिप्स फॉलो करा. इडल्या होतील परफेक्ट(Idlis turning out dense, looking for advice to make them fluffy).

फ्लफी इडली बनवण्यासाठी १० टिप्स लक्षात ठेवा


- सर्वात आधी उडीद डाळ एका भांड्यात काढून घ्या. त्यात पाणी घालून उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पाणी आणि चमचाभर मेथी दाणे घालून २ तासांसाठी उडीद डाळ भिजत ठेवा.

मुलं ‘या’ ४ वाईट सवयी चटकन शिकतात, आईबाबा वेळीच लक्ष द्या-गोष्टी जातील हाताबाहेर

- दुसऱ्या भांड्यात तांदूळ घ्या, त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पाणी घाला आणि ४ तासांसाठी भिजत ठेवा. आपण त्यात पोहे देखील घालू शकता. किंवा जेव्हा बॅटर तयार कराल तेव्हा, १० मिनिटाआधी पोहे भिजत ठेवा.

- मिक्सरचं भांडं घ्या. त्यात भिजलेली उडीद डाळ घालून पेस्ट तयार करा. तयार उडीद डाळ पेस्ट एका भांड्यात काढून घ्या.

- इडली फ्लफी होण्यासाठी बिटर घ्या, त्याने बॅटर फेटून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि पोहे घालून पेस्ट तयार करा.

- तयार पेस्ट उडीद डाळीच्या पेस्टमध्ये घालून स्वच्छ हातानेच मिक्स करा.

- त्यावर झाकण ठेवा आणि बॅटर आंबवण्यासाठी ८ तासांसाठी भांडं रूम टेम्प्रेचरमध्ये ठेवा.

- ८ तासानंतर बॅटर आंबवून तयार झालं असेल. आता इडलीचं भांडं घ्या, स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा.

- इडली पात्राला ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर बॅटर ओता आणि स्टीमरमध्ये पात्र ठेवा. आणि झाकण लावा. १५ मिनिटांसाठी इडली वाफेवर शिजवून घ्या.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

- १० - १५ नंतर इडली पात्रातून इडली बाहेर काढा. जर इडली निघत नसेल तर, हाताने आधी पाणी शिंपडा आणि इडली चमच्याने अगदी अलगद बाहेर काढा.

- अशा प्रकारे आपली परफेक्ट दाक्षिणात्य पद्धतीची इडली खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Idlis turning out dense, looking for advice to make them fluffy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.