Join us  

रवा बटाट्याची इडली कधी खाल्ली आहे? डाळ तांदूळ न भिजवता - न आंबवता करा झटपट इडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 11:10 AM

Indian style Rava - aloo Idli, best for breakfast and tiffin :१५ मिनिटात तयार करा रवा इडली; मऊ, फुगणाऱ्या इडल्यांची एकदम सोपी रेसिपी

नाश्त्याला बरेच जण इडली (Idli) खातात. इडली खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत. इडली खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हा दाक्षिणात्य पदार्थ वाफवून तयार केला जातो. ज्यामुळे वजन वाढत नाही. आपण डाळ-तांदुळाची इडली ट्राय करून पाहिलीच असेल, पण कधी रव्याची इडली करून पाहिली आहे का?

डाळ-तांदुळाची इडली करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. डाळ-तांदूळ भिजवण्यापासून ते वाटण्यापर्यंत यात खूप वेळ जातो. जर आपल्याला इडली खायची इच्छा झाली असेल, पण डाळ-तांदूळ भिजत घालायला विसरला असाल, तर रवा-बटाट्याची इडली करून पाहा. रवा-बटाट्याची इडली चवीला तर भन्नाट लागतेच शिवाय, झटपट तयार होते. चला तर मग रवा-बटाट्याची इडली कशी तयार करायची पाहूयात(Indian style Rava - aloo Idli, best for breakfast and tiffin).

रवा-बटाट्याची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

बटाटा

तेल

मोहरी

उडीद डाळ

नवरात्रात पोटभर खा वरीच्या तांदळाचा उपमा, पित्ताचा त्रास नाही -पचायला हलके-वजनही होईल कमी

कडीपत्ता

हिंग

हिरवी मिरची

गाजर

मक्याचे दाणे

दही

इनो

कृती

सर्वप्रथम, २ कच्चे बटाटे बारीक चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात चिरलेला बटाटा व थोडं पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. एका कढईत २ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा उडीद डाळ, ४ ते ५ कडीपत्त्याची पानं, चिमुटभर हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला गाजर व मक्याचे दाणे घालून परतवून घ्या. नंतर त्यात २ कप रवा घालून सर्व साहित्य एकत्र भाजून घ्या. ३ ते ४ मिनिटं साहित्य भाजून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बटाट्याची पेस्ट, अर्धा कप दही व चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

ज्वारीच्या पिठाची भाकरी नेहमीचीच, करून पाहा कपभर पीठाचे खुसखुशीत वडे, पौष्टीक नाश्ता १० मिनिटात रेडी

साहित्य एकजीव झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा इनो घालून त्यावर थोडे पाणी घालून मिक्स करा. दुसरीकडे इडली ट्रे ला तेल लावून ग्रीस करा, त्यावर तयार बॅटर चमच्याने घाला. त्यानंतर ट्रे इडली स्टीमरमध्ये ठेऊन १० मिनिटापर्यंत इडली शिजवून घ्या. १० मिनिटानंतर इडली शिजली आहे की नाही हे चेक करा. नंतर चमच्याने हळुवारपणे इडली काढा. अशा प्रकारे रवा-बटाट्याची इडली खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स