भारत हा खवय्यांचा देश आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण येथील प्रत्येक कोपऱ्यात चिभेचे चोचले पुरवणारा खवय्या नक्कीच सापडेल. भारतात विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यातील कढी हा पदार्थ फार फेमस आहे. जेवणात केवळ कढी आणि भात जरी असला तरी, दुसरे काही खाण्याची इच्छा होत नाही. पण, कढीच्याही विविध पद्धती आहे. प्रत्येक ठिकाणी कढी ही बनवली जाते. केवळ त्याची बनवण्याची शैली ही वेगळी असते.
राजस्थानी, गुजराती, पंजाबी तसेच छत्तीसगडमध्येही कढी बनवली जाते. महाराष्ट्रात देखील ताकेची कढी बनवली जाते. मात्र, अनेकदा घरी कढी बनवल्यानंतर हवी तशी चव त्याला येत नाही. आपल्याला जर टेस्टी कढी बनवायची असेल तर, काही टिप्स फॉलो करा. ज्यामुळे नक्कीच कढीचा आस्वाद द्विगुणीत होईल.
कढी चवदार - हटके बनवण्यासाठी टिप्स
बरेच लोक दही किंवा ताकापासून कढी बनवतात. आपण त्या व्यतिरिक्त कढीमध्ये कोणत्याही भाज्यांचा वापर करीत नाही. मात्र, त्यात आपण बटाट्याचा वापर करू शकता. बटाट्याचे काप करून त्यात शिजवा. ज्यामुळे कढीला नवी चव येईल.
आधीच घाई त्यात पर्स किंवा पँटची चेनच खराब झाली? ६ टिप्स, चेन करा दुरुस्त दोन मिनिटांत
फोडणीसाठी बटरचा वापर करा
कढीची चव वाढवण्यासाठी आपण फोडणी देतो. पण फोडणी देताना तेलाचा वापर न करता, बटरचा वापर करा. फोडणीत लोणी मिसळल्यास त्याची चव आणखी वाढते. त्या फोडणीत कांदा, सुक्या मिरच्या आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून तयार करू शकता.
कढीमध्ये मिक्स करा पनीरचे पकोडे
पंजाबमध्ये पंजाबी कढी फार फेमस आहे. त्या कढीची वैशिष्ट्य म्हणजे त्यात पकोडे मिक्स केले जातात. आपण त्यात पनीर पकोडे अथवा बेसनपासून तयार पकोडे बनवून मिक्स करू शकता. यामुळे कढीची चव नक्कीच वाढेल.