परदेशात जाऊनही भारतीय संस्कृती जोपासणारे खूप कमी लोक असतात. सोशल मीडियावर एका ब्लाॉगरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Indian australian bloggers make vangaycha bharit) राणी पाटील पवार नावाच्या महिलेनं आपल्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेत आहे त्याला कारणंही तसंच आहे. राणी मूळची महाराष्ट्रातल्या खान्देशातील असून ती सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्यास आहे. (Indian australian bloggers make vangaycha bharit)
तिनं ऑस्ट्रेलियामध्ये गावरानं पद्धतीनं वांग्याचं भरीत बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी नथीची प्रिटींग असलेली पांरपारीक खणाची साडी तिनं नेसली आहे आणि त्यावर साजेसे दागिने. या मराठमोळ्या वेशात तिनं चुलीवर वांग्याचं भरीत बनवलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही युजर्सनी आम्हाला तुझा अभिमान असल्याची कमेंट केली आहे. तर काहींनी ट्रोल केलंय.
ऑस्ट्रेलियात राहून राणी तिथल्या बऱ्याच गोष्टींचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करते. ऑस्ट्रेलियात रस्ता ओलांडण्यासाठी कोणती पद्धत वापरतात, तिथे होळी कशी साजरी करतात, न्यू ईयर सेलिब्रेशन यावर तिनं व्हिडिओज पोस्ट केले आहेत. भारतीय सोशल मीडिया युजर्सचा भरभरून प्रतिससाद तिला मिळतो.
पांरपारीक वांग्याचं भरित बनवण्याची रेसिपी