Lokmat Sakhi >Food > Recipe From Sour Curd: दही खूप आंबट झालं, खाणं शक्य नाही? आंबट दह्याचे 7 पदार्थ, उन्हाळ्यात खा मस्त

Recipe From Sour Curd: दही खूप आंबट झालं, खाणं शक्य नाही? आंबट दह्याचे 7 पदार्थ, उन्हाळ्यात खा मस्त

Food and Recipe: उन्हाळ्यात गरमीमुळे दही खूपच आंबट (tasty recipe from sour curd) होऊन जातं.. त्यामुळे मग अजिबातच खावं वाटत नाही.. अशा आंबटढॅण दह्यापासून करा या तेवढ्याच स्वादिष्ट, चवदार रेसिपी... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 01:18 PM2022-04-08T13:18:31+5:302022-04-08T13:19:15+5:30

Food and Recipe: उन्हाळ्यात गरमीमुळे दही खूपच आंबट (tasty recipe from sour curd) होऊन जातं.. त्यामुळे मग अजिबातच खावं वाटत नाही.. अशा आंबटढॅण दह्यापासून करा या तेवढ्याच स्वादिष्ट, चवदार रेसिपी... 

If the curd turn very much sour, Can's eat, then try these 7 amazing yummy, delicious recipies | Recipe From Sour Curd: दही खूप आंबट झालं, खाणं शक्य नाही? आंबट दह्याचे 7 पदार्थ, उन्हाळ्यात खा मस्त

Recipe From Sour Curd: दही खूप आंबट झालं, खाणं शक्य नाही? आंबट दह्याचे 7 पदार्थ, उन्हाळ्यात खा मस्त

Highlightsदही आंबट झालं की त्याची कढी करायची, हे आपल्याला माहिती असतं. पण त्या व्यतिरिक्तही अनेक असे पदार्थ आहेत, ज्याला आंबट दह्याची गरज असते...

उन्हाळ्यात हमखास जाणवणारा हा त्रास. या दिवसांत गरमीच एवढी असते की घरी लावलेलं दही अवघ्या काही तासांतच छान विरजतं. पण त्यानंतर मात्र आपण ते चटकन फ्रिजमध्ये ठेवायला विसरलो तर मात्र ते अतिशय आंबट होऊन जातं आणि मुळीच खावंसं वाटत नाही.. असं दही टाकून देण्याचा विचार चुकूनही करू नका.. कारण काही खास रेसिपींसाठी हे दही अतिशय उत्तम आहे.. दही आंबट झालं की त्याची कढी करायची, हे आपल्याला माहिती असतं. पण त्या व्यतिरिक्तही अनेक असे पदार्थ आहेत, ज्याला आंबट दह्याची गरज असते...

 

आंबट दह्यापासून करायच्या काही रेसिपी
१. ताक

दही खूप आंबट झालं असेल तर त्याचं छानपैकी ताक करून टाका. पण आंबट दह्याचं ताक करताना त्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असावं. आंबट दह्याचं ताक शक्यतो दुपारीच प्या. कारण रात्री प्यायलं तर सर्दीचा त्रास होऊ शकतो. 

image credit- google

२. ताकातले धपाटे...
हा पदार्थ खास मराठवाड्यातला. ताकातले धपाटे करण्यासाठी कणिक, ज्वारीचं पीठ, हरबरा डाळीचं पीठ लागेल. गव्हाचं पीठ २ वाट्या घेतलं तर डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ प्रत्येकी १- १ वाटी घ्यावं. कोथिंबीर, अद्रक, थोडासा लसूण, हिरव्या मिरच्या, जीरे हे सगळं मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या आणि ते पीठात टाका. चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा टाका. हे मिश्रण आता आंबट दह्यापासून केलेल्या ताकात भिजवा. भिजवलेल्या पिठाचे लहान गोळे करा आणि फुलका लाटतो त्याप्रमाणे लाटा. त्यानंतर तव्यावर खमंग भाजून घ्या. आंबट- तिखट धपाटे चवीला अतिशय उत्तम लागतात. 

 

३. ताकातल्या पुऱ्या...
आंबट- तिखट चवीच्या खमंग पुऱ्या बनविण्यासाठीही आंबट दह्याचा छान उपयोग करता येईल. यासाठी गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, थोडासा लसूण, हिरव्या मिरच्या, जीरे हे सगळं मिक्सरमधून वाटून टाका. आता दही टाकून हे पीठ भिजवा. आणि त्याच्या पुऱ्या लाटून तळून घ्या.

 

४. इन्स्टंट इडली किंवा डोसा
इन्स्टंट इडली बनवायची असेल तर डाळ- तांदूळ यापेक्षा रवा आणि दही या दोन पदार्थांचीच सगळ्यात जास्त गरज असते. त्यामुळेच तर दही आंबट झालं तर करून टाका त्याची इन्स्टंट इडली.. इन्स्टंट इडली करण्यासाठी दही टाकून रवा भिजवा आणि हे मिश्रण २ तास फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्याचे छान डोसे किंवा इडली होते. 

५. दही आलू
उकडलेल्या बटाट्याची दही टाकून केलेली भाजी अतिशय चवदार होते. यासाठी बटाटे उकडून घ्या. फोडणी करून त्यात कांदा- टोमॅटो प्युरी टाकून छान परतून घ्या. त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे टाका. मिश्रण एकदा हलवून झालं की त्यात दही आणि इतर मसाले टाकून छान वाफ येऊ द्या. गरमागरम दही आलू भाजी झाली तयार. 

 

६. दहिभात
दह्यात भिजवलेला भात आणि त्यावर हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक, शेंगदाणे असं घालून दिलेली खमंग फोडणी... उन्हाळ्यासाठी हा एक मस्त बेत होऊ शकतो.

७. ढोकळा
ढोकळा करण्यासाठी आपण एरवी लिंबू सत्व किंवा लिंबाचा रस वापरतो. त्याऐवजी आंबट दही वापरून बघा.. ढोकळा अधिक फुलून येईल आणि स्पाँजी होईल. 
 

Web Title: If the curd turn very much sour, Can's eat, then try these 7 amazing yummy, delicious recipies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.