Lokmat Sakhi >Food > दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता पटकन होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची सोपी रेसिपी, दाटसर - गोड बासुंदीचा परफेक्ट बेत...

दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता पटकन होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची सोपी रेसिपी, दाटसर - गोड बासुंदीचा परफेक्ट बेत...

Instant Basundi Recipe Just 10 Mins with New Trick : Quick and Easy Basundi Recipe : Basundi Recipe : How to Make Easy Milk Basundi : दसऱ्याला घट्ट, दाटसर, रवाळ बासुंदी घरच्याघरीच करा झटपट, करायला सोपी चवीला झक्कास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 11:53 AM2024-10-11T11:53:18+5:302024-10-11T11:55:56+5:30

Instant Basundi Recipe Just 10 Mins with New Trick : Quick and Easy Basundi Recipe : Basundi Recipe : How to Make Easy Milk Basundi : दसऱ्याला घट्ट, दाटसर, रवाळ बासुंदी घरच्याघरीच करा झटपट, करायला सोपी चवीला झक्कास...

Instant Basundi Recipe Just 10 Mins with New Trick Quick and Easy Basundi Recipe Basundi Recipe How to Make Easy Milk Basundi | दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता पटकन होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची सोपी रेसिपी, दाटसर - गोड बासुंदीचा परफेक्ट बेत...

दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता पटकन होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची सोपी रेसिपी, दाटसर - गोड बासुंदीचा परफेक्ट बेत...

'दसरा' सण म्हटला की प्रत्येकाच्याच घरी गोडाधोडाचे पदार्थ तयार केले जातात. श्रीखंड - पुरी, बासुंदी, खीर, रबडी, गुलाबजाम, रसगुल्ले असे अनेक गोडपदार्थ करतात. दसऱ्याला प्रत्येकाच्या घरी श्रीखंड - पुरी, बासुंदी - पुरी असा कॉमन बेत तर नक्कीच केला जातो. श्रीखंड - बासुंदी तर आजकाल प्रत्येकजण बाजारातून विकत आणतात. परंतु काही घरांत अजूनही पारंपरिक पद्धतीने बासुंदी( How to Make Easy Milk Basundi) तयार केली जाते. बासुंदी करताना ती दूध आटवून त्यात आवडीचे ड्रायफ्रुटस घालूंन मस्तपैकी बेत आखला जातो(Instant Basundi Recipe).

दूध आटवून बासुंदी (Basundi Recipe) करताना दूध आटवायला बराच वेळ जातो. अशी बासुंदी करायची म्हटलं की खूप वेळ द्यावा लागतो. त्यातही काहीवेळा दूध ओतू जाते, अशावेळी तासंतास दुधाकडे लक्ष देत उभे राहावे लागते. तसेच काहीवेळा बासुंदी (Quick and Easy Basundi Recipe) खाली लागते त्यामुळे त्या बासुंदीला करपल्याचा गंध येतो. एवढी सगळी मेहेनत घेऊन बासुंदी जर मनासारखी झाली नाही तर हिरमोड होतो. अशावेळी आपण अगदी झटपट तयार होणारी इन्स्टंट बासुंदी पटकन तयार करु शकतो. इन्स्टंट बासुंदी तयार करण्यासाठी खूप मोठा घाट घालण्याची तसेच दूध आटवायची गरज भासत नाही. दूध न आटवता देखील आपण तितकीच घट्ट, दाटसर आणि रवाळ अशी बासुंदी घरच्याघरी करु शकतो. दूध न आटवता पटकन तयार होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची रेसिपी पाहूयात(Instant Basundi Recipe Just 10 Mins with New Trick).

साहित्य :- 

१. दूध - १/२ लिटर (फुल क्रिम किंवा फुल फॅट दूध) 
२. खवा - ५० ग्रॅम 
३. ड्रायफ्रुटसचे बारीक काप / तुकडे - १/२ कप 
४. साखर - १/२ कप 
५. कॉर्नफ्लॉवर - १ टेबलस्पून 
६. वेलची पूड - १ टेबलस्पून 

उपवास स्पेशल : खा पोटभर पौष्टिक राजगिऱ्याचा थेपला, कमी वेळात झटपट करता येईल असा पदार्थ...

कृती :- 

१. सगळ्यातआधी एका भांड्यात दूध ओतून ते दूध एक उकळी येईपर्यंत व्यवस्थित गरम करून घ्यावं. आता एक पॅन घेऊन त्या पॅनमध्ये खवा घालून तो मंद आचेवर १० ते १५ मिनिटे भाजून घ्यावा. खवा भाजून झाल्यावर त्यात आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटसचे बारीक काप किंवा तुकडे घालावेत. 

२. आता खवा आणि ड्रायफ्रुटसचे बारीक काप पुन्हा २ ते ३ मिनिटे हलकेच भाजून घ्यावेत. भाजून घेतलेला खवा गरम दुधात घालून तो चमच्याने हलवून दुधात संपूर्णपणे मिक्स करून घ्यावा. 

कोथिंबीरचे देठ फेकून न देता त्याचा 'असा' करा वापर, इवलुशा देठाचे माहित नसतील इतके उपयोग...

कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...

३. आता दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये साखर घेऊन ती साखर मंद आचेवर वितळवून तिचे कॅरॅमल तयार करून घ्यावे. कॅरॅमल तयार होईपर्यंत एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात थोडेसे पाणी मिक्स करून त्याची पातळसर पेस्ट करून, ही पेस्ट दुधात घालावी आणि सतत चमच्याने हलवत राहावे.   

४. पातळसर कॅरॅमल तयार झाल्यावर हे कॅरॅमल गरम दुधात घालावे. कॅरॅमल गरम दुधात व्यवस्थित चमच्याने हलवून मिक्स करुन घ्यावे. त्यानंतर १० ते १५ मिनिटे ही बासुंदी मंद आचेवर ठेवून गरम करावी. १५ मिनिटानंतर गॅस बंद करून बासुंदी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. आता या बासुंदीवर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटसचे बारीक काप सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या भुरभुरवून घालाव्यात. त्यानंतर बासुंदी थोडी थंड झाल्यावर २ ते ३ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावी.

 

Web Title: Instant Basundi Recipe Just 10 Mins with New Trick Quick and Easy Basundi Recipe Basundi Recipe How to Make Easy Milk Basundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.