Lokmat Sakhi >Food > ब्रेड पकोडा तर नेहमी खाता, ‘नो ब्रेड पकोडा’ कधी खाल्ला आहे का? खाऊन पाहा, नवा पौष्टिक पदार्थ

ब्रेड पकोडा तर नेहमी खाता, ‘नो ब्रेड पकोडा’ कधी खाल्ला आहे का? खाऊन पाहा, नवा पौष्टिक पदार्थ

No Bread Pakoda सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची नो ब्रेड पकोडा रेसिपी खूप चर्चेत आहे, ग्लुटेन फ्री नाश्त्याचा नवा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 05:34 PM2022-12-09T17:34:43+5:302022-12-09T17:36:44+5:30

No Bread Pakoda सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची नो ब्रेड पकोडा रेसिपी खूप चर्चेत आहे, ग्लुटेन फ्री नाश्त्याचा नवा पर्याय

If you always eat break pakoda, have you ever had 'no bread pakoda'? Try eating, a new nutritious food | ब्रेड पकोडा तर नेहमी खाता, ‘नो ब्रेड पकोडा’ कधी खाल्ला आहे का? खाऊन पाहा, नवा पौष्टिक पदार्थ

ब्रेड पकोडा तर नेहमी खाता, ‘नो ब्रेड पकोडा’ कधी खाल्ला आहे का? खाऊन पाहा, नवा पौष्टिक पदार्थ

सायंकाळ झाली की छोट्यांसह मोठ्यांना छोटी भूक लागते. काहीतरी हलकं फुलकं खाण्याची इच्छा प्रचंड होते. मात्र, वाढत्या कॅलरीजपासून त्रस्त असाल तर, ब्रेड पकोडा घरी ट्राय करून पहा. आता ब्रेड म्हंटलं की मैदा येतो, मैदाचे अतिसेवन देखील शरीरासाठी हानिकारक आहे. ब्रेड पकोडा ही रेसिपी डीप फ्राय करून बनवली जाते. सुप्रसिध्द शेफ कुणाल कपूर यांची नो ब्रेड पकोडा या रेसिपीला सध्या सोशल मीडियावर पसंती मिळते आहे. ही एक टेस्टी, हेल्दी, आणि पौष्टिक डिश आहे. 

नो ब्रेड पकोडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

२ कप बेसन

जिरं

मीठ

बारीक चिरलेला कांदा

लाल तिखट

बारीक चिरलेली हिरवी मिरची

कोथिंबीर

आलं 

हळद

कसूरी मेथी पावडर

चाट मसाला

जिरं पावडर

अर्धा कप दही

पाणी

बेकिंग सोडा

पनीर

कृती

नो ब्रेड पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन घ्या, त्यात जिरं, मीठ, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, हळद, कसूरी मेथी पावडर, चाट मसाला, जिरं पावडर, अर्धा कप दही, आवश्कतेनुसार पाणी घालून मिक्स करा. शेवटी बेकिंग सोडा मिक्स करा आणि एका दिशेने फिरवा.

दुसरीकडे सँडविच मेकर घ्या त्यात थोडं तेल पसरवा. त्यावर बेसनचं तयार पीठ घाला. आणि त्यावर पनीरचे तुकडे ठेवा. दोन्ही बाजूने ५ ते ८ मिनिटे शिजवून घ्या. सोनेरी रंग येऊ पर्यंत दोन्हीकडून चांगले भाजून घ्या. अशा प्रकारे नो ब्रेड पकोडा खाण्यास रेडी.

Web Title: If you always eat break pakoda, have you ever had 'no bread pakoda'? Try eating, a new nutritious food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.