Lokmat Sakhi >Food > ऑलराउंडर तेल हवं तर मोहरीचं तेल निवडा; स्वयंपाक टेस्टी, तब्येतही ठणठणीत ठेवतील 5 गोष्टी !

ऑलराउंडर तेल हवं तर मोहरीचं तेल निवडा; स्वयंपाक टेस्टी, तब्येतही ठणठणीत ठेवतील 5 गोष्टी !

स्वयंपाकासाठीच्या तेलाबाबत मोहरीच्या तेलाला विशेष महत्त्व दिलं जातं. उत्तर प्रदेशात मोहरीचं तेलच वापरलं जातं. कारण ते तिथलं लोकल फूड मानलं जातं. पण हे तेल केवळ उत्तर प्रदेशातल्या लोकांनीच वापरावं असं नाही. कारण या तेलातील गुणधर्मांबद्दलचा अभ्यास सांगतो की आपलं सर्वांगिण आरोग्य जपण्याचा गुणधर्म मोहरीच्या तेलात आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 06:12 PM2021-09-26T18:12:02+5:302021-09-26T18:17:57+5:30

स्वयंपाकासाठीच्या तेलाबाबत मोहरीच्या तेलाला विशेष महत्त्व दिलं जातं. उत्तर प्रदेशात मोहरीचं तेलच वापरलं जातं. कारण ते तिथलं लोकल फूड मानलं जातं. पण हे तेल केवळ उत्तर प्रदेशातल्या लोकांनीच वापरावं असं नाही. कारण या तेलातील गुणधर्मांबद्दलचा अभ्यास सांगतो की आपलं सर्वांगिण आरोग्य जपण्याचा गुणधर्म मोहरीच्या तेलात आहे.

If you want allrounder oil, choose mustard oil; Cooking Tasty, 5 Things That Will Keep You Healthy! | ऑलराउंडर तेल हवं तर मोहरीचं तेल निवडा; स्वयंपाक टेस्टी, तब्येतही ठणठणीत ठेवतील 5 गोष्टी !

ऑलराउंडर तेल हवं तर मोहरीचं तेल निवडा; स्वयंपाक टेस्टी, तब्येतही ठणठणीत ठेवतील 5 गोष्टी !

Highlightsअभ्यास सांगतो की मोहरीच्या तेलात जीवाणू विरोधी घटक असतात. त्यामुळे मोहरीचं तेल स्वयंपाकात वापरल्यानं शरीरात घातक जिवाणुंचीवाढ होत नाही. मोहरीच्या तेलात स्वयंपाकाचा फायदा हा आहे की यामुळे आपलं वजन नियंत्रित राहातं.शुध्द मोहरीचं तेल केस आणि त्वचेचं आरोग्य जपतं. स्वयंपाकात वापरण्यासोबतच या तेलाचा उपयोग त्वचेवर लेप लावण्यासाठी केसांवर घरगुती उपचार करण्यासाठी होतो.

आपण करतो तो स्वयंपाक आरोग्यास फायदेशीर आहे की नाही हे आपण स्वयंपाकाला कोणतं तेल वापरतो यावर अवलंबून असतं. इतर सर्व बाबतीत चोखंदळ असलेल्या महिला तेलाच्या बाबतीत मात्र चोखंदळपणा दाखवत नाही. पदार्थ पौष्टिक करण्यात तेलाची मोठी भूमिका असते. विशेषत: वजन आणि हदयाच्या आरोग्याच्या बाबतीत तर स्वयंपाकाला कोणतं तेल वापरायचं याचा गांभिर्यानं विचार व्हायला हवा.

स्वयंपाकासाठीच्या तेलाबाबत मोहरीच्या तेलाला विशेष महत्त्व दिलं जातं. उत्तर प्रदेशात मोहरीचं तेलच वापरलं जातं. कारण ते तिथलं लोकल फूड मानलं जातं. पण हे तेल केवळ उत्तर प्रदेशातल्या लोकांनीच वापरावं असं नाही. कारण या तेलातील गुणधर्मांबद्दलचा अभ्यास सांगतो की आपलं सर्वांगिण आरोग्य जपण्याचा गुणधर्म मोहरीच्या तेलात आहे.

Image: Google

मोहरीच्या तेलाची वैशिष्ट्यं

१. तेलाचे गुणधर्म बघताना या तेलात 'पुफा'चं प्रमाण किती आहे हे बघितलं जातं. पुफा हे स्वयंपाकाच्या तेलातलं पोषक तत्त्वं आहे. पुफामूळे ओमेगा ३, ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड हे महत्त्वाचे पोषक तत्त्वं मिळतात. हा घटक वनस्पतीजन्य तेलात आढळतो. मोहरीच्या बियांपासून तयार होणाºया तेलात पुफा चं प्रमाण २१ टक्के असतं. पुफा म्हणजे पॉलीअनसॅच्यूरेटेड फॅटी अ‍ॅसिड.

