Lokmat Sakhi >Food > डाळ- तांदूळ भिजत घालण्याची गरजच नाही, १० मिनिटांत करा कणकेचा कुरकुरीत डोसा- बघा सोपी रेसिपी 

डाळ- तांदूळ भिजत घालण्याची गरजच नाही, १० मिनिटांत करा कणकेचा कुरकुरीत डोसा- बघा सोपी रेसिपी 

How To Make Atta Dosa In Just 10 Minutes: मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. बघा कणकेचा डोसा करण्याची खास रेसिपी. (quick recipe of atta dosa)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 09:13 AM2024-07-30T09:13:29+5:302024-07-30T09:15:02+5:30

How To Make Atta Dosa In Just 10 Minutes: मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. बघा कणकेचा डोसा करण्याची खास रेसिपी. (quick recipe of atta dosa)

instant atta dosa recipe, how to make atta dosa in just 10 minutes, quick recipe of atta dosa, perfect menu for kids tiffin and breakfast | डाळ- तांदूळ भिजत घालण्याची गरजच नाही, १० मिनिटांत करा कणकेचा कुरकुरीत डोसा- बघा सोपी रेसिपी 

डाळ- तांदूळ भिजत घालण्याची गरजच नाही, १० मिनिटांत करा कणकेचा कुरकुरीत डोसा- बघा सोपी रेसिपी 

इडली, डोसा हे बहुसंख्य लोकांच्या अतिशय आवडीचे पदार्थ. पण हे पदार्थ करायचे म्हटलं तर सगळ्यात आधी डाळ- तांदूळ भिजत घाला त्यानंतर ते मिक्सरमधून वाटून घ्या. नंतर पीठ आंबवून घ्या असे अनेक प्रकार करावे लागतात. हे सगळं करत बसण्याचा अनेकींना कंटाळा येतो. काही जणींकडे खरोखरच तेवढा वेळ नसतो (how to make aata dosa in just 10 minutes). म्हणूनच अशावेळी डाळ- तांदूळ भिजत न घालता अवघ्या १० मिनिटांत होणारे कणकेचे कुरकुरीत डोसे करा. (perfect menu for kids tiffin and breakfast)

 

कणकेचा डोसा करण्याची रेसिपी (quick recipe of aata dosa)

१ वाटी गव्हाचे पीठ म्हणजे कणिक

१ वाटी तांदळाचे पीठ

लहान मुलांच्या केसांना कोणतं तेल लावावं? जावेद हबीब सांगतात मुलांचे केस चांगले होण्यासाठी १ उपाय

१ वाटी बारीक चिरलेल्या तुमच्या आवडीच्या भाज्या

१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा

एका हिरव्या मिरचीचे तुकडे

चवीनुसार मीठ

१ टीस्पून आलं- लसूण पावडर

 

कृती

सगळ्यात आधी एका भांड्यात गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घ्या. त्यामध्ये पाणी टाकून ते अगदी सैलसर भिजवून घ्या आणि त्यानंतर ५ मिनिटे त्यावर झाकण ठेवून ते भिजू द्या.

पावसाळ्यात ऊन ऊन खिचडी साजूक तूप खाणे खूपच फायद्याचे!! बघा पौष्टिक खिचडी करण्याच्या ४ टिप्स...

यानंतर ते पीठ थोडं घट्ट झाल्यासारखं जाणवेल. आता या पिठामध्ये चिरलेल्या भाज्या, मिरची, कांदा, आलं- लसूण पेस्ट, मीठ असं सगळं टाका आणि सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या. हे पीठ अगदी सैलसर भिजवावं.

यानंतर नेहमीप्रमाणे डोसे करण्यासाठी तवा गॅसवर तापायला ठेवा आणि तवा तापल्यानंतर त्यावर हे पीठ टाकून कुरकुरीत पातळ डोसे करा.

तुम्हाला जर आंबूस डोसे आवडत असतील तर या पिठात तुम्ही दही, ताक किंवा लिंबाचा रस टाकू शकता. चव अधिक खुलविण्यासाठी त्यात ओरिगॅनोही घालू शकता. 

 

Web Title: instant atta dosa recipe, how to make atta dosa in just 10 minutes, quick recipe of atta dosa, perfect menu for kids tiffin and breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.