जगभरातील खाद्य पदार्थांचा (Indian food/ Indian cuisine) जेव्हा विषय निघतो, तेव्हा भारतीय पदार्थांचं नाव आवर्जून घेतलंच जातं. भारतीय आहार हा एक परिपूर्ण आहार आहे, असं आपण मानतो. कारण त्यामध्ये खारट, तिखट, तुरट, आंबट अशा सगळ्याच चवींचा आणि सगळ्याच पोषक पदार्थांचा उत्तम समन्वय साधलेला असतो. पण Taste Atlas यांच्यावतीने २०२२ या वर्षीसाठी नुकतीच जगभरातील विविध देशातील पदार्थांची एक यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये भारतीय पदार्थांना (Indian cuisine) पाचवे स्थान (5th best cuisine in the world) मिळाले आहे.
भारतीय पदार्थांना मिळालेले पाचवे स्थान पाहून अनेक भारतीय नाराज झाले आहेत. त्यांच्यामते भारतीय पदार्थ हे जगातील इतर देशांमधील पदार्थांच्या तुलनेत अव्वल आहेत. त्यामुळे त्यांचे स्थान आणखी वरचे असायला पाहिजे होते.
ड्रेस मोठा झाला, सैल होतोय? अल्टर न करताच करा परफेक्ट मापाचा एका मिनिटात, बघा झटपट भन्नाट आयडिया
त्याउलट काही भारतीय खवय्यांच्या मते पाचव्या स्थानावर भारतीय पदार्थांची दखल घेतली जाणे, हे देखील काही कमी नाही. कारण या यादीत एकूण ५० देशांमधील पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. जगभरातील पदार्थांना खवय्यांकडून मिळालेल्या वोटिंगनुसार ही यादी घोषित करण्यात आली असून भारतीय पदार्थांना ५ पैकी ४. ५४ एवढे रेटिंग मिळाले आहे. शिवाय गरम मसाला, तूप, मलाई, बटर गार्लिक नान असे काही भारतीय पदार्थ आवर्जून खाऊन पहावेत, असा खास उल्लेखही त्यामध्ये करण्यात आला आहे.
भारतात गेल्यावर नेमक्या कोणत्या ठिकाणी हे पदार्थ खाऊन पहावेत याचीही एक यादी देण्यात आली असून यामध्ये मुंबई, बँगलोर, नवी दिल्ली, गुरुग्राम यांच्यासह एकूण ४६४ शहरांमधील रेस्टॉरंट्सची नावं आहेत.
गार्डनिंगसाठी खूप वेळ नाही? ९ रोपं लावा, खूप काळजी न घेताही नेहमीच राहतील हिरवीगार- फ्रेश
सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या या यादीत इटली प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल ग्रीस, स्पेन, जापान अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चाैथ्या क्रमांकावर आहेत.
Which one is your favorite?
— TasteAtlas (@TasteAtlas) December 22, 2022
Full top 95 list: https://t.co/194Xj0ZMZ4pic.twitter.com/v4uYHnGzGD