फुलकोबीची भाजी, पकोडे, फुलकोबी मन्चुरियन असे पदार्थ आपण नेहमीच करत असतो. आता कोणतीही भाजी केली की ती गरज असेल तर पाण्यात घालून ठेवायची आणि नंतर करायची हे आपल्याला माहिती असतं. फुलकोबी, पत्ताकोबी किंवा ब्रोकोली या भाज्यांच्या बाबतीतही आपण तसंच करतो. फुलकोबी गरम पाण्यात टाकून ठेवतो तर पत्ताकोबी चिरल्यानंतर काही मिनिटांसाठी थंड पाण्यात ठेवतो. हे बरोबरच आहे (health tips about cauliflower). पण फुलकोबी, ब्रोकोली आणि पत्ताकोबी या भाज्या चिरल्यानंतर पाण्यात घालण्यापुर्वी किंवा शिजवण्यापुर्वी नेमकं काय करावं हे आहारतज्ज्ञ सांगत आहेत. (How to clean and chopped cauliflower before cooking?)
फुलकोबीची भाजी करण्यापुर्वी 'ही' गोष्ट लक्षात ठेवा
फुलकोबी, पत्ताकोबी किंवा ब्रोकोलीची भाजी चिरल्यानंतर ती शिजवण्यापुर्वी नेमकं काय करावं, याविषयीचा व्हिडिओ healthcoachguna या इन्स्टाग्राम पेजवर आहारतज्ज्ञांनी शेअर केला आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की या तिन्ही भाज्या चिरल्यानंतर त्या जवळपास ४० मिनिटे तशाच ठेवाव्या.
किचनमध्ये ठेवा पॉझिटीव्ह एनर्जी देणारी ५ रोपं.. स्वयंपाक करताना मन राहील प्रसन्न- फ्रेश
कारण जेव्हा आपण या भाज्या चिरतो, तेव्हा त्या भाज्यांमधून sulforophane हा वायू तयार होतो. कॅन्सरच्या सेल्सशी लढण्यासाठी हा वायू अतिशय उपयुक्त असतो असं म्हटलं जातं. भाज्या चिरल्यानंतर या वायुतील घटक ॲक्टीवेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे जवळपास ४० मिनिटे तरी चिरल्यानंतर या भाज्या तशाच ठेवाव्या आणि नंतर शिजवाव्या.
विशेषत: फुलकोबी चिरल्यानंतर ४० मिनिटे तशीच ठेवावी. त्यानंतर ती गरम पाण्यात टाकावी आणि नंतर शिजवायला घ्यावी. असे केल्याने त्यातील sulforophane तर ॲक्टीव्ह होईलच.
बघा चमचाभर मेथीची जादू, पातळ केस होतील दाट, लांबसडक- केस गळणं कायमचं बंद
पण गरम पाण्यात टाकल्यामुळे त्यातील घाण, किडे, अळ्या निघून भाजी स्वच्छही होईल.