Join us  

उडीद डाळीचे टम्म फुगलेले आप्पे, पीठ आंबविण्याचीही गरज नाही- मुलांच्या डब्यासाठी चवदार मेन्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 11:39 AM

How To Make Appe Using Urad Dal: नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी उडीद डाळीचे आप्पे हा एक खूप चांगला पदार्थ आहे, करून पाहा.. (easy and quick breakfast recipe)

ठळक मुद्देबघा हा सुपरहेल्दी आणि सुपर टेस्टी पदार्थ नेमका कसा करायचा...

नाश्याला काय करावं किंवा मुलांना आज डब्यात काय द्यावं, हा प्रश्न बहुसंख्य महिलांना रोज छळतो. कारण घरात प्रत्येकालाच काहीतरी वेगळं पाहिजे असतं शिवाय ते चवदारही असायला हवं. असं काहीतरी वेगळं करताना घरातल्या मंडळींच्या पोटाची, आरोग्याची काळजीही घ्यावीच लागते. म्हणूनच आता हा एक खास पदार्थ करून पाहा. उडीद डाळीचे आप्पे (Instant appe recipe) करण्यासाठी आपल्याला तांदूळ वापरायचे नाहीत (how to make appe using urad dal). शिवाय पीठ तयार करून ते कधी आंबेल, याची वाट पाहण्याचीही गरज नाही (how to make appe recipe without using rice). बघा हा सुपरहेल्दी आणि सुपर टेस्टी पदार्थ नेमका कसा करायचा...(easy and quick breakfast recipe)

उडीद डाळीचे आप्पे करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ वाट्या उडीद डाळ

अर्धी वाटी हरबरा डाळ

अर्धी वाटी रवा

'या' ५ चुका कराल तर व्यायाम- डाएट करूनही वजन कमी होणारच नाही, बघा नेमकं कुठे चुकतं

२ हिरव्या मिरच्या

लसूणाच्या ७ ते ८ पाकळ्या

आल्याचा छोटासा तुकडा

१ मध्यम आकाराचा कांदा

नाश्ता करताना फक्त २ गोष्टी लक्षात ठेवा, नेहमीच राहाल फिट- वजनही वाढणार नाही

२ टेबलस्पून लिंबाचा रस

१ टेबलस्पून धने- जिरेपूड

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी उडीद डाळ आणि हरबरा डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि ७ ते ८ तास पाण्यात भिजत घाला. नाश्त्याला आप्पे करणार असाल तर रात्री झोपताना डाळ भिजत घातली तरी चालेल.

यानंतर भिजलेली डाळ, मिरच्या, लसूण, आलं हे सगळं मिक्सरमधून फिरवून त्याचं पीठ करून घ्या.

केस वाढतच नाहीत? तांदळाच्या पाण्याचा सोपा उपाय करा, भराभर वाढून केस होतील लांबसडक

या पिठात चवीनुसार मीठ, धने- जिरे पूड घालून लिंबू पिळा आणि थोडा रवा टाका.

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की आप्पे पात्राला तेल लावून त्याचे नेहमीप्रमाणे आप्पे करा. 

लोणचं, सॉस, चटणी यासोबत खायला हा पदार्थ उत्तम आहे. मुलांसकट घरातल्या सगळ्यांनाच आवडेल. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती