Join us  

अशक्तपणा, रक्ताची कमतरता दूर करतील इम्युनिटी बुस्टर लाडू; रोज १ खा, हाडं राहतील ठणठणीत  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 8:34 AM

Immunity Boosting Ladoo Recipe : प्रोटीन्स, कॅल्शियमचा खजिना असलेले हे लाडू सोप्या पद्धतीनं घरी कसे बनवायचे ते पाहूया.(Healthy Immunity Booster Ladoo rich in Vitamins)

आपण कायम निरोगी  राहावं. सतत दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागू नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण ते वाटतं तितकं सोपं नाही. दिवसभरात खाण्यापिण्यात अनेक पदार्थ येत असतात.  ज्यामुळे पचनक्रियेवर आणि ओव्हलऑल शरीरावर परिणाम होत असतो. प्रोटीन्स कॅल्शियम मिळवण्यासाठी काय खायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. वेगवेगळे पदार्थ न खाता रोज एक लाडू खाऊन तुम्ही भरभरून पोषण मिळवू शकता. (How to make energy booster laddu)

पौष्टीक मेथी, डिंकाचे लाडू ताकद येण्यासाठी खाल्ले जातात हे तुम्ही ऐकूनच असाल कारण यातील पोषक तत्व रक्ताची कमतरता भरून काढतात आणि हाडांनाही पोषण देतात. (Healthy Protein Ladoo For Weight Loss) प्रोटीन्स, कॅल्शियमचा खजिना असलेले हे लाडू सोप्या पद्धतीनं घरी कसे बनवायचे ते पाहूया.(Healthy Immunity Booster Ladoo rich in Vitamins)

साहित्य

मखाने - १०० ग्राम

बदाम -  पाऊण काप 

खसखस - पाऊण  कप

टरबूजाच्या बीया - पाऊण कप

चणे - १ कप

खजूर - ५० ग्राम

खडीसाखर - १ कप

पाणी - १ कप

वेलची पावडर - २  टिस्पून

कृती

१) सगळ्या आधी एक कढईत गरम करून त्यात मखाने भाजून घ्या मग बदामही भाजून घ्या. भाजलेली खसखस, टरबूजाच्या बीया वेगवेगळ्या भाजून मखाणे आणि बदामात घाला. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक दळून घ्या.

२) बारीक पावडर तयार झाल्यानंतर एका भांड्यात काढा. नंतर भाजलेल्या चण्यांची सालं काडून त्याची पावडर बनवा.  तयार पावडर आधीच्या मिश्रणात घाला. मग मिक्सरचं  भाडं स्वच्छ करून त्यात खजूर घाला. (खडीसाखर वापरण्याऐवजी यात गुळाचा पाकही वापरू शकता)

३) बारीक केलेले खजूर तयार मिश्रणत घाला. त्यानंतर  चमच्याच्या साहाय्यानं सर्व मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या.  एका कढईत खडीसाखर आणि पाणी घालून व्यवस्थित वितळवून घ्या. यात वेलची पावडर घाला. 

४) साखरेचा पातळ पाक तयार झाल्यानंतर बदाम मखान्यांच्या मिश्रणात हा पाक घाला. या मिश्रणाचे बारीक लाडू वळून घ्या. तयार आहेत पौष्टीक लाडू.  हे लाडू चविला उत्तम आणि तब्येतीसाठी गुणकारी ठरतात.  

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती