Join us  

संध्याकाळच्या नाश्त्याला फक्त १० मिनिटात बनवा केळ्याचे कुरकुरीत चिप्स; ही घ्या सोपी रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 1:33 PM

Instant Banana Chips Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर तुम्ही या चिप्सचा आनंद घेऊ शकता.

(Image credit- www.vikistyle.top)

उपावासाच्या दिवशी केळ्याचे चिप्स, बटाट्याचे चिप्स भरपूर खाल्ले जातात. अनेकांना सध्याकाळच्या नाश्याला चहाबरोबर केळ्याचे चिप्स खायला खूप आवडतात. (Cooking Tips & Hacks) नेहमी नेहमी बाहेरचं खाणं आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नाही. घरी काही बनवायचं म्हटलं की फारसा वेळ मिळत नाही म्हणूनच घरच्याघरी कमी वेळात केळ्याचे चिप्स बनवण्याची सोपी रेसेपी सांगणार आहोत. संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर तुम्ही या चिप्सचा आनंद घेऊ शकता. (How to make banana chips instantly)

साहित्य (Banana Chipa Ingredients)

६ कच्ची केळी

२ कप तेल

चवीनुसार काळं मीठ

ताजी काळी मिरी

चवीनुसार चाट मसाला

केळ्याचे चिप्स बनवण्याची कृती (How To Make Banana Chips)

१) प्रथम कच्ची केळी सोलून घ्या.

२) एका भांड्यात थंड पाणी टाका आणि त्यात मीठ घाला.

३) आता त्यात सोललेली केळी 10-12 मिनिटे ठेवा.

४) त्यानंतर चिप कटर वापरा आणि केळ्याचे काप करून घ्या.

कांदा, लसणाशिवाय बनवा घट्ट, चविष्ट ग्रेव्ही; 4 ट्रिक्स, कमी साहित्यात स्वयंपाक होईल चवदार

५) कापलेले हे तुकडे कागदावर १० मिनिटं पसरवा.

६) केळ्याचे काप सुकल्यानंतर गरम गरम तेलात तळा.

७) तळलेल्या चिप्सवर वरून काळीमिरी पूड, मीठ घालून सर्व्ह करा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स