Lokmat Sakhi >Food > हाडं - केस - त्वचा टवटवीत हवी? मग फक्त ‘हा’ एक पौष्टीक ड्रायफ्रुट्स लाडू खा; करा १५ मिनिटांत

हाडं - केस - त्वचा टवटवीत हवी? मग फक्त ‘हा’ एक पौष्टीक ड्रायफ्रुट्स लाडू खा; करा १५ मिनिटांत

If you eat this 1 laddu, it will help in strong bones, strong hair, & diseases will stay away! : छोटी भूक भागवण्यासाठी उलट सुलट पदार्थ खाणं टाळा; रोज एक ड्रायफ्रुट्स लाडू खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2024 05:54 PM2024-08-21T17:54:30+5:302024-08-21T17:55:24+5:30

If you eat this 1 laddu, it will help in strong bones, strong hair, & diseases will stay away! : छोटी भूक भागवण्यासाठी उलट सुलट पदार्थ खाणं टाळा; रोज एक ड्रायफ्रुट्स लाडू खा..

If you eat this 1 laddu, it will help in strong bones, strong hair, & diseases will stay away! | हाडं - केस - त्वचा टवटवीत हवी? मग फक्त ‘हा’ एक पौष्टीक ड्रायफ्रुट्स लाडू खा; करा १५ मिनिटांत

हाडं - केस - त्वचा टवटवीत हवी? मग फक्त ‘हा’ एक पौष्टीक ड्रायफ्रुट्स लाडू खा; करा १५ मिनिटांत

लाडू खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे (Food). लाडू अनेक प्रकारचे केले जातात. ज्यात ड्रायफ्रुट्सचे लाडू आवडीने खाल्ला जातो. ड्रायफ्रुट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे हाडं, डोळे, आणि स्किन - केसांनाही फायदा होतो (Health Tips). ड्रायफ्रुट्स प्रत्येकाच्या घरात असतात. पण ड्रायफ्रुट्स खाण्याचा अनेक जण कंटाळा करतात. किंवा खाणं टाळतात.

जर आपण ड्रायफ्रुट्सचा लाडू तयार करून खाल तर, थकवा अशक्तपणा आपल्याला जाणवणार नाही (Cooking Tips). शरीर सुदृढ आणि पोटही भरलेलं राहील. आपल्याला बऱ्याचदा छोटी भूक लागते. छोटी भूक भागवण्यासाठी आपण उलट सुलट पदार्थ खातो. पण उलट सुलट पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरातच लाडू तयार करून खाऊ शकता. ड्रायफ्रुट्सचे लाडू कसे करावे? पाहा(If you eat this 1 laddu, it will help in strong bones, strong hair, & diseases will stay away!).

बसायला जागा मिळवायची म्हणून पाहा महिला कशी चढली गाडीत.. कौतुक करावं की..

ड्रायफ्रुट्सचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य


तूप

बदाम

काजू

पिस्ता

किसलेलं सुकं खोबरं

खजूर पावडर

खजूर

काळे मनुके

अंजीर

वेलची पावडर

कृती

सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप चिरलेला बदाम घालून भाजून घ्या. नंतर त्यात बदाम, पिस्ता, किसलेलं सुकं खोबरं, खजूर पावडर घालून भाजून घ्या. भाजलेला सुका मेवा एका परातीत काढून घ्या. नंतर तुपात बिया काढलेले खजूर, काळे मनुके, अंजीर घालून भाजून घ्या.

मुलांशी सतत वादावादी-कडाक्याची भांडण? जनरेशनवर गॅप विसरा, करा फक्त ४ गोष्टी-मुलांशी पटेल मस्त

नंतर कढईत २ मोठे चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात डिंक घालून तळून घ्या. मिक्सरच्या भांड्यात तळलेले डिंक घालून पावडर तयार करा. तयार पावडर ड्रायफ्रुट्सच्या मिश्रणात घाला. नंतर त्यात एक चमचा वेलची पावडर घालून सर्व साहित्य हाताना एकजीव करा. हाताला थोडे तूप लावा आणि लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे ड्रायफ्रुट्सचे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी.

Web Title: If you eat this 1 laddu, it will help in strong bones, strong hair, & diseases will stay away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.