Join us  

तांदूळ कुकरमध्ये शिजवून ५ मिनिटात करा वर्षभर टिकणारा कुरकुरीत पदार्थ; झपटपट स्नॅक्स रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 3:31 PM

Indian Snacks Recipe :

उन्हाळ्याच्या दिवसात बरेजण वर्षभरासाठी पापड,  चकल्या, कुरड्या बनवून ठेवतात.  एकदा हे पापड बनवले की वर्षभर खाता येतात. तांदाळाचे पापड तळल्यानंतर फुलून बरेच मोठे दिसतात आणि खायलाही कुरकुरीत, चविष्ट लागतात. (Indian Snacks Recipe)  कच्च्या तांदळांपासून बनवता येईल असा सोपा कुरुकुरीत पदार्थ पाहूया. मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही या तांदळाच्या स्टिक्स तळू शकता. (Summer Special popular Indian snack recipe)

- तांदळाच्या कुरडया/ स्टिक्स बनवण्यासाठी ४ ते ५ तास तांदूळ भिजवून ठेवा.  कुकरमध्ये तेल आणि जीरं घालून त्यात पाणी  घाला. हे पाणी उकळ्यानतंर भिजवून पाणी काढून घेतलेले तांदूळ त्यात घाला.  एक चमचा मीठ घालून  कुकरचं झाकण बंद करा. ४ शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर उघडून हे तांदळाचं मिश्रण एकसंथ करून घ्या.

- एका प्लास्टीकच्या पिशवीला तेल लावून त्यात हे मिश्रण भरा. प्लास्टीकच्या कागदाला तेलानं ग्रीस करून त्यावर हे मिश्रण घाला. तुम्ही हे मिश्रण साच्यात घालून हवातसा आकार देऊ शकता. १ ते २ दिवस कडक उन्हात सुकवल्यानंतर या स्ट्रिक्स तळायला तयार आहेत.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न