Lokmat Sakhi >Food > स्वातंत्र्य दिन विशेष : तिरंगा सॅण्डविचची चविष्ट रेसिपी, सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक पदार्थ...

स्वातंत्र्य दिन विशेष : तिरंगा सॅण्डविचची चविष्ट रेसिपी, सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक पदार्थ...

Independence Day Special : Tricolour Sandwich Recipe : स्वातंत्र्य दिन विशेष: स्पेशल नाश्ता करुन स्वातंत्र्य दिन करा साजरा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2023 02:33 PM2023-08-14T14:33:23+5:302023-08-14T14:48:28+5:30

Independence Day Special : Tricolour Sandwich Recipe : स्वातंत्र्य दिन विशेष: स्पेशल नाश्ता करुन स्वातंत्र्य दिन करा साजरा....

Independence Day Special : Tricolour Sandwich Recipe. | स्वातंत्र्य दिन विशेष : तिरंगा सॅण्डविचची चविष्ट रेसिपी, सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक पदार्थ...

स्वातंत्र्य दिन विशेष : तिरंगा सॅण्डविचची चविष्ट रेसिपी, सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक पदार्थ...

सँडविच म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतं ते मस्तपैकी दोन ब्रेडमध्ये भाज्या घातलेला भरपूर बटर, टोमॅटो सॉस आणि वरून शेव भुरभुरून सर्व्ह केलेला चटकदार पदार्थ. सकाळ असो किंवा संध्याकाळ सँडविच हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळी खाल्ला तरी चालतो. अगदी आपण टिफीनमध्ये देखील  सँडविच देऊ शकता किंवा डिनरसाठीही करू शकता. काहीजणांना चहासोबत सँडविच खायला आवडतं. थोडक्यात काय तर सँडविच हा झटपट होणारा आणि पोटभरीचा पौष्टिक पदार्थ आहे. खरंतर सँडविचमध्ये भरपूर प्रकार पाहायला मिळतात.

दरवर्षी स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जातो. स्वातंत्र्यदिनाची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. महाविद्यालये आणि शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी प्रत्येकजण तिरंग्याच्या रंगात रंगलेला दिसतो. काहीलोक या निमित्ताने प्रवास करण्याचा विचार करतात, तर काहीजण घरी राहून खास पदार्थ बनवून हा दिवस साजरा करतात. यावेळी तुम्ही ट्राय कलर सँडविच देखील बनवू शकता. हे सँडविच बनवणे खूप सोपे आहे. यासोबतच ते खूप चविष्ट व पौष्टिकसुद्धा आहे. हे सँडविच आपण घरी सहज कसे बनवू शकता, याचे साहित्य व कृती पाहूयात(Independence Day Special : Tricolour Sandwich Recipe).

साहित्य :- 

१. टोमॅटो केचप - १ टेबलस्पून 
२. मेयॉनीज - २ टेबलस्पून 
३. सँडविच ब्रेड स्लाइस - ४ ते ५ स्लाइस 
४. बटर - २ टेबलस्पून
५. हिरवी चटणी - ३ ते ४ टेबलस्पून 
६. किसलेली काकडी - ३ ते ४ टेबलस्पून 
७. चीज - २ टेबलस्पून (किसून घेतलेले)
८. गाजर -  ३ ते ४ टेबलस्पून (किसून घेतलेले)

मेथीची तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला ? करा मेथीची खमंग, खुसखुशीत वडी...बेत होईल फक्कड !!


कृती :- 

१. सर्वप्रथम सँडविच ब्रेड स्लाइस घेऊन त्याच्या चौकोनी कडा सुरीने व्यवस्थित कापून घ्याव्यात. 
२. त्यानंतर एक ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर बटर पसरवून लावावे. 
३. बटर पसरून लावलेल्या या स्लाइसवर हिरवी चटणी देखील लावावी. 
४. आता या स्लाइसवर किसलेली काकडी पसरवून घालावी. 

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...

५. त्यानंतर त्यावर एक ब्रेड स्लाइस ठेवावा या वरच्या ब्रेड स्लाइसला प्रथम बटर व नंतर मेयॉनीज पसरवून लावून घ्यावे. 
६. आता या स्लाइसवर किसलेले चीज पसरवून घालावे त्यानंतर त्यावर अजून एक ब्रेड स्लाइस ठेवावा. 
७. त्यानंतर टोमॅटो केचपमध्ये मेयॉनीज मिसळून त्याचा नारंगी रंगाचा सॉस तयार करून घ्यावा. हा सॉस ब्रेड स्लाइसला लावून घ्यावा. 
८. आता या स्लाइसवर किसलेले गाजर घालून घ्यावे व त्यावर एक ब्रेड स्लाइस ठेवून सँडविच बरोबर मध्यभागी कापून घ्यावे. 

पोहे-बेसन-रवा-तांदूळात पावसाळ्यात अळ्या-किडे होतात ? ५ सोपे उपाय- तमालपत्र-दालचिनी-कडूनिंबाचा स्मार्ट वापर...

आपले तिरंगा सँडविच खाण्यासाठी तयार आहे. हे सँडविच हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.

Web Title: Independence Day Special : Tricolour Sandwich Recipe.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.