Join us  

एकाच चवीचे वरण खाऊन कंटाळा आला? मास्टर शेफ पंकज सांगतात, ५ प्रकरच्या फोडण्या - खा चमचमीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 1:07 PM

5 ways you can add tadka to your food : मास्टरशेफ पंकज भदौरिया डाळींना नेहमीची फोडणी देण्याऐवजी सांगतात ५ हटके नवीन प्रकार, डाळ होईल अधिक खमंग, चविष्ट, रुचकर...

भारतीय थाळीत डाळींना विशेष असे स्थान असते. डाळींशिवाय आपले जेवण पूर्ण होऊच शकत नाही. चपाती, भात पदार्थ कोणताही असो त्यासोबत डाळ ही लागतेच. डाळ चविष्ट व खमंग होण्यासाठी तिला दिली जाणारी खमंग फोडणी (Why adding tadka to your food is important and 5 types of tadkas one should know about) ही अतिशय महत्वाची असते. डाळीला येणारी चव ही तिला दिल्या जाणाऱ्या फोडणीच्या प्रकारावर अवलंबून असते. डाळीला जर हवी तशी खमंग फोडणी बसली तरच डाळीची चव उत्तम लागते(Indian Cooking Tips: 5 Types Of Tadka You Can Add To A Bowl Of Dal).

विशिष्ट डाळीत आणि आमटीत अमूकच मसाला घालायचा, त्याचं प्रमाण हे ठरलेलं असतं. त्यामुळेच डाळी व आमट्या खाताना आपल्याला त्याची कायम एकसारखीच चव लागते. उलट मसाल्यांमधे थोडी अदलाबदल करुन त्यांना विशिष्ट चव देण्याचा प्रयत्न आपण कधीतरी किचनमध्ये करुन पाहतो. या प्रयत्नात सगळ्यात जास्त महत्त्व आहे फोडणीला. नेहमीप्रमाणेच तयार केलेल्या डाळींना जरा वेगळ्या पध्दतीची फोडणी (5 Types Of Tadka To Add A Burst Of Flavour To Dal) दिली किंवा साध्या वरणालाही विशेष फोडणी (How to Make Tadka) देऊन त्याची चव स्पेशल करता येते. आपण नेहमीप्रमाणे डाळींना त्याच पद्धतीची फोडणी देऊन त्याच चवीची डाळ खाऊन कधीतरी कंटाळतोच. अशावेळी जरा वेगळ्या हटके स्टाईलने डाळींना फोडणी देऊन रोजच्याच डाळी आपण अधिक खमंग, रुचकर बनवू शकतो. मास्टरशेफ पंकज भदौरिया (Pankaj Bhadouria) डाळींना कोणत्या वेगळ्या ५ पद्धतीने फोडणी (5 Tadkas To Spruce Up Your Regular Dals) देता येईल याच्या सोप्या ट्रिक्स सांगतात. डाळींना अधिक खमंग, रुचकर बनवण्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने फोडणी द्यावी ते पाहूयात(5 Different Types Of Desi Tadkas To Spice Up Your Dal). 

डाळींना फोडणी देण्याच्या ५ प्रमुख पद्धती :- 

१. महाराष्ट्रीयन - डाळ आमटी :- १ टेबलस्पून साजूक तूप घेऊन त्यात प्रत्येकी १/२ टेबलस्पून जिरे, मोहरी घालावे. त्यानंतर त्यात चिमूटभर हिंग, ६ ते ७ कडीपत्त्याची पाने घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी. मग यात शिजवून घेतलेली तूर डाळ घालावी. तूर डाळ घातल्यानंतर यात किसलेल खोबर १ टेबलस्पून, प्रत्येकी १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, गूळ, लाल मिरची पावडर, गोडा मसाला घालावा. सगळ्यांत शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. खमंग फोडणी दिलेली महाराष्ट्रीयन - डाळ आमटी खाण्यासाठी तयार आहे. 

यंदा गुलाबी थंडीत करा मसालेदार खट्टामिठा पेरु चाट, तोंडाला पाणी सुटेल - घ्या झटपट रेसिपी...

२. यू. पी स्टाईल डाळ तडका :- २ टेबलस्पून साजूक तूप घेऊन त्यात चिमूटभर हिंग, १ टेबलस्पून जिरे, ३ ते ४ लाल सुक्या मिरच्या, बारीक चिरुन घेतलेला लसूण घालून आधी फोडणी तयार करुन घ्यावी. फोडणी झाल्यावर त्यात शिजवून घेतलेली तूर डाळ घालावी. मग त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. 

ना बटाटे उकडण्याची गरज - ना सारणाची भानगड, फक्त १० मिनिटांत करा गरमागरम आलू पराठे...

३. पंजाबी डाळ तडका :- सर्वात आधी २ टेबलस्पून साजूक तूप घेऊन त्यात १/२ टेबलस्पून जिरे, १ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, प्रत्येकी १ टेबलस्पून बारीक किसलेलं आलं, लसूण व हिरवी मिरची घालून घ्यावी. त्यानंतर या फोडणीत लाल तिखट मसाला, बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला की पंजाबी डाळ तडक्याची चविष्ट, मसालेदार फोडणी तयार आहे. आता यात शिजवून घेतलेल्या तूर, मसूर व बारीक पिवळ्या मूग डाळीचे मिश्रण घालावे. 

मेथीची भाजी कडवट होते ? ९ गोष्टी - मेथीची भाजी होईल एकदम चमचमीत - कडू अजिबात लागणार नाही...

४. बंगाल स्पेशल मसूर डाळ :- बंगाल स्पेशल मसूर डाळ बनवण्यासाठी २ टेबलस्पून मोहरीचे तेल घेऊन त्यात १ तमालपत्र, १ टेबलस्पून काळ जिरं, प्रत्येकी २ सुक्या लाल व हिरव्या मिरच्या घालाव्यात. त्यानंतर त्यात १ टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं घालून मग शिजवलेली लाल मसूर डाळ घालून एक हलकीशी उकळी येऊ द्यावी. बंगाल स्पेशल मसूर डाळ तयार आहे. 

फ्रेंच फ्राईज परफेक्ट होण्यासाठी शेफ पंकज भदोरिया सांगतात ५ स्टेप्स, उपवासाला खा रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज...

५. राजस्थानी स्पेशल नागौरी डाळ :- राजस्थानी स्पेशल नागौरी डाळ बनवण्यासाठी सर्वात आधी २ टेबलस्पून साजूक तूप घेऊन त्यात चिमूटभर हिंग, प्रत्येकी १ टेबलस्पून जिरे, बडीशेप, १ कप बारीक चिरलेला टोमॅटो घालून फोडणी तयार करावी. फोडणी तयार झाल्यावर त्यात शिजवून घेतलेली तूर डाळ व अख्ख्या मसूर डाळीचे मिश्रण घालावे. डाळ थोडी शिजत आल्यावर त्यात लाल तिखट मसाला, आमचूर पावडर, २ लाल सुक्या मिरच्या, १/२ टेबलस्पून कसुरी मेथी घालून सगळे जिन्नस एकत्रित ढवळून घ्यावे. ही डाळ सर्व्ह करताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून मग वरुन साजूक तुपाची धार सोडावी. आपली राजस्थानी स्पेशल नागौरी डाळ खाण्यासाठी तयार आहे.     

अशाप्रकारे आपण रोज बनवल्या जाणाऱ्या त्याच नेहमीच्या डाळींना थोडी हटके खमंग स्टाईलने फोडणी दिली तर या डाळींची चव आणखीनच चांगली लागेल.

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्स