सध्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बराच बदल झालेला दिसून येत आहे. तळलेले, भाजलेले पदार्थ खाणं आपल्या सर्वांनाच फार आवडते. (Cooking Hacks & Tips) कोणतीही वस्तू फ्राय केल्यानंतर त्यातील तेल ट्रांसफॅटमध्ये बदलते. अशा स्थितीत या तेलाचा वापर पापड बनवण्यासाठी केला जातो. या तेलात तयार केलेले पापड खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल लेव्हल वाढते याशिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. (Chef Pankaj Bhadoria Shares Tricks On How To Fry Papad Without Oil)
आपण पापड खाणं सोडण्यापेक्षा बिना तेलाचे पापड बनवण्यासाठी काही मार्ग शोधायला हवा. शेफ पंकज भदौरिया यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या बिना तेलाचे पापड करण्यासाठी व्हिडिओत एक सोपी ट्रिक सांगितली आहे. जर तुम्हाला चिप्स किंवा पापड खायला खूपच आवडत असेल तर तुम्हीही घरगुती उपाय करू शकता. शेफ पंकज भदौरिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओला ७ मिलियन पेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत.
वाढतं वजन आणि आजारपणामुळे लोक तळलेले खाणं पसंत करतात. पापड, चिप्स बिना तेलाचे मिळाले तर लोक आवडीने खातील. लोक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. एअर फ्रायर विकत घेणं प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसतं. यासाठी शेफ पंकज भदौरियांनी यांनी सोपे हॅक्स सांगितले आहेत.
सॉल्ट टेक्निकने पापड बनवा
सगळ्यात आधी शेफने कढई गरम करून स्टोव्ह गॅसवर ठेवला. त्यानंतर त्यात तेल घालण्याऐवजी भरपूर मीठ घातलं. त्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि मीठ थोड्यावेळासाठी गरम करून घ्या. नंतर त्यात पापड घाला आणि मीठासोबत मिसळा. त्यानंतर फ्रायम्स वेगळे सेट करून मिठासोबत शिजवून खाऊ शकता.
गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक जाणून घेऊ इच्छित आहेत की समोसा, कचौरी, बनवण्यासाठी सॉफ्ट टेक्निकाच वापर करता येतो की नाही. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. मीठाचा वापर केल्याने केल्याने गॅस वाया जातो असं काहीजणांनी म्हटलं तर मीठाच्या सेवनाने ब्लड प्रेशरचा त्रास कमी होऊ शकतो असेही म्हटले आहे.