Lokmat Sakhi >Food > प्रोटीन डेफीशियन्सी आहे तर रोज खा 3 गोष्टी; प्रोटीन भरपूर- वजन कमी

प्रोटीन डेफीशियन्सी आहे तर रोज खा 3 गोष्टी; प्रोटीन भरपूर- वजन कमी

पाहूया शरीराला प्रोटीन्स मिळण्यासाठी आपण आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 04:48 PM2022-04-06T16:48:41+5:302022-04-06T16:58:44+5:30

पाहूया शरीराला प्रोटीन्स मिळण्यासाठी आपण आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करु शकतो.

If you have protein deficiency, eat 3 things daily; Lots of protein - weight loss | प्रोटीन डेफीशियन्सी आहे तर रोज खा 3 गोष्टी; प्रोटीन भरपूर- वजन कमी

प्रोटीन डेफीशियन्सी आहे तर रोज खा 3 गोष्टी; प्रोटीन भरपूर- वजन कमी

Highlightsइतर कडधान्यांपेक्षा झटपट होणारे आणि चवीलाही चांगले लागणाऱ्या मसूराचा प्रोटीनसाठी आहारात समावेश करायलाच हवा. शरीराला असणारी प्रोटीन आणि फायबरची गरज भरुन काढण्यासाठी चिया सीडस उपयुक्त असतात. 

शरीराची ताकद भरुन येण्यासाठी असो किंवा प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी असो प्रोटून्स शरीरातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कधी स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी तर कधी वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्स अतिशय महत्त्वाचे ठरतात. प्रोटीनसाठी आहारात विविध गोष्टींचा समावेश करणे आवश्यक असते. केवळ मांसाहार केला म्हणजेच आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतात असे नाही. तर त्याशिवायही अनेक पदार्थांमधून आपल्या शरीराची प्रोटीनची गरज भागू शकते. शरीरात प्रोटीनचे प्रमाण चांगले असेल तर हाडे ठणठणीत राहण्याबरोबरच रक्तदाबाचा त्रासही होत नाही. पाहूया शरीराला प्रोटीन्स मिळण्यासाठी आपण आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करु शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

१. पिनट बटर

२ चमचे पिनट बटर खाल्ले तर आपल्याला ८ ग्रॅम प्रोटीन मिळण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही आहारात नियमितपणे पिनट बटरचा वापर करु शकता. पोळी, ब्रेड यांना लावून पिनट बटर चांगले लागते. दाण्यांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. फळांबरोबरही आपण पिनट बटर खाऊ शकतो. 

२. चिया सीडस

४ चमचे चिया सीडसमध्ये १० ग्रॅम प्रोटीन असते. रात्रभर पाण्यात भिजवून ओटसबरोबर किंवा शेकसोबत चिया सीडस खाता येतात. किंवा स्मूदीमध्ये किंवा सॅलेड, बेकरी प्रॉडक्टमध्ये चिया सीडस आवर्जून खाल्ले जातात. मासिक पाळी नियमित नसेल किंवा आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारी असतील तर चिया सीडस खाणे अतिशय फाचद्याचे ठरते. शरीराला असणारी प्रोटीन आणि फायबरची गरज भरुन काढण्यासाठी चिया सीडस उपयुक्त असतात. 

(Image : Google)
(Image : Google)

३. मसूर 

मसूर ही डाळ आणि कडधान्य अशा दोन्ही स्वरुपात खाता येते. मसूराची आमटी, उसळ, मसूर भात असे अनेक प्रकार करता येतात. १.५ कप मसूरामध्ये १० ग्रॅम प्रोटीन असतात. त्यामुळे आहारात मसूराच्या डाळीचा आवर्जून समावेश करायला हवा. मसूरामध्ये प्रोटीन्सबरोबरच लोह, पोटॅशियम, फोलेट आणि फायबर असे सर्व घटक पुरेशा प्रमाणात असतात. इतर कडधान्यांपेक्षा झटपट होणारे आणि चवीलाही चांगले लागणाऱ्या मसूराचा प्रोटीनसाठी आहारात समावेश करायलाच हवा. 

 

Web Title: If you have protein deficiency, eat 3 things daily; Lots of protein - weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.