२. तेलाच्या गुणधर्मात त्याच्या स्मोक पॉइंटलाही महत्त्व असतं. स्मोक पॉइंट म्हणजे ते तापमान जे तेल तापवणं कधी बंद करायला हवां ते ठ़रवतं. तेलाच्या स्मोक पॉइंटपेक्षा जर तेल जास्त तापवलं तर मग त्यातील पौष्टिक तत्त्वं निघून जातात आणि अशा तेलात घातक रसायनं निर्माण होतात. मोहरीच्या तेलाचा स्मोक पॉइंट २४९ डिग्री सेल्सिअस आहे. हा स्मोक पॉइंट एका गुणी तेलाचं वैशिष्ट्य आहे.

३ मोहरीच्या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिडचं अर्थात मुफाचं प्रमाण ६० टक्के आहे. यामुळेच वजन कमी करण्यासाठी म्हणून स्वयंपाकात मोहरीच तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. मोहरीच्या तेलामुळे हदयाचं आरोग्यही सुरक्षित राहातं. चवीला तिखट असलेलं हे उग्र गुणधर्माचं तेल आपलं आरोग्य जपण्यासाठी उत्तम तेल समजलं जातं.

४. मोहरीच्या तेलात पुफा आणि मुफाचं प्रमाण विपुल असतं सोबतच त्यात सॅच्युरेटेड म्हणजे विरघळणारे फॅटस, प्रथिनं आणि इतर सूक्ष्म पोषक तत्त्वं असतात. हे तत्त्व वजन वाढण्याचा, आणि हदय रोगाचा धोका कमी करतात. मोहरीचं तेल हे फायबर आणि स्टार्चच्या स्वरुपात आपल्याला कर्बोदकं देतात. हे कर्बोदकं आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करतात. तसेच आपली पचन व्यवस्था नीट ठेवण्याचं कामही करतात.

Image: Google

स्वयंपाकासाठी मोहरीचं तेल का?

१. अभ्यास सांगतो की मोहरीच्या तेलात जीवाणूविरोधी घटक असतात. त्यामुळे मोहरीचं तेल स्वयंपाकात वापरल्यानं शरीरात घातक जिवाणूंचीवाढ होत नाही. पांढरं मोहरीचं तेल एस्चेरिचिया कोलाई, स्टेफिलोकोकस ऑरियस आणि बेसिलस सेरस यासारख्या घातक जिवाणुंची शरीरात वाढ होण्यास प्रतिबंध करतं.

२. मोहरीच्या तेलात मुफाचं प्रमाण भरपूर असतं, हे फॅटी अ‍ॅसिडचे अनेक आरोग्यदायी लाभ होतात. अभ्यास सांगतो की मोहरीचं तेल ट्राइग्लिसराइड, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतं. त्यामुळेच हदयाचं आरोग्य जपण्यासाठी मोहरीचं तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो.

३. मोहरीच्या तेलात कॅन्सर पेशींची वाढ रोखण्याचा गुणधर्म असतो. मोहरीच्या तेलातील ओमेगा २ पुफा हा घटक कर्करोगाचा धोका कमी करतो, त्याचप्रमाणे मोहरीचं तेल नियमित स्वयंपाकात वापरल्यानं ट्यूमरचा आकारही पन्नास टक्क्यांनी कमी होतो असं अभ्यास सांगतो.

Image: Google

४. मोहरीच्या तेलात स्वयंपाकाचा फायदा हा आहे की यामुळे आपलं वजन नियंत्रित राहातं. मोहरीचं तेल बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करुन गुड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढण्यास मदत करतं. याचा वजन कमी होण्यास फायदा होतो,

५. शुध्द मोहरीचं तेल केस आणि त्वचेचं आरोग्य जपतं. स्वयंपाकात वापरण्यासोबतच या तेलाचा उपयोग त्वचेवर लेप लावण्यासाठी केसांवर घरगुती उपचार करण्यासाठी होतो. टाचांना पडलेल्या भेगा बऱ्या करण्यासाठी मेणात मिसळून मोहरीचं तेल भेगांना लावल्यास भेगा लवकर भरतात.
मोहरीचं तेल हे असं ऑलराऊण्डर असल्यानं स्वयंपाकासाठी आवर्जून वापरावं आणि आपलं आरोग्य जपावं असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

Web Title: If you want allrounder oil, choose mustard oil; Cooking Tasty, 5 Things That Will Keep You Healthy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